1 minute reading time (95 words)

[Maharashtra Times]धो धो पावसात सुप्रिया सुळेंनी घेतलं २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन!

धो धो पावसात सुप्रिया सुळेंनी घेतलं २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन!

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) दौंड, इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या.दौंड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचा आशीर्वाद घेत त्या भिगवण, मदनवाडीमार्गे इंदापूर तालुक्यात आल्या.खासदार सुप्रिया सुळे सोमवारी उशिराच इंदापूर शहरात पोचल्या.एक-दोन मंडळांच्या गणेशाचे दर्शन होताच पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू झाला तरी त्यांनी आपला कार्यक्रम थांबवला नव्हता.पावसातच गणेशाचे दर्शन घेण्याचा आणि मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.धो धो कोसळणाऱ्या पावसातच त्यांनी इंदापूर शहरातील तब्बल २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेतले.त्यांचे ते चित्र पाहून आपसूकच शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.'शोभते ना पवार साहेबांची लेक...' अशा प्रतिक्रियाही इंदापुरातील नागरिकांच्या ऐकायला मिळाल्या.

[ABP MAJHA]नवाब मलिक अजितदादांच्या गटात? सुप्रिया ...
[TV9 Marathi]शेतकऱ्यांना वीज नाही पण जी-20 परिषदेस...