umaiमुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले. मुंबई विकास आराखड्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. मात्र, केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे आज आंदोलन करण्यात आले.
सुप्रिया सुळे यांची आक्रमक भूमिका गरीब कष्ट करणार्यांनी मेरीटवर नोकर्या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध असा हल्लाबोल राष्ट...