सकाळ वृत्तसेवापुणे- पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.https://www.esakal.com/maharashtra/immediately-start-tanker-and-fodder-camps-says-supriya-sule-154819
बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबारी या निमित्ताने न्याय मागते, असेही सुळे यांनी सांगितले.जेजुरीनजिक रेल्वे उड्डाणपूलावरुन सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्डयांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखविले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रीत केल्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजविण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत विनंती केली. नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले.दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात...पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे, नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे, अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले.https://www.esakal.com/pune/supriya-sule-shows-bad-conditions-streets-through-facebook-live-154932
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील ...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुणे दौऱ्यावेळी या योजनेला मा...
पुणे - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी २८ नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वय...
सुळेइंदापूर तालुक्यातील बोरी गावासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे कौतुक केले. बोरी (ता.इंदापूर) येथे आपला मतदार संघ,आपला अभिमान या अभियानातंर्गत येथील सुभाष शिंदे,मल्हारी शिंदे यांच्या द्राक्ष श...
सुप्रिया सुळेंच्या मागणीला यश ग्रामीण (Pune) भागातील पीएमटी (PMPML) बससेवा सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केली आहे. त्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला बससेवा बंद केलेल्या मार्गावर बससेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मि...
मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला होता. दरम्...
सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे.या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बे...
सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चिघळत चालला आहे. कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत महाराष्ट्राच्या सहा ट्रकचे नुकसान झालं आहे. यानंतर महाराष्ट्रातून स...
सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांचा शिंदे-भाजप सरकारला टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणेमटा ऑनलाइन | Updated:Oct 27, 2018, 04:00AM ISTजन्मत: आलेला कर्णबधीरपणा आणि वयोमानामुळे आलेले बहिरेपण यामुळे आयुष्यातून निघून गेलेल्या ध्वनिलहरी पुन्हा आणण्याचे विक्रमी कार्य शुक्रवारी घडले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात आठ तासांमध्ये चार हजार ८०० विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रम प्रस्थापित झाला असून, या सर्वांच्या आयुष्यात ध्वनिलहरींचे आनंददायी पर्व आले. ही घटना जागतिक विक्रम प्रस्थापित करणारी ठरली असून, याची नोंद 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने घेतली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्रे बसविण्यात आली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत हा विक्रम रचला गेला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, स्टार्की हीअरिंग फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि आर. व्ही. एस. एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी आठ तासांच्याच कालावधीत एनआरएचएम आणि मणिपूर सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात तीन हजार ९११ श्रवणयंत्रे जोडण्यांचा विक्रम करण्यात आला होता. खासदार शरद पवार, आमदार अजित पवार, स्टार्की हीअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, टीम ऑस्टिन, रोहित मिश्रा, सुरेश पिल्लई, आर. वेंकटरमण, कल्याणी मांडके, नंदकुमार फुले, महेश जोशी, रमेश थोरात, विठ्ठल कामत, प्रभाकर देशमुख, रवी शास्त्री, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, नीलेश राऊत आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, 'एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याची जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. जागतिक दर्जाचा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.''गेल्या पाच वर्षांपासून राज्यात विविध भागांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. २०१३ पासून सुमारे १५ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी त्याची व्याप्ती वाढविण्यात आली असून, एकाच दिवशी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सहा हजार जणांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले,' असे सुळे यांनी सांगितले................मुलांनी प्रथमच ऐकल्या ध्वनिलहरीया उपक्रमाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. शिवछत्रपती क्रीडासंकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे तब्बल सहा संचामध्ये या जोडण्या करण्यात येत होत्या. तपासणी, जोडणी आणि समुपदेशन आदीच्या सहा संचात या जोडण्या करण्यात आल्या. त्यामुळे आयुष्यात प्रथमच ध्वनिलहरी कानावर पडल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा ऐकायला येऊ लागल्याने आनंदाश्रू अनावर झाले होते. काही पालकांनी आपली मुले आता ऐकू आणि बोलू लागतील, याचे समाधान बोलून दाखवत होते.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/the-record-of-hearing-aids/articleshow/66383452.cms?utm_source=mt&utm_medium=Whatsapp&utm_campaign=onpagesharing
