1 minute reading time (224 words)

[sakal]राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच, 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछो

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच, 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछो

सुप्रिया सुळेंचं विधान

मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. हे मृत्यू वाढत चालले असून शरद पवार गटाच्या खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे आज भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता वाढविण्यासाठी भाजपाने प्रचंड खर्च केला आहे. अजित दादा पाच वर्षे मुख्यमंत्री होणार असे फडणवीस म्हणतायत ही चांगली गोष्ट आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे. 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछके देखो', राष्ट्रवादी पक्षाचे आई आणि बाबा दोन्ही शरद पवार आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान जबाबदार व्यक्ती बोलतात की पक्ष यांचा, चिन्ह त्यांचे, मात्र पेपर न देता यांना रिझलेट कसा समजला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. यावेळी नांदेडमध्ये झालेल्या मृत्यूबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून टीका केली. त्या म्हणाल्या की, देवेंद्रजी पवार साहेबांना काही बोलले तरी चालतील पण नांदेडची लोकं वाचवा.

...

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच, 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछो'; सुप्रिया सुळेंचं विधान| Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून टीका केली. त्या म्हणाल्या की, देवेंद्रजी पवार साहेबांना काही बोलले तरी चालतील पण नांदेडची लोकं वाचवा.
[tv9marathi]अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार...
[maharashtra24]गेले ५६ वर्षे शरद पवार एकही निवडणूक...