सरकारनामा ब्युरोशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 बारामती : राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलीवर बलात्कार झाला, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णत: निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिद्ध होते असे सुळे यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्तेच्या परिस्थिीतवर गंभीर टीका केली आहे. http://www.sarkarnama.in/supriya-question-law-and-order-state-28898
सकाळ वृत्तसेवा01.38 AMहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. कासारसाई परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे.या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळे, अमित कंधारे, हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, कासारसाईचे सरपंच युवराज कलाटे आदी उपस्थित होते.पीडितेच्या नातेवाइकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसून, या घटनेत जुजबी कलम लावल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी सुळे यांना दिली असता त्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याशी संपर्क साधून गुन्ह्याची गंभीरता व नोंदवलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली.या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असून अटकेत असलेला आरोपी गणेश निकम (वय २२) याच्यावर कलम ३७६ एबी, ३७६ डीबी, ३७७, पाक्सो ५ एम (सामूहिक बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार कलमे लावल्याचे गवारे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवश्यक ते पुरावे व जवाब नोंदविण्याचे काम पोलिस करत आहे.’’कायदा जनजागृतीची गरजअशा घटनांबाबत मीडिया, सोशल मीडियामध्ये चर्चा होत असताना लोकांना कायद्याची भीती का वाटत नाही. एका चुकीमुळे संपूर्ण जीवन उदध्वस्त होते. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. सरकारनेही लैंगिक शिक्षणापेक्षा अशा घटनांचे दुष्परिणाम व कायद्याची भीती निर्माण होईल असा अभ्यासक्रम आणणे काळाची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.http://www.esakal.com/pune/give-us-justice-victims-family-members-demand-145245
सकाळ वृत्तसेवा12.19 PMभाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.http://www.esakal.com/maharashtra/ncp-mp-supriya-sule-talked-about-nagar-incident-and-government-146031
September 28, 2018सामना ऑनलाईन । नवी दिल्लीराफेल प्रकरणी जनतेच्या मनात मोदींबद्दल कुठलीच शंका नाही असे वक्त्यव्य करून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मोदींना क्लीनचीट दिली होती. परंतु शरद पवारांनी मोदींना कुठलीच क्लीनचीट दिलीच नसल्याचे पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.“पवारांनी मोदींना राफेल प्रकरणी क्लीनचीट दिली असे वृत्त काही माध्यमांत प्रसिद्ध झाले होते, ते खोटे आहे” असे सुळे यांनी सांगितले तसेच पवारांच्या वक्त्यव्यातील तीन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचेही त्यांनी सांगितले. विमानाच्या किंमतीबाबत खुलासा, खरेदी प्रकरणावर जेपीसी समिती नेमणे आणि भाजपच्या दुटप्पी धोरणावर त्यांनी टीका केली. या तीन गोष्टींकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही! तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याप्रकरणी सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले तसेच “तारिक अन्वर पक्षस्थापनेपासून सोबत होते, जाण्यापूर्वी पवारांशी बोलून त्यांनी आपले मतभेद दूर करायला हवे होते” असेही त्यांनी यावेळी म्हटले.http://www.saamana.com/pawar-doesnt-give-clean-chit-to-modi-says-supriya-sule/
'राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे.' Updated On: Sep 28, 2018 08:27 PM IST मुंबई,ता.28 सप्टेंबर : बोफोर्सचं प्रकरण गाजत असताना भाजपने संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली होती. आता राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिलं. राफेलची किंमत 300 पटीने वाढविण्यात आली असा आरोप होतेय त्याचाही खुलासा झाला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बोफोर्सचा न्याय 'राफेल'लाही लावा, वादानंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिकाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'न्यूज18 लोकमत'ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान मोदी आणि राफेल बाबत त्यांची भूमिका मांडली होती. राफेल प्रकरण गाजत असतानाही लोकांना पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल संशय नाही असं पवार म्हणाले आणि त्यानंतर देशभर राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण झालं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची काय भूमिका होती ते पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या पवार साहेबांच्या मुलाखतीचा सोईस्कर अर्थ काढण्यात आला आहे. राफेलच्या वाढलेल्या किंमतीचं शंकानिरसन आणि त्या प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशी अशा दोन्ही मागण्या पवार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं वादाचं काय कारण आहे तेच कळत नाही.