India in Transition…

India in Transition…

Namskar! At the very onset I would like to extend my heartfelt wishes to all on the occasion of Makar Sankrant. Sankrat symbolises transition, the beginning of Uttarayana, one of the distinct characteristics of our galaxy.India is undergoing a similar transition. In their unprecedented press conference, the Supreme Court judges appealed to the people of this country to save Democracy. The appealants are those who are expected to deliver justice to every common man and woman of this great democracy in the highest court of law. But even they have now appealed to the people of this country, the most powerful court of India. The world is watching these events as an angst of Indian democracy. At this time, we all have the responsibility to fight the decisive battle against this Manuwadi authoritarian regime. Starting today, this blog from me will be a small but determined part of this battle.Almost three and half years have passed since the people of this great country elected the Narendra Modi government at the Centre. Next year, on this day, the election ball would have set rolling. But as a citizen of this nation, we must ask one critical question. What have we really achieved in the last three and half years? The manner in which Modiji’s call for ‘Acche Din’ was received by the people was astounding, but did the government subsequently show any respect towards the people’s sentiments?Last week, I happened to stumble upon a television interview of former Finance Minister and senior BJP leader Yashwant Sinha. He articulated in precise words, what not only me and my other colleagues within the NCP but millions of Indians have been feeling largely. He said, “Mandate of 2014 has been wasted completely.”In 2014, the country received its first government with absolute majority for the first time in the last 30 years. Following the murder of Indira Gandhi, Rajiv Gandhi attained power with an unprecedented majority. It was this power which became the stepping stone for Rajivji’s vision to take India towards the 21st century, transforming it into a pragmatic powerhouse of the world. As a part of his vision he laid the foundation of the digital revolution in this country. Using this foundation, the Indian youth with their in-built hardworking capability and stubbornness projected India as an IT superpower to the world. This is called foresight and ingenious implementation of policies to fulfill the vision.What is in store for us today? Which vision did Modiji show with his massive public support of 2014? Which are the schemes that he introduced to propel India’s development?Let’s examine one of his schemes as an example. Make in India! The fact is that it has been nothing but only an announcement. I often visit Chakan industrial area in Pune district. Once upon a time, this area with bustling activity was well-known for the production of complex components for the automobile industry. Today, the deafening silence will take your breath away. Hundreds have lost their jobs. Medium scale industry, earlier working on double shifts, is closed. This is the real picture of Modiji’s Make in India. This is not Make in India, but ‘Brake’ in India. This government has applied brakes to India’s development.Agriculture is affected far worse than the industrial sector. Recently, I along with all my colleagues in the Nationalist Congress Party walked from Yavatmal to Nagpur, covering over 150 kilometers. This was a part of our ‘Halla Bol’ agitation against the government and its anti-people policies. Maharashtra has witnessed over 10,000 farmer suicides in the last 3 years. Sadly, Yavatmal tops the chart. Hundreds of citizens joined us at different stages of our protest. We witnessed the pink bollworm pest destroying the cotton crop and the state government’s absolute neglect. 37 farmers have lost their lives due to pesticides. This is horrible. And yet, no firm action has been taken against the responsible officers. We are seeing...

Read More

ब्लॉगच्या निमित्ताने..

ब्लॉगच्या निमित्ताने..

