“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी”

“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी” संघर्ष करायची वेळ आली

“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 06 Sep 2018 06:48 PM[caption id="attachment_1931" align="alignnone" width="300"] गाठ सुप्रिया सुळेशीhttps://abpmajha.abplive.in/pune/ncp-mp-supriya-sule-criticized-cm-ram-kadam-over-controversial-statement-in-dahihandi-582693

Read More
  245 Hits

.. तर गाठ माझ्याशी आहे, सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम

.. तर गाठ माझ्याशी आहे, सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम सुप्रिया सुळे यांनी घेतला राम कदमांचा समाचार

Sneha Updated Friday- 7 September 2018 - 3:16 PM[caption id="attachment_1937" align="alignnone" width="300"] सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम टीम महाराष्ट्र देशा – आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुळेंकडून निषेध नोंदविण्यात आला. सुप्रिया सुळे इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. मात्र, संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महिलांचा आत्मविश्वासही वाढवला. https://maharashtradesha.com/supriya-suleen-threatened-ram-kadam-on-their-speech-at-dahihandi/

Read More
  257 Hits

57% of potholed roads across Maharashtra fixed

57% of potholed roads across Maharashtra fixed 57% of potholed roads across Maharashtra fixed

Mumbai[caption id="attachment_1940" align="alignnone" width="300"] 57% of potholed roads across Maharashtra fixed The Maharashtra government, out of total 43,830 km of pothole-ridden roads, has attended to a stretch of 25,384 km. The remaining bad patches are likely to be fixed by Ganesh festival. The total length of road network across Maharashtra is 88,893 km. Out of it, the state public works department claimed that it has attended the potholes on 57.91 per cent of the roads. "In Mumbai, we had attended 76.17 per cent of potholes, 67.96 per cent in Pune region, 43.83 per cent in Nasik region, 46.70 per cent in Aurangabad region, 56.39 per cent Amarawati region and 69.47 per cent in Nagpur region. We have attended the 64.15 per cent bad patches on the state roads and 54.07 per cent on the district roads," stated the data. The potholes filling exercise started on July 25, 2018, in the state. The state roads are damaged more than the district roads. Out of its 21,312 km network of roads, 13742 km of roads of Pune were damaged topping the list of the city with most damaged roads. With 10,442 km out of total 16322 km of roads damaged, Nasik is close on the heels. After getting the flake from the public and Oppositions over bad conditions of roads, Maharashtra government has started attending the potholes. The aggressive selfie with potholes campaign started by the Nationalist Congress Party (NCP) across the state definitely played a catalyst. NCP state president Jayant Patil, NCP MP Supriya Sule and other leaders and party workers clicked the picture of potholes and uploaded them on social media tagging the Public Works Department minister Chandrakant Patil. "We want to show the ground reality of the roads to ministers and his staffers," said Nawab Malik, NCP spokesperson. Chandrakant Patil, PWD minister promised that his department will fix all the potholes by Ganesh festival. "Maharashtra government had made a budgetary provision of Rs 1,300 crore to fix the potholes. This year, we had started fixing potholes late because initially, the contractors did not get a long dry spell to fill the potholes. We are confident of meeting the deadline," sources in the PWD said. Malik, on the other hand, accused that inferior quality of materials are being used to fill potholes making them reappear every monsoon.  

Read More
  266 Hits

I dare you to touch a woman in the state, says Supriya Sule

I dare you to touch a woman in the state, says Supriya Sule NCP leader Supriya Sule.

ET Bureau|Sep 06, 2018, 07.35 PM IST[caption id="attachment_1944" align="alignnone" width="300"] “You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.Nationalist Congress Party Chief Supriya Sule has now waded in to the row over a BJP MLA Ram Kadam threatening to ‘kidnap’ girls if they reject a marriage proposal of boys.“You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.“It is black day in a progressive state like Maharashtra if an elected representative of the ruling party is talking about k ..All the guy needs to do is to get his parents and if they say they like the girl then he would ‘kidnap’ the girl and hand it over to the boy. Kadam’s statement has led to an outrage across Maharashtra with even Ministers in his own government condemning his statement. The BJP which initially backed the MLA has now kept a studied silence.https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/i-dare-you-to-touch-a-woman-in-the-state-says-supriya-sule-to-mla-who-threatened-to-kidnap-girls/articleshow/65708426.cms

Read More
  241 Hits

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार - सुप्रिया सुळे

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार – सुप्रिया सुळे गाव भेटी दरम्यान सुप्रिया सुळेंची माहिती

