लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत रस्ते सुरक्षेसंदर्भात बोलताना आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नवले पूल, (खडकवासला विधानसभा मतदारसंघ) संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. या परिसरात २०२१ पासून १७ जणांचा अपघातामध्ये मृत्यु झाला तर २४ जण गंभीररित्या जखमी झाले.
नुकतेच या भागात ट्रकचे संतुलन गमावल्यामुळे जवळपास ४० वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा परिसर 'ब्लॅक स्पॉट' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या भागातील अपघात थांबावेत यासाठी येथे महामार्ग पोलीस तथा वाहतूक पोलिस कायम तैनात असणे आवश्यक आहे.
पुणे महापालिका, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी हा परिसर अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु त्यांना यश आलेले नाही, हे देखील सभागृहास सांगितले. याप्रकरणी रस्ते व महामार्ग मंत्रालयाने तोडगा काढावा अशी विनंती देखील केली.
Raised the issue of frequently happening road accidents in Navale Bridge in Pune. The bridge has become a black spot for major accidents and the service road needs repair. Innocent lives have been lost and some have been severely injured.
I have suggested to repair the service road time and again to minimize accidents. Despite several measures by Pune Municipal Corporation and Police Administration, a 'zero- accident' area has not been achieved yet.
Further, to ensure that traffic rules are followed, sufficient presence of traffic police along the highway is required.
Requested the Road Transport and Highways Minister to thoroughly research into the matter and take concrete steps to save innocent lives.