सकाळ वृत्तसेवाशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली.शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हा एक्स्पो होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, माजी मंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.श्री. खोतकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यात मराठा समाजाचे नुकसान शेतीनेच झाले आहे. अधिकच्या शेतीमुळे पूर्वी व्यवसायात लोक उतरायचे नाहीत. आता ही परिस्थिती बदलायला हवी.’’ श्री. बागडे यांनीही महाएक्स्पोला शुभेच्छा दिल्या.यावेळी रंगनाथ काळे, माजी आमदार कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उद्योजक सचिन मुळे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार, शिवाईच्या पुष्पा काळे, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख, डॉ. अनुपमा पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती.आपल्यावरील संस्कार रामायणातूनशासन हे सातत्याने चालणारे काम आहे. सारखे कायदे बदलतात, सध्याचे जग ऑटोमेशनचे असल्याने नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत. कुठल्याही सरकारसमोर हा प्रश्न असेल. त्यामुळे निवडणुकात कितीही टोकाची टीका केली तरी नंतर सोबत काम करायलाच हवे. तसेच आपल्यावर जे संस्कार आहेत ते रामायणातून झाले आहेत. ते विसरता कामा नये, असेही यावेळी खासदार सुळे यांनी नमूद केले.https://www.esakal.com/marathwada/fight-unity-drought-supriya-sule-business-mahaexpo-151914
सरकारनामा ब्युरोगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018 सातारा : ''कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना केवळ सुप्रिया सुळे यांनी माझे संघटनकौशल्य पाहून मला युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आणले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सक्षणा सलगर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेली दोन दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवतींचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आज त्या साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आल्या. येथे त्यांचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला व मुली सुरक्षित नाहीत, भाजप सरकारने त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मोफत पासही मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभाराबाबत सर्वजण नाखुश आहेत. सरकारमधील मंत्री व नेते महिला व मुलींबाबत विकृत वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे बेटी बचाओ ऐवजी बेटी भगाओ असाच यांचा नारा दिसत आहे. भाजपचे मंत्री व नेते महिला व मुलींबाबत सातत्याने विकृत विधाने करत आहेत. मंत्रीमंडळात भाजपची ही अभद्र टीम भरलेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सॅनिटरी नॅपकिनवरून केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.-सक्षणा सलगर http://www.sarkarnama.in/sakshana-salgar-about-supriya-sule-30024
प्रभात वृत्तसेवा-October 29, 2018 | 5:50 pmपुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.राज्यात अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुढचे काही महिने अडचणीचे आहे. आपण या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे सरकार उदासीन आहे म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. सणासुदीची वेळ आहे, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा असे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.http://www.dainikprabhat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%aa/
'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. 'देशात कुपोषण, महिला अत्याचार अशा अनेक समस्या असताना आपण कोणत्या मुद्दाला प्राधान्य द्यायला हवे,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शोषण न झालेली एकही महिला दिसणार नाही. एम. जे. अकबर प्रकरणामध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली नाही. एक महिला खोटी बोलत असेल, पण २० महिला खोट्या बोलणार नाहीत. विशाखा समित्यांनी आपल्या भूमिका पार पाडल्या असत्या तर आज इतक्या प्रमाणात तक्रारी पुढे आल्याच नसत्या, असे त्यांनी सांगितले.मुलींना उचलून नेण्याची भाषा होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार खंडणी मागतात, पण गृह खाते असलेले मुख्यमंत्री 'पारदर्शक' कारभार आहे, असे नुसतेच सांगतात. आपल्या आमदारांवर काहीच बोलत नाहीत. राज्य महिला आयोग तर आजकाल बोलतही नाही आणि गंभीरही नाही. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा नारा तुम्ही देता. प्रत्यक्षात महाराष्ट्रात महिला असुरक्षित झाल्या. उत्तर प्रदेश, बिहारला नाव ठेवायचीच कशाला. महाराष्ट्रापेक्षा तर ही राज्ये अधिक उत्तम आहेत अशी म्हणायची वेळ आली. आम्ही सत्तेत आलो तर महिला सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल. एकल महिला धोरणावर आम्ही गंभीर आहोत असेही त्यांनी सांगितले.या सरकारच्या प्रत्येक योजना, धोरणात पारदर्शकता दिसत नाही. स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना, कौशल्य विकास उपक्रम सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले. २०१९पेक्षा २०२४मध्ये जनता इतर काही नको फक्त काम द्या, असेच म्हणेल. 'मुद्रा'चे भलेमोठे रॅकेट औरंगाबादमध्येच उघडकीस आले. देशात अशीच परिस्थिती आहे. केंद्राचा, राज्याचा महिला धोरणाचा ड्राफ्ट उत्तम आहे, पण अंमलबजावणी करताना वस्तुस्थिती खूप वेगळी असते. शौचालय बांधण्याचे आवाहन सरकार करते. शासकीय जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन काम करताना पाहणे सुखावह आहे, पण महिलांना खरच फायदा झाला का. महिला स्वच्छतागृहाचा विषय तर मागेच पडला. मी इतक्या ठिकाणी फिरते पण महिला स्वच्छतागृहाची सोय कुठेच नाही, अशी खंत सुळे यांनी बोलून दाखवली.निवडणूकांपूर्वीच राम मंदिर आठवते २०१९च्या निवडणुका या मंदिरावर होतील की विकासकामांवर या प्रश्नाचे उत्तर सत्ताधारी पक्षाकडेच असावे, असे त्या म्हणाल्या. पाच वर्षांत ६०० कोटी खर्च करून भाजप मुख्यालयाची इमारत तयार झाली. भाजपची नवे कार्यालये तयार झाली, पण पाच वर्षांत सरकारला राम मंदिर काही बांधता आले नाही. २०१४च्या निवडणुकांमध्ये जनतेने विकासासाठी मतदान केले. मग आता पुन्हा राम मंदिर विषय आला. शिवसेनेला रामाची उशिरा आठवण झाली. शिवसेनेची 'अयोध्या चलो' ही भूमिका सोयीनुसार आली. अशा भूमिकेमुळे देशाचे नुकसान झाले, अशी टीका त्यांनी केली.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/metoo-movement-mp-supriya-sule/articleshow/66376086.cms
सकाळ वृत्तसेवादौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दौंड येथे आज (ता. 2) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, ''सीएम चषकाच्या निमित्ताने सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. चषकाला माझा विरोध नाही; परंतु वेळ चुकीची आहे. दुष्काळात होरपळणाऱ्यांना आधार देऊन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळं बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे. राज्यात बेरोजगारी, महागाई, असुरक्षितता आणि दूषित सामाजिक वातावरणामुळे अस्वस्थता असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. जाहिरातबाजीवर तुफान खर्च करणारे हे सरकार आहे. जनतेला हे सरकार वाटत नसून, एखादा प्रॉडक्ट वाटावा, अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्याबद्दल भाजप-शिवसेनेचे नेते बोलत नाहीत. राज्य सरकारची कोणतीही योजना चाललेली नाही. आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या युतीने लोकांची फसवणूक केली आहे.''''सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वाद, रुपयाचे अव्यमूलन, कोलमडणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, सीबीआयअंतर्गत लाच प्रकरणावरून झालेल्या धाडी आणि केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद दुर्दैवी आहेत. अशा विसंवाद आणि वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होत आहे. त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,'' असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदारhttps://www.esakal.com/pune/supriya-sule-criticises-cm-devendra-fadnavis-over-drought-situation-153060
दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. By लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात कीर्तन करण्यात आले. तर दुसरीकडे, गॅस दर ६० रुपयांनी वाढल्यामुळे तहसील कचेरीच्या परिसरात ३ दगडांच्या चुलीवर भाकरी भाजून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध करण्यात आला.या वेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी ६ वाजता सुप्रिया सुळे यांनी दौंड-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अॅड. अजित बलदोटा, सोहेल खान, बादशहा शेख, झुंबर गायकवाड, प्रवीण शिंदे, नागसेन धेंडे, राणी शेळके, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘पुणे-दौंडदरम्यान विद्युत लोकल तातडीने सुरू झाली पाहिजे. दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले गेले पाहिजे. कडेठाण, मांजरी येथील बंद पडलेली रेल्वेची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. प्रभाग क्र. ५ मधील रेल्वे अधिकाºयांनी थांबविलेली कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. रेल्वे झोपडपट्टी कुठल्याही परिस्थितीत हलवू दिली जाणार नाही. रेल्वे परिसरात पाणीटंचाई आहे.‘मीटू’च्या प्रश्नावर मोदी गप्प का?सध्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर ‘मीटू’चा प्रश्न गाजतोय. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर २० महिला आरोप करतात. त्यात काहीतरी तथ्य असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देतात, दुसरीकडे ‘मीटू’वर गप्प का? हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. तेव्हा संबंधित मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे सरकार नसून प्रॉडक्ट आहे. केवळ जाहिरातबाजीवर हे सरकार तरलेले आहे. जलयुक्त शिवाराचे श्रेय सिनेअभिनेता आमिर खान यांना दिले पाहिजे. मात्र, हे श्रेय भाजपा सरकार लाटत आहे. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.http://www.lokmat.com/pune/take-ncp-railway-station/
पुणे दि. २६ (प्रतिनिधी) - शेजारची राज्ये दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करीत असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र हे धोरण अद्याप मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. दिव्यांग व्यक्तिसुद्धा समाजाचा भाग असून त्यांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने येत्या जागतिक अपंग दिनी तरी धोरण तयार करावे, या मागणीचे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांनी दिव्यांगांसाठी धोरण तयार करून मंजूरही केले आहे. याशिवाय महाराष्ट्राचाही विचार केला, तर समाजातील इतर वंचीत घटकांसाठी धोरण तयार आहेत. त्याचा त्या त्या घटकांना त्याचा फायदाही होत आहे. असे असताना दिव्यांग व्यक्ती मात्र अपेक्षित सुविधांपासून आजही वंचीत आहेत. याबाबत आपण यापूर्वीही अनेक वेळा पत्र पाठवून धोरण तयार करावे, अशी मागणी केली आहे. इतकेच नाही, तर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य अपंग धोरण कृती समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला सर्वंकष अहवाल देखील सरकारला सादर झालेला आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.मसुद्यानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. यासाठी आपण स्वतः शासनाकडे पत्राच्या माध्यमांतून, तसेच प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीतून दिव्यांगांचा विकास ही शासनाची जबाबदारी आहे. तरी हे धोरण तातडीने मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून ३ डिसेंबर रोजी दिव्यांग धोरण जाहीर झाल्यास त्यांना शासनाकडून एक आगळी वेगळी भेट ठरू शकेल, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.https://www.maharashtrabhumi.com/news-details.php?nid=95
https://www.youtube.com/watch?v=9bcHs18Y6QM&feature=youtu.beराज्यातील अनेक भागांत दुष्काळ असताना दुष्काळ निवारणाचं काम करण्याऐवजी काही जण अयोध्येला जात आहेत तर, काही जण राम मंदिराचा मुद्दा पुढे करुन महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या वारीचा