राजकुमार थोरातशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018वालचंदनगर - मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा ‘बारामती पॅटर्न’ इंदापूर तालुक्यामध्ये राबविणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. कळंब (ता.इंदापूर) येथे उपस्थित गाव भेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे, सारिका लोंढे, माजी सदस्य सुहास डोंबाळे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, रामचंद्र कदम, योगेश डोंबाळे, पिन्टू डोंबाळे, तुषार घाडगे, कालिदास राऊत उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये बारामतीमध्ये डॉ.तात्यासाहेब लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरासाठी झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने आले होते.त्यांनी असे शिबीर इंदापूर तालुक्यामध्ये घेण्याची विनंती केल्यामुळे लवकरच इंदापूर तालुक्यामध्ये मोफत मोतिबिंदू शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यामध्ये  एन्‍व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या वतीने आत्तापर्यंत ३८३० नागरिकांवरती मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.तसेच वयोश्री, अपंग शिबिराच्या माध्यमातुन अनेक जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली आहे. याचा दुसऱ्या टप्याचे काम ही लवकर सुरु होणार आहे. आमदार भरणे, सभापती जगदाळे, झेडपीचे सभापती माने हे विरोधी पक्षातील सरकार असताना देखील जास्तीजास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तिघांचे ही कौतुक केले.http://www.esakal.com/paschim-maharashtra/baramati-pattern-cataract-surgery-will-be-implemented-indapur-taluka-supriya

Read More
  239 Hits

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे रेडणी येथे कॉलेजची सोय करणार

वडापुरी - रेडणी (ता. इंदापूर) परिसरात दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावात शाळेची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने, मुलींच्या शिक्षणासाठी गावात अकरावी-बारावीची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी करताच खासदार सुप्रिया यांनी शिक्षणाला प्राधान्य देवून मुलींचे शिक्षण  पूर्ण व्हावे यासाठी रेडणी येथे कॉलेजची सोय करणार असून पाच वर्ग खोल्या देणार असल्याचे गाव भेटी वेळी आयोजित केलेल्या सभेवेळी सांगितले.यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, रहेना मुलाणी, विजयराव शिंदे, डी एन जगताप, बाळासाहेब चव्हाण, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला व मुलींचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे नागरिकांच्या असलेल्या समस्या व कामाबद्दल आपुलकीने चौकशी केली. काटी, रेडा, रेडणी, जाधववाडी परिसरात रस्ते, वीज व आरोग्य याची कामे झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे.  आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी या परिसरात दिल्याने गावाची विकास कामे झाली आहेत त्यामुळे दोघांचे सुळे यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींन बद्दल बोललेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी हरिभाऊ तरंगे किसन खाडे  आण्णा काळे अशोक निकम सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नाना तरंगे यांनी केले. http://www.esakal.com/pune/supriya-sule-give-priority-girls-education-rural-areas-142318

Read More
  247 Hits

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्याना इशारा

  VIDEOhttps://abpmajha.abplive.in/videos/breakfast-news-bulletin-ram-kadam-statement-issue-supriya-sule-demands-resignation-of-cm-fadnavis-582864

Read More
  236 Hits

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा ताईंच्या बातम्यांसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहापुणे, दि. १३ -  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संबंधित बातम्या, प्रेस रिलीज, व्हिडीओ आदी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी https://news.supriyasule.net/ ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक यांना सुप्रियाताईंच्या संदर्भातील माहिती, बातम्या पाहण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल.या वेबसाईटवर सुप्रियाताईंच्या संदर्भात देशभरातील वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेला मजकूर उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय त्यांचे ब्लॉग, लेख आदींचाही यामध्ये समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वृत्त पाहण्याची यामध्ये सोय आहे. याखेरीज ताईंची लेटेस्ट छायाचित्रे, प्रेस रिलीज यांचाही समावेश पेजवर करण्यात आला आहे.ही छायाचित्रे डाऊनलोड करण्याचीही सोय या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मुद्रित अथवा दृकश्राव्य माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार मित्रांसह सर्वानी या वेबसाईटचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
  503 Hits

