2 minutes reading time (447 words)

[abp majha]राज ठाकरेंचं मनापासून कौतुक-सुप्रिया सुळे

राज ठाकरेंचं मनापासून कौतुक-सुप्रिया सुळे

बारामती (Baramati) : "राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, परंतु शिवसेना माझीच असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं.

खासदार सुप्रिया सुळे सध्या दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इथल्या गणेश मंडळांना भेटी देण्याचा सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे. त्यांनी दौंड इथे गणपतीची आरती केली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज ठाकरेंचे कौतुक करते. त्यांचे जेव्हा पक्षामध्ये मतभेद झाले तेव्हा त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली, त्यांनी वेगळा पक्ष म्हणजेच मनसेची स्थापना केली. राज ठाकरेंचे कौतुक करते. त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले असतील. पण शिवसेना माझीच आहे असे वक्तव्य त्यांनी कधीही केले नाही. हे कटकारस्थान दिल्लीतून सुरु आहे. अदृश्य हात याच्या पाठीमागे आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि मराठी माणसांचे घर पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे. यांचे यश भारतीय जनता पक्षाला सहन होत नाही."

बाळासाहेब आणि शरद पवारांविरोधात भाजपचं कटकारस्थान

दुसरीकडे नागालँडमधील सातही आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. नागालँडमधील आमदार तीन दिवसीय दौऱ्यात मंगळवारी अजित पवारांची भेट घेणार आहेत. यानंतर शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत नागालँडमध्ये शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. याविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बघूया, ते आमदार काय बोलतात. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन केंद्र सरकार सगळेच पक्ष आणि भारतीय जनता पक्ष तर महाराष्ट्राचा द्वेष करते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी शून्यातून स्वतःचे राजकारण उभे केले आहे. या दोन मराठी सुपुत्रांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटकारस्थान करत आहे. मराठी माणसांनी जो पक्ष स्थापन केला तो मोडायचा आणि भारतीय जनता पक्ष दडपशाही करत आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या विरोधात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'भाजपला लोकशाही नाही तर दडपशाही हवी'

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकारांबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करते. पारदर्शक सत्य मांडण्यासाठी या देशाने लढा लढला. भाजपला लोकशाही नाही तर दडपशाही हवी, असंही त्या म्हणाल्या.

...

Baramati Political News NCP MP Supriya Sule Praises Raj Thackeray For Not Claiming Shiv Sena | Supriya Sule : राज ठाकरेंचं मनापासून कौतुक, कारण.... : सुप्रिया सुळे

Baramati News : 'राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, परंतु शिवसेना माझीच असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नाही,' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं.
[Saam TV ]सुप्रिया सुळेंचा अनोखा अंदाज, लावणी म्हण...
[nation news marathi]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्य...