या वादानंतर पक्षाचे जेष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. तारिक भाईंनी किमान एकदातरी पवारांना फोन करून विचारायला पाहिजे होतं. तारिक भाई, आपने दिल तोड दिया अशी खंतही त्यांनी तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर व्यक्त केली. पण सगळा वाद सुरू झाला तो पवारांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावरून. लोकांना मोदींच्या हेतूबद्दल शंका नाही असं पवार मुलाखतीत म्हणाले होते. असं म्हणणं म्हणजे मोदींना प्रशस्तीपत्रच आहे अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदींना चोर म्हणत असताना लोकांची मोदींच्या हेतूवर शंका नाही हे पवारांचं वक्तव्य वादळ निर्माण करणारं ठरलं. वादाचं कारण ठरलेल्या त्या वक्तव्यावर मात्र सुप्रियाताईंनी काहीही मत व्यक्त केलं नाही.https://lokmat.news18.com/national/supriya-sule-clarification-on-sharad-pawars-statement-307718.html
अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज लोकसत्ता ऑनलाइन | October 2, 2018 01:27 pmमहालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यापुढे पूर्ण पोशाखात येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले असतानाच यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. मंदिरात तोकड्या वेशात जाण्यास मज्जाव करण्याऐवजी कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. आपण २१ व्या शतकात असताना असे निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मूक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भाजपा सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, भाजपाने निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या, पण पारदर्शक कारभार दिसत नाही. त्यांच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जातात ही निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, आपण २१ व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली. विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, जेलमध्ये टाकले जाते. तर दंगल घडवणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कालवा फुटीचे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे त्यांनी नमूद केले.https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-supriya-sule-reaction-on-kolhapur-mahalakshmi-temple-dress-code-1763456/
प्रभात वृत्तसेवा अहमदनगर: आज अहमदनगर येथे महिला मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील आणि देशाची परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कुपोषणामुळे मुलांचे मृत्यु होत आहेत, महागाई प्रचंड वाढली आहे या सगळ्याबाबत लोकांचा संताप अनावर होत आहे. लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही दौरा आखला आहे. अजित पवार काही भागात फिरतील, प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील काही भागात फिरतील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काही भागात फिरतील आणि मी काही भागात फिरून सत्य परिस्थिती काय आहे याचा अभ्यास करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुळे यांनी दिली. संवाद दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. सेल्फी विथ पॉटहोल ही मोहीम आम्ही सुरू केली आहे. लोकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सरकार लक्ष देत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याची धुरा सांभाळतात त्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे. मुख्यमंत्री विरोधी बाकावर असताना आरोप करायचे सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे आज एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मग आता कोणावर ३०२चा गुन्हा दाखल करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीत शेतकरी आंदोलन करणार होते हे सगळ्यांना माहिती होते. ते शांतपणे आंदोलन करणार होते मग पोलिसांचा उपयोग करून लाठीचार्ज का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. या सरकारविरोधात कोणी बोलले तर दबावाचा उपयोग करून आवाज दाबला जातो, अशी ही टीका त्यांनी केली. सत्तेत असलेले आमदार अपहरणाची भाषा करतात, मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ असे चित्र आज निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या. पेट्रोल-डिझेलवरील कर सरकारने कमी केला तर आत्ता २५ रुपयांनी भाव कमी होतील पण या सरकारला महागाई कमीच करायची नाही. गरीब माणसाचा गळा घोटण्याचे काम या सरकारला करायचे आहे. काल शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज या सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF/
संजय काटे मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 श्रीगोंदा (नगर) : "जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पाडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी टोलेबाजी केली. सुप्रियाताई आज श्रीगोंदा दौऱ्यावर होत्या. युवा संवाद साधताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली. सुळे म्हणाल्या, जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार राहूल जगताप यांच्यावर लक्ष आहे. त्यांचे कामही चांगले आहे. त्यांना मी आदर्श मानते. सहकारात कसे काम करायचे, हे राहूलकडून मलाही शिकायचे आहे. यावेळी आमदार राहूल जगताप, डॉ. प्रणोती जगताप, राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, संदीप वर्पे, वैशाली नागवडे, सचिन जगताप, दादा दरेकर, डॉ. सुवर्णा होले, मंगेश सुर्यवंशी, रवि बायकर आदी उपस्थित होते. http://www.sarkarnama.in/supriya-sule-criticise-babanrao-pachpute-29308
विलास कुलकर्णीबुधवार, 3 ऑक्टोबर 2018मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे .- सुप्रिया सुळे राहुरी (नगर) : "आमचा पंधरा व भाजपचा साडेचार वर्षातील कारभार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे", असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. पत्रकारांशी बोलतांना केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करीत खासदार सुळे म्हणाल्या, "बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये तीन वर्षात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील रस्त्यांची वाट लागली. खड्डयांमुळे अपघात वाढले. त्याचा मला त्रास होतो. प्रशासनाला नाही. शेतकऱ्यांवर लाठीमार हे पाप आहे. नवी दिल्लीत तेही घडले." "महिलांच्या सुरक्षीतते विषयी मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींच्या किडनॅपींगची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'ब्र' शब्द काढला नाही. त्यांना ते मान्य आहे. किंवा त्यांचे हात बांधले असावेत. सामान्य माणसाने असे विधान केले असते, तर ती व्यक्ती जेलमध्ये असती. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री यावर गंभीर नाहीत. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा." राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, मंजुषा गुंड, संदीप वर्पे, अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, मनीषा ओहोळ, निर्मला मालपाणी, कपिल पवार उपस्थित होते. http://www.sarkarnama.in/supriya-sule-challenges-devendra-fadnavis-open-debate-29341
सकाळ वृत्तसेवा06.26 AMनगर - 'राज्यातील मंत्री हेलिकॉप्टमधून फिरतात. अशांना सर्वसामान्यांचे प्रश्न समजत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. सामन्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्तादुरुस्तीत लक्ष घालावे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या मेळाव्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी राज्यात दौरे करीत आहे. युवा संवादातून युवतींचे प्रश्न जाणून घेता येतात. कोणत्याही मागणीसाठी लढायचे असते. आत्महत्येमुळे प्रश्न सुटत नाहीत. आत्महत्या करणे चुकीचे आहे. आमच्या सरकारमध्ये एक आत्महत्या झाली, तरी सध्याचे मुख्यमंत्री त्या वेळी राज्य सरकारवर 302 कलम लावण्याची भाषा करीत होते. एक भ्रूणहत्या अथवा एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी सरकारचे ते अपयश असते, हे मी कबूल करते. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या तीन वर्षांत झाल्या आहेत, असे सरकारी आकडेवारीच सांगते. मग आता कोणावर 302 कलम लावायचे?''http://www.esakal.com/paschim-maharashtra/supriya-sule-talking-politics-147626
'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली. आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला. http://aplapune.com/article/ncp-mp-supriya-sule-received-parliamentarians-award-for-children-given-by-parliamentarians-group-for
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव दिल्ली:खासदार सुप्रियाताई सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रियाताईंनी केलं आहे. या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळेंना याआधीही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच लोकसभेत सर्वाधिक हजेरी, सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. पण युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदतकार्याची पावती आहे. केवळ आठ तासांत बारामतीतील चार हजार ८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया त्यांनी साधली. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्र्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत त्यांनी घेतली. त्यांच्या या कार्यक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात चार हजारहून अधिक मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. याशिवाय अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी,विद्यार्थिनींना केलेला सायकल वाटप या सगळ्या कार्याची दखल युनिसेफने घेत त्यांना हा पुरस्कार दिला.खासदार ,संसदपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुप्रिया यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supriya-sule-awarded-by-unicef/articleshow/66689296.cms
सरकारनामा ब्युरोमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 औरंगाबाद: भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याची भाषा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तरी बोलाव ही अपेक्षा होती. पण ते बोलले नाही, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा होता ?अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात सुळे बोलत होत्या. भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे त्याठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली. संविधान जाळण्याचा प्रयत्न जेव्हा दिल्लीत झाला, तेव्हा संविधान बचावसाठी सर्वात आधी राष्ट्रवादीने आंदोलन केले आणि त्यानंतर देशभरात सुरू झाले याची आठवण करून देतांनाच महिलांची सुरक्षितता गंभीर बाब असून सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी यापुढे महिलांच्या बाबतीत चुकीची, अपमान करणारी वक्तव्य केली तर राष्ट्रवादी ते कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला. तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? सुप्रिया सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला. धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे म्हणत त्यांनी मुंडे यांची फिरकी घेतली. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-cm-29513
सरकारनामा ब्युरो, गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच पदाधिकारी चुकिचे विधान करीत आहेत. आमदार चक्क मुलीना पळवून नेण्याच्या गोष्टी करतात, परंतु गृहविभाग त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपला खरोखरच सत्तेची मस्ती आली आहे, जनताच आता ती मस्ती उतरवेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांराशी बोलतांना व्यक्त केले. सुळे काल (ता. 10) पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, की राज्यात महिलामध्ये असुरक्षततेची भावना आहे. महिलांच्या मनात भिती आहे. त्यांच संरक्षण हे सरकार करू शकत नाही, त्यात सत्तेतील आमदारच मुलीना पळविण्याची विधान करतात. त्यांच्यावरही कारवाई होत नाहीत. राज्यातील सरकार संपूर्णपणे असंवेदनशील झालेले आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. आता जनताच त्यांची मस्ती उतरविणार आहे. दुष्काळ जाहीर करावामराठवाडा, खानदेश भागात पाण्याची परिस्थित भीषण आहे. परंतु हे शासन झोपलेले आहे. अद्यापही दुष्काळ जाहीर करून उपययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जर दुष्काळाची स्थिती आहेच तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन विलंब का करीत आहे. दुष्काळ निवारण्यासाठीही शासन वेळकाढू धोरण राबवित आहे. असा आरोपही त्यांनी केला. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-bjp-government-29587
सकाळ वृत्तसेवागुरुवार, 11 ऑक्टोबर 2018पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.सत्कारावर होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरावी. खरेतर या स्थितीची सरकारी यंत्रणेने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून दखल घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळ नाहीच असे चित्र उभा करीत आहेत. हे खेदजनक आणि असंवेदनशीलतेचे अत्युच्च टोक देखील आहे. कसलीही घोषणा अथवा पुर्वसूचना न देता राज्यात ठिकठिकाणी भारनियमन, विजकपात सुरु आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी देतानाही हात आखडता घेतला जात आहे, असा आरोप ही सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. दुष्काळ जाहीर करायला विलंब का होतोय? सरकारने संवेदनशीलता जपत मराठवाडा आणि अन्य ठिकाणी जेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे, त्या त्या ठिकाणी तातडीने दुष्काळ जाहिर करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.http://www.esakal.com/pune/be-aware-drought-conditions-do-not-spend-felicitates-said-supriya-sule-149138
कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: October 12, 2018 09:52 PM | Updated: October 12, 2018 09:57 PM धरणगाव - कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, युवतीवरील अत्याचार व युवकांची व्यसनाधिनता विरोधात त्यांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, पी.आर.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, संचालीका निनाताई पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, मुख्याध्यापक प्रा.बी.एन. चौधरी, के.एम. पाटील, सी.के.पाटील उपस्थित होते.तुझ्या प्रश्नाचे उत्तर मोदीसाहेबच देतील...ईश्वर पवार या विद्यार्थ्याने आपली परिस्थिती गरीबीची असल्याने मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू शकलो नाही. आरक्षण घटकात मोडत नसल्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा लागला. शेतकºयाच्या लेकरांना सरकार फी माफी देत नाही तर दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांना भरमसाठ सवलती सरकार देत आहे. तेव्हा हे सरकार १२५ कोटी जनतेचे आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे..? असा प्रश्न उपस्थित करताच टाळ्यांचा गजर झाला. यावेळी खासदार सुळे मात्र निरुत्तरीत झाल्या. या प्रश्नाचे उत्तर मोदी साहेबच देवू शकतील. मी तुझा प्रश्न त्यांना टिष्ट्वटर वरुन विचारते व तुला कळवते असे त्यांनी सांगितले.http://www.lokmat.com/jalgaon/give-farmers-farmers-guarantee-their-farm-loan-waiver-mp-supriya-sule/
राजेंद्रकृष्ण कापसे09.14 AMउत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विदर्भातील काही दुष्काळी जिल्हात तालुक्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा. असे त्यांनी सांगितले.https://www.esakal.com/pune/chief-minister-should-immediately-announce-drought-150961
योगिराज प्रभुणे, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 पुणे : सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार या योजनेतून केली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. "जलयुक्त शिवार'च्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत त्या म्हणाल्या, "माननीय मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात येतील तेव्हा हे त्यांना जरूर विचारा. हा त्यांचा, त्यांच्या सरकारचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम' आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. कारण, त्यांच्यासारखे नुसते आरोप करण्याची माझी स्टाइल नाही आणि खोटं मी बोलत नाही.'' "जलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार हा कार्यक्रमाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पुरेसा अभ्यास न करता घाईघाईने योजना राबविली. हा "पब्लिसिटी स्टंट' असेल. मुख्यमंत्री जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात. कार्यक्रमाची अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्याचा मिळणारा प्रतिसादाचा आढावा घेतला नाही. त्यातच हा प्रकल्पातील तांत्रिक चुका आणि नंतर पैशाचीपण कमतरता झाल्याने सगळा गोंधळ झाला आहे,'' असे त्या म्हणाल्या. "जलयुक्त शिवारासाठी सरकारने किती कामे केली आणि श्रमदानातून किती कामे उभी राहिली, याचाही हिशेब सरकारने दिला पाहिजे. सरकारने त्यांचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम राबविला. त्यासाठी "पब्लिसिटी' केली,'' असे सुळे यांनी सांगताच यावर तुमची भूमिका काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ""मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचे "क्रेडिट' घेत नाही आणि त्यांच्यासारखे बिनबुडाचे आरोपही करत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आता बोलत आहेत. पण, सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली.'' http://www.sarkarnama.in/i-dont-speak-lie-cm-sule-29931
Published 24-Oct-2018 04:21 ISTपुणे- भाजपच्या आमदाराने खंडणी घेऊन १ आठवडा होऊन गेला तरी मुख्यमंत्री गप्पच आहेत. मुलींना उचलून नेऊ म्हणणारे आमदार राम कदम व खंडणी मागणारे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना क्लिनचिट दिली की काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुळे यांच्या हस्ते मंगळवार (दि.२३) रोजी दौंड तालुक्यातील केडगाव येथे दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुळे पुढे म्हणाल्या की, या सरकारने देशात जीएसटी आणली परंतु त्यामुळे सर्वच सुखी आहेत का? महागाई संपली का? नोटबंदीमुळे काळा पैसा संपला का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या सरकारने जीएसटी आणण्यासाठी घाई केल्यामुळे महागाई वाढली आहे. या फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु जमिनीत 1 फुटही पाणी मुरले नाही. त्यामुळे या सरकारमुळे कोणाचेच भले झाले नाही. राज्यात भारनियमन सुरू आहे. कोळशाचा तुटवडा नसताना भारनियमन कसे? यात घोटाळा असल्याचा आरोप सुळे यांनी बोलताना केला. तसेच दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सुळे यांनी दिला. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, दौंड पंचायत समिती सभापती झुंबर गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर, उपाध्यक्ष शशिकांत माने, मधुकर दोरगे, बाजार समितीचे सभापती सागर फडके, प्रकाश नवले, नितीन दोरगे यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2018/10/24042157/Supriya-sule-demands-to-take-againts-MLA-Yogesh-Tilekar.vpf
राजेंद्रकृष्ण कापसेसोमवार, 22 ऑक्टोबर 2018उत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विदर्भातील काही दुष्काळी जिल्हात तालुक्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा. असे त्यांनी सांगितले.https://www.esakal.com/pune/chief-minister-should-immediately-announce-drought-150961