1 minute reading time
(60 words)
[Saam TV]संसद रत्न सुप्रिया सुळेंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी!
संसद रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील दिली गेली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करतील, यात विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेशही आहे.

