1 minute reading time (112 words)

[Mumbai Tak]महिला आघाडीच्या बैठकीतून सुप्रिया सुळे यांचं भाषण

महिला आघाडीच्या बैठकीतून सुप्रिया सुळे यांचं भाषण

 आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. यानुसार लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अंमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच, २०२४ ला लोकसभा निवडणूक लागण्याआधी या आरक्षणाची अंमलबजावणी होणं शक्य नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसंच, महिला आरक्षण हे जुमला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्या बोलत होत्या.

[The Lallantop]Gautam Adani-Shah वाली मीटिंग, PM M...
[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा एकनाथ शिंदे यांच्याव...