1 minute reading time (197 words)

[Saam TV]सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

संसदरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या त्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षातील नेत्यांचा समावेशही आहे.(Supriya Sule parliamentary delegation leadership)

भारत आणि सिंगापूर या देशांमध्ये महत्त्वाचा व्यापारी करार होणार आहे. या करारासंदर्भात होणाऱ्या चर्चेसाठी खासदारांच्या ज्या गटाची निवड करण्यात आली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. मित्र देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी 'संसदीय डिप्लोमसी' अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत सुप्रिया सुळे खासदारांच्या गटाचे नेतृत्व करतील.. 

...

Supriya Sule : सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व | Supriya Sule to Lead MPs’ Delegation for India–Singapore Trade Talks

Supriya Sule, India Singapore trade talks : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोदी सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून भारत-सिंगापूर व्यापार कराराच्या चर्चेसाठी त्या खासदारांच्या गटाचे नेतृत्व करणार आहेत. संसदीय डिप्लोमसी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
[News18 Marathi]खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकार...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मो...