1 minute reading time (276 words)

[maharashtradesha]जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. या सरकारने जबाबदारीचा त्याग केला आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश-कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात. या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?"

दरम्यान, या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत.

ठाण्यातील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 27 मृत्यू, नांदेडमध्ये एकाच दिवसात 24 मृत्यू, काल घाटी (संभाजी नगर) येथे जवळपास 20 जणांचा मृत्यू, तर आज नागपूरमध्ये 24 तासात 25 जणांचा मृत्यू. इतक्या भयंकर घटना घडत आहेत.

यावर हे ट्रीपल इंजिनच राज्य सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्री अवाक्षर काढायला तयार नाहीत. या रुग्णालयात पुरेश्या सुविधा नाहीत, स्टाफ ची कमकरता आणि औषधांचा पडलेला दुष्काळ गोर गरीब रुग्णांच्या जीवावर बेततो आहे.

...

Supriya Sule | जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? - सुप्रिया सुळे

Supriya Sule | नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील 27, नागपूर येथील रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
[maharashtra24]गेले ५६ वर्षे शरद पवार एकही निवडणूक...
[loksatta]अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना...