2 minutes reading time (468 words)

[TV9 Marathi]शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेनेचा खासदार होणार?

शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेनेचा खासदार होणार?

महाविकास आघाडीत घडामोड काय, सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

Supriya Sule On Rajya Sabha: राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. एक जागा महाविकास आघाडीसाठी उरते. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचे यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. यावेळी शिवसेनेला संधी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी अगोदरच मांडली आहे. तर शरद पवार यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा पाहता, त्यांचे नावही चर्चेत आहे. याविषयीवर दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं. 

शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीविषयी सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं. "रुबी रुग्णालयातून शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत. अजून दोन दिवस आरोग्य तपासणी करतील. सगळ्यांचाच आग्रह आहे की राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं. कालच जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. तर मी संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला आणि शरद पवार यांच्या उमेदवारीविषयी चर्चा केली. सगळ्यांचीच इच्छा असेल तर शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवता येईल. राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे काँग्रेसच्या आमदारांनाही या विषयीवर भेटले. तर दिल्लीत मी काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटणार आहे. महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेसाठी शरद पवार यांची उमेदवारी निश्चित करावी अशी विनंती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना करणार आहे. हा निर्णय एकमताने व्हावा ही इच्छा आहे. अजून शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नाही. त्यांच्या तपासण्यामुळे, त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. याविषयावर चर्चा होईल." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज महाविकास आघाडीची बैठक

तर आज राज्यसभेवर कुणाला पाठवायचं यासंबंधी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर झाले नव्हते. काही कामामुळे नेते हजर झाले नसल्याचे समोर येत आहे. आज होत असलेल्या बैठकीत कोण उपस्थित राहणार आणि या बैठकीत काय चर्चा होणार हे लवकरच समजले. पण आजच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीत उद्धव सेनेचे 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. एका जागेसाठी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. काही अपक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे एक जाग ते सहज निवडून आणू शकतात. आता त्यासाठी कुणाच्या नावावर एकमत होतं हे लवकरच समोर येईल.

...

Supriya Sule: शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेनेचा खासदार होणार? महाविकास आघाडीत घडामोड काय, सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा - Marathi News | Will Sharad Pawar go to Rajya Sabha or will he become an MP from Uddhav Thackeray shivsena What is the big development in Mahavikas Aghadi Supriya Sule big revelation | TV9 Marathi

Supriya Sule On Sharad Pawar: राज्यसभेसाठी कुणाला पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू होणार आहेत. उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा खासदार करण्याचा आग्रह धरला आहे. तर शरद पवार यांना पुन्हा संधी द्यावी अशी मागणीही जोर धरत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा खुलासा केला आहे.
[Marathi Oneindia]शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार...
[Lokshahi]शरद पवार राज्यसभेत जाणार का? सुप्रिया सु...