1 minute reading time (141 words)

[ABP MAJHA]संसदेत बोलले की माझ्या नवऱ्याला नोटीस येते,सुळेंचं झंझावाती भाषण

संसदेत बोलले की माझ्या नवऱ्याला नोटीस येते,सुळेंचं झंझावाती भाषण

सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण, गोरगरीब सामान्य लोकांच्या औषधासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. 50 खोके. एकदम ओके सरकारला औषध घ्यायला पैसे नाही. 21 व्या शतकात औषधे कमी कशा पडतात? ईडी, सीबीआयमधून थोडा वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी जरा राज्यात लक्ष द्यावे. मुंबईत मराठी महिलांना घर मिळत नाही हे सरकार काय करत आहे? भाजप महाराष्ट्रात वेगळं आणि दिल्लीत वेगळं बोलतात अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. तर, राज्यातील तीन पक्षाच्या सरकारवरही त्यांनी बोचरी टीका केलीय. मी लोकसभेत बोलली की माझ्या नवऱ्याला नोटीस येते. मी त्याला आता नोटीस नाही तर लव लेटर म्हणते. ते म्हणतात पक्ष आणि चिन्ह आमचं आहे. अरे एकदा घेऊन तर बघा. मला हे कळत नाही हे त्यांना कसं कळतं. चार पक्ष फिरून आलेले लोक आम्हाला सांगणार का? पक्ष आमचा, चिन्ह आमचा नेऊन तर बघा. महाराष्ट्रातल्या लेकी दिल्लीसमोर झुकणार नाही असे आव्हान त्यांनी अजितदादा गटाला दिले.

[ABP MAJHA]राष्ट्रवादी काँग्रेस फुटीबाबत सुप्रिया ...
[sakal]दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प...