Supriya Sule On Sanjay Gaikwad: आमदार निवासमधील (MLA residence) कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याने निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केलीये. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं. जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरि...
पुणे : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचं सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरलं. आमदार गायकवाड यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त...
'सत्तर-नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणारे हिंजवडीसंदर्भात अनास्था का दाखवित आहेत,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशा बैठका सुरू केल्या तर चांगले होईल, असेही त्यांनी सांगि...
राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...
राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...
संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केलीय. "पैसा आणि सत्तेची मस्ती झाली आहे" अशा शब्दांत त्यांनी गायकवाडांवर निशाणा साधला. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय.
गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण...
सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली. यावर सुप्रिया सुळे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आ...
शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारनं कर्ज घेतलंय आणि इकडे अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना पगार द्यायला पैसे नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली
मराठी शाळा बंद आहेत आणि पाच हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, \"१० ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शासन निर्णय काढून ...
मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद...
खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल मुंबई : गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओरिसा यांसारख्या राज्यात त्रिभाषा सूत्राची सक्ती नसेल, पहिलीपासून हिंदी शिकवली जात नसेल तर ती सक्ती महाराष्ट्रात कशासाठी, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला. दैनिक 'नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयाला सुप्रिया सुळे यांनी ...
सुप्रिया सुळेंचा सरकारला अल्टिमेटम आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही असा दावा बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आयटी पार्क हिजवडी, म...
खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा पिंपरी : आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील रस्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी, "आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा व...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आज हिंजवडी दौऱ्यावर होत्या. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली. पाणी, कचरा आणि रस्ते नीट व्हावेत यासाठी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी सुप्रिया सुळेंकडे केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुप्रिया सुळेंशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी शाहांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पत्रकारांनी अजितदादांनी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय? पाहुयात..
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अनेक पक्षांकडून देखील शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार, २०१४ पासून लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) नेत्या आणि २०२३ पासून राष्ट्रवाद...
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषेसंबंधी जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 जुलैला भव्य मोर्चा काढला जाणार होता मात्र पावसाळी अधिवेशनच्या पुर्वसंध्येला हा निर्णय रद्द केला गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस...
बारामतीत काका अजित पवारांना टक्कर युगेंद्र पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी दिली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. सुप्रिया सुळेंनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सगळ्यांना एकच सुखद धक्का दिला आहे. सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेन...
Supriya Sule: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अ...