माझे वडील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रेरणेने मी राजकारणात पाऊल ठेवले. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडुन जाण्यापुर्वी मी २००६ साली राज्यसभेवर बिनविरोध निवडले गेले. त्यानंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही सार्वत्रिक निवडणूकीत जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेत निवडून गेले. राजकारण आणि समाजकारणाचे जवळपास एक तप म्हणजे बारा वर्षे पुर्ण झाले आहेत. दरम्यानच्या काळात व्यक्त होणारी माध्यमेही कमालीची बदलली आहेत. वर्तमानपत्रे, टिव्ही, रेडिओ ही पारंपरिक माध्यमे तर सक्रीय आहेतच पण आता डिजीटल माध्यमेही तितकीच सक्रीय आहेत किंबहुना या माध्यमांतून व्यक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माझा पक्ष नेहमीच नाविन्याचे स्वागत करतो. नव्या विचारांना आम्ही वारंवार व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळेच डिजीटल माध्यमातून जनता, कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी संवाद साधावा असे गेल्या काही दिवसांपासून मनात होतेच. त्यातच देशातील सद्यस्थिती, गेल्या काही वर्षांत विशेषतः २०१४ नंतर विस्कटलेली सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय घडी हे सर्व पाहता आपण यावर वेगळ्या माध्यमातून व्यक्त होणं महत्त्वाचं आहे असं मला सातत्याने वाटत होतं. आजच्या तरुणांचा ओढा हा डिजिटल माध्यमांकडे आहे. ते तेथे मोकळेपणाने व्यक्त होतातही. त्यामुळेच ब्लॉगसारख्या डिजिटल माध्यमातून आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत या भूमिकेतून मी ‘ब्लॉगर’च्या भूमिकेत शिरत आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेतच. माझे सर्व ब्लॉग/विचार आपणा सर्वांना http://blogs.supriyasule.net या माझ्या ब्लॉग साईटवर वाचायला मिळतील. – सुप्रिया सुळे  ब्लॉगच्या निमित्ताने.. 

Read More

पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह

पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह

सर्वपक्षीय आणि सामाजिक धुरिणांनी संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा लाँग मार्च निघणार असून शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल यासारखे नेते सहभागी होणार आहेत. 26 जानेवारीला मुंबईत मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्यापासून गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून हा संविधान बचाव मार्च निघणार आहे. खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयूचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल, काँग्रेसचे गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारे गणेश देवी यामध्ये सहभागी होणार आहेत. 26 जानेवारीला मंत्रालय ते गेट वे मार्च पूर्ण झाल्यानंतर 2 तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्यातील काँग्रेस नेते सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.  पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह 

Read More

गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या इंदापुरात बोलत होत्या. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते”. गिरीश बापट काय म्हणाले होते?वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या.पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या, असं गिरीश बापट म्हणाले होते. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते. डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं.  https://www.youtube.com/watch?v=xcYmbnfgj8I

Read More

माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे

माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे

डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांची 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन, मैत्रीण निर्दोष सुटल्याचे सांगत न्याय मिळाल्याची भावना बोलून दाखवली.2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयकडे आणि एक अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यात सीबीआय कोर्टाने सर्व 17 आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांचाही समावेश आहे.“माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला आहे. So happy for my friend kanni.. justice done🙏🏽🙏🏽🙏🏽😀 @KanimozhiDMK pic.twitter.com/NffxsIE1ww — Supriya Sule (@supriya_sule) 21 December 2017काय आहे घोटाळा?मोबाईलच्या वापरासाठी याआधी ध्वनीलहरी मर्यादित स्वरुपात होत्या. वाढत्या मोबाईलच्या वापरानंतर ध्वनीलहरींची मर्यादा केंद्र सरकारने हटवली. यूपीए सरकारने हा निर्णय घेतला. ध्वनी लहरींची सेकंड जनरेशन म्हणून टूजी म्हटलं गेलं.तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजांवर स्पेक्ट्रम वाटपात गैरकारभार केल्याचा आरोप झाला. टेलिकॉम कंपन्यांकडून बोली मागण्याऐवजी जो प्रथम येईल, त्याला स्पेक्ट्रम वाटप केलं गेलं. स्वान टेलिकॉमसारख्या अनेक कंपन्यांना फायदा पोहोचवण्यात आल्याचा ठपका आहे.2G स्पेक्ट्रम घोटाळा पहिल्यांदा 2010 साली समोर आला होता. टूजी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे 1 लाख 76 हजार कोटींचं नुकसान देशाला सोसावा लागल्याचा दावा कॅग रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा