1 minute reading time (96 words)

[Zee 24 Taas]सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध

सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला नागपूर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा

खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत असेल. आठवड्यातून तीन वेळा ते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी भेटायचे. सहा जनपथ जसे माझे घर होते तसेच त्याचे पण घर होते. पक्षाला जे यश मिळाले ते प्रफुल पटेल यांच्यामुळे मिळालं आणि अपयश हे माझ्यामुळे असेल तर ते मी स्वीकारते, यालाच लीडरशिप म्हणतात."

[loksatta]“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील...
[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळें...