1 minute reading time (123 words)

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा ताईंच्या बातम्यांसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा
पुणे, दि. १३ -  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संबंधित बातम्या, प्रेस रिलीज, व्हिडीओ आदी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी https://news.supriyasule.net/ ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक यांना सुप्रियाताईंच्या संदर्भातील माहिती, बातम्या पाहण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल.
या वेबसाईटवर सुप्रियाताईंच्या संदर्भात देशभरातील वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेला मजकूर उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय त्यांचे ब्लॉग, लेख आदींचाही यामध्ये समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वृत्त पाहण्याची यामध्ये सोय आहे. याखेरीज ताईंची लेटेस्ट छायाचित्रे, प्रेस रिलीज यांचाही समावेश पेजवर करण्यात आला आहे.
ही छायाचित्रे डाऊनलोड करण्याचीही सोय या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मुद्रित अथवा दृकश्राव्य माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार मित्रांसह सर्वानी या वेबसाईटचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
'गुजर-निंबाळकरवाडीतील प्रस्तावित रिंगरोड बाधितांचा...