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक

सकाळ वृत्तसेवागुरुवार, 13 सप्टेंबर 2018वडापुरी : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील 250 कुटुंबियांना घरकुल मंजूर होऊन गेली 30 वर्षे कालावधी झाला व आता गरीब कुटुंबातील नागरीक घरकुलामध्ये राहत आहेत. परंतु सदर जागा वनखात्याची असल्याने आता या लोकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे असल्याने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यांतील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्या आहेत.या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरीक या ठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे सामान्य जनतेला उभारी देणारी नाहीत, नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे या गावातील नागरीकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा काढावा, मी या भागाची खासदार म्हणून गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.तसेच इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कॅनॉल मधून पाझर तलाव भरावे अशी विनंती केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिले असल्याने तालुक्यातील जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.खासदार सुप्रिया सुळे यांचे लाखेवाडी गावात अभिनंदन -गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून येथील गरीब कुटुंबातील नागरीकांचा वन विभागाचे जागे संदर्भात समस्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सोडविल्या नाहीत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने लाखेवाडी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे.http://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-meets-collector%C2%A0-lakhevadi-village-taluka-indapur-143625

Read More
  281 Hits

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या अडचणी

शौकत तांबोळीबुधवार, 12 सप्टेंबर 2018नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. सुप्रिया सुळे या नरसिंहपूर परिसरातील गावभेट दौरावर होत्या. गणेशवाडी येथे त्यांच्या गाड्यांचा ताफा शालेय विद्यार्थ्यांनीनी अडवून सदरची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, अशोक घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रियंका खडागळे ही विद्यार्थिनी म्हणाली की बावडा - नरसिंहपूर राज्य मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस आहे. परंतु मोडकळीस आलेल्या, खराब, स्क्रॅप, ब्रेकफेल होणारे एसटी बसेसमुळे आम्हाला अनेकदा शाळा बुडवावी लागली आहे. अनेकदा तर परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चालत जावे लागले आहे.आठवड्यातून दोन दिवस शाळा चुकत असते असे वैष्णवी खंडागळे यांनी सांगितले. तसेच सोनाली खंडागळे, अंकिता भोसले, साक्षी कांबळे, सोनाली जाधव, मनिषा खंडागळे आदि विद्यार्थ्यीनीनी सुळे यांच्याशी बोलताना तक्रारी सांगितले.खासदार सुळे म्हणाल्या, यासंदर्भात मी व भरणेमामा परिवहन मंत्र्यांना भेटून चर्चा करून प्रश्न निकाली काढतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवावे असे आवाहन केले. ताई तुम्ही आमच्या काही विद्यार्थ्यीनीनी सायकल दिल्याने थोडासा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे तुमचे आमच्या व कुटुंबियांचा वतीने खूप खूप आभारी आहे. यापुढेही असाच लोभ राहावा, असेही या विद्यार्थिनींनी आवर्जून सांगितले. http://www.sarkarnama.in/students-stop-mp-supriya-sules-convoy-28564

Read More
  300 Hits

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ; खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ; खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप मोदी मौन बाळगून का आहेत

मुंबई : प्रतिनिधी पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड,बलात्कारअशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार असा संतप्त सवालही खासदार त्यांनी यावेळी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे असा आरोप करतानाच त्या घटनेचा जाहीर निषेध त्यांनी केला. https://www.marathiebatmya.com/ncp-supriya-sule/

Read More
  265 Hits

‘महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान गप्प का?’

‘महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान गप्प का?’ सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका

मटा ऑनलाइन | Updated:Sep 15, 2018, 06:03AM ISTपुरोगामी भारतात महिलांवरील अन्याय-अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. याबाबत ते मौन बाळगून का आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला. हरयाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करायला हवा. महाराष्ट्रातही सातत्याने मुलींची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होऊन बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या गुन्हे अहवालात अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. याचे उत्तर कोण देणार आहे, असा सवाल सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींचे अपहरण करून उचलून नेण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. हे या सरकारचे अपयश आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/supriya-sule-criticises-narendra-modi-on-womens-safety-issue/articleshow/65815551.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=PMModi150918

Read More
  260 Hits

'आरोग्य परिषदेतील मुद्द्यांवर शासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेणार'

'आरोग्य परिषदेतील मुद्द्यांवर शासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेणार'

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- आरोग्य परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरचे एक शिष्टमंडळ, आरोग्य मंत्रालय आणि अर्थ विभाग यांची पुढील आठवड्यात एक बैठक घेऊन शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मुंबईत १२ मे रोजी राज्यस्तरीय आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली होती.'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना : उपयुक्तता, भूमिका, सल्ला आणि दुरूस्त्या' या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व डाॅक्टर्स उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, "कोरोना काळात राज्य शासनाने नागरिकांना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरचे एक शिष्टमंडळ, आरोग्य मंत्रालय आणि अर्थ विभाग यांची पुढील आठवड्यात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येतील." कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल अजित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे काैतुक केले. या परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित राहून राजेश टोपे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवकांचे अनुभव ऐकून घेतले. त्यांच्या मागण्या पूर्ण करून आरोग्य सेवा क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, " महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी यंदा शासनाने १७०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या योजनेतील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी केली आहे. त्याचबरोबर या योजनेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करण्यात आल्याने 'युनिव्हर्सल योजना' म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेचा अनेकांना लाभ झाला आहे'. आरोग्य क्षेत्रातील शासकीय तरतुदींबाबत बोलताना टोपे यांनी आरोग्य विभागासाठीची तरतूद ४ टक्यावरून ८ टक्के करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दिव्यांग अस्मिता अभियानार्तंगत एक लाख दिव्यांगांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परिषदेच्या सुरूवातीला खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आरोग्य परिषद आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. त्या म्हणाल्या, "आरोग्य विभागावर थेट प्रभाव टाकणा-या योजनांमधील त्रुटी दुर करणे त्याचबरोबर केंद्राची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनांचे ऑडिट करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे. महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. आपल्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर केंद्राने आयुष्मान योजना लागू केली. या परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आपण लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊ". राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही परिषदेत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "धर्मादाय रुग्णालयांची देखरेख समिती कायम केल्यास राज्याच्या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवता येईल. त्याशिवाय अनेक आरोग्य सुविधा रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध आहेत. त्याचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." अशी माहिती तटकरे यांनी दिली.

Read More
  368 Hits

Are laws meant to curb crime against women being implemented,

Press Trust of India  |  Mumbai Last Updated at September 15, 2018 16:20 ISTIn the wake of the Haryana gangrape incident, NCP MP Supriya Sule Friday asked Prime Minister Narendra Modi if laws that are meant to prevent atrocities against women were really being implemented.She said the PM should break his silence over the issue.A 19-year-old student was allegedly raped by three men in Haryana's Mahendergarh district after being abducted Wednesday afternoon."As a woman, I demand justice from the prime minister who speaks about 'Beti Padhao, Beti Bachao'," Sule said in a statement."There is nothing to show what is said is being implemented. There are laws to prevent atrocities against women, but are these laws being implemented? Modi should break his silence and respond," the Lok SabhaMP from Baramati said.Citing a state government data, Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000."While a ruling party legislator openly talks about kidnapping women and Chief Minister Devendra Fadnavis, who is also the state Home Minister, keeps mum," Sule said referring to BJP MLA Ram Kadam's "will kidnap the girl" remarks. (This story has not been edited by Business Standard staff and is auto-generated from a syndicated feed.) https://www.business-standard.com/article/pti-stories/are-laws-meant-to-curb-crime-against-women-being-implemented-118091500444_1.html

Read More
  275 Hits

Supriya Sule slams Modi govt over safety of women

THE ASIAN AGE.Published : Sep 16, 2018, 1:02 am ISTUpdated : Sep 16, 2018, 1:02 am ISTCiting a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000.Mumbai: The Nationalist Congress Party (NCP) leader Supriya Sule Saturday questioned if the laws meant to protect women are being implemented properly. Reacting to the incident of gang-rape in Har-yana, Ms Sule said that Prime Minister Naren-dra Modi should break his silence over the issue.Ms Sule in her statement asked Mr Modi if laws that are meant to prevent atrocities against women were really being implemented. Three men in Haryana’s Mahend-ergarh district allegedly raped a 19-year-old student on Wednesday afternoon. “As a woman, I demand justice from the Prime Minister who spe-aks about ‘Beti Padhao, Beti Bachao’,” Ms Sule said in a statement.“There is nothing to show that what is said is being implemented. There are laws to prevent atrocities against women, but are these laws being implemented? Mr Modi should break his silence and respond,” added Ms Sule.Citing a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000. “While a ruling party legislator openly talks about kidnapping women, the chief minister Devendra Fadnavis, who is also the state home minister, keeps mum on the issue,” said Ms Sule referring to BJP MLA Ram Kadam’s “will kidnap the girl” remarks.  Meanwhile, the NCP has been aggressively campaigning against the failure of Union government on social networking sites for last few days. Using #JawabDo, Ms Sule and her party colleagues have been raising issues affecting people every day.http://www.asianage.com/metros/mumbai/160918/supriya-sule-slams-modi-govt-over-safety-of-women.html

Read More
  334 Hits

“दुष्काळ सेस’च्या रकमेचे काय केले?

खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना ट्‌विटप्रभात वृत्तसेवा पुणे – “दुष्काळ सेस’च्या नावाखाली पेट्रोलवरील लावलेल्या अधिभाराच्या रकमेतून नेमके काय केले, त्याची आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यासंदर्भातील ट्‌विट सुळे यांनी केले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे पावसाचे दुर्भिक्ष असते. त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांच्या हिताचे नाव देत राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पेट्रोलवर “दुष्काळ सेस’ लावला. प्रतिलिटर तीन रुपये असा त्याचा दर आहे. आज देशातील सर्वात महागडे पेट्रोल महाराष्ट्रात विकले जाते. दराने नव्वदी गाठली आहे. सेसमधून मागील तीन वर्षांत ते पैसे जमा केले, त्याचा पडताळा जाहीर करावा. महाराष्ट्राला रोजच्या रोज किती पेट्रोलची गरज आहे, त्यातील प्रत्यक्ष विक्री किती होते? त्यातून शासनाला किती महसूल मिळतो, दुष्काळ सेस अंतर्गत किती रक्कम जमा झाली, त्यातील किती रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली, कोणत्या नव्या कृषीयोजना आणल्या, त्याचा किती शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, किती शेतकऱ्यांची कर्जे फिटली, किती शेतकरी कायमचे कर्जमुक्‍त झाले याची सविस्तर आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.कर्जमाफीसाठी या सरकारने शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतके करूनही पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचे लाभ पोहोचलेही नाहीत. एक चूक झाली तर अर्ज अपलोडच होत नव्हता, असे असताना शेकडो गोरगरीब शेतकऱ्यांना “बोगस’ ठरवले गेले, असा आरोप सुळे यांनी केला आहे.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95/

Read More
  280 Hits

'गुजर-निंबाळकरवाडीतील प्रस्तावित रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडवणार'

खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाहीपुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – गुजर-निंबाळकरवाडी येथील प्रस्तावित पीएमआरडीएच्या रिंगरोडमुळे या भागातील काही नागरिकांची घरे बाधित होत आहेत. त्यांची घरे पाडण्यापेक्षा यातून सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे. यादृष्टीने मी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथील नागरिकांना दिली. गुजर-निंबाळकरवाडी या गावातून रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातून रस्त्याला विरोध होत आहे. येथील सर्व्हे क्रमांक १२ मधील अनेक घरे या रिंगरोडमुळे उध्वस्त होणार असून त्यांचे संसार उघड्यावर येतील. या कुटुंबांचा विचार करावा, आणि आपण याकामी लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आज सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. वास्तविक रिंगरोडचा प्रस्ताव १९९७ मध्ये आला. त्यानंतरही या भागात जागा विक्री होत राहिली. अनेकांनी जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. त्याचवेळी येथील जमीन खरेदी विक्रीला पायबंद घातला असता तर ही वेळ आली नसती. असे न करता याठिकाणी घरे उभारू दिली आणि आता १९९७ च्या प्रस्तावानुसार रिंगरोडसाठी जागेची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मोजणी होताच घरे पडली जातील. या भीतीने येथील अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. पीएमआरडीएने याबाबत सर्वसमावेशक तोडगा काढावा, त्यासाठी सुळे यांनी मध्यस्ती करावी, अशी मागणी येथोल नागरिकांनी निवेदनात केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेत सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात लोकांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढावा, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Read More
  506 Hits

लालबागच्या राजाला अजितदादा-सुप्रियाताईंचे साकडे

सरकारनामामंगळवार, 18 सप्टेंबर 2018 मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि 'महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे' असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली. http://www.sarkarnama.in/ajit-pawar-supriya-sule-offer-prayaers-lalbagchaa-raja-28816

Read More
  325 Hits

तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे

बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 20, 2018 01:59 AM | Updated: September 20, 2018 01:59 AM बारामती : मुले चांगल्या शिक्षकांमुळेच हुशार होतात. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या टॅबवर माझा अजिबात विश्वास नाही. या टॅबमुळे मुले अजिबात हुशार होत नाहीत. तंत्रज्ञानावर फार जोर देऊ नये. बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील गदिमा सभागृहात आदर्श शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचा खासदार सुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, पंचायत समिती उप सभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.http://www.lokmat.com/pune/do-not-stress-technology-supriya-sule/

Read More
  287 Hits

या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सुप्रिया सुळे

मिलिंद संगई11.26 AMबारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत, राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णतः निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिध्द करणारी असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणा-या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर टीका केली आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sule-ask-question-cm-about-rape-incident-145106

Read More
  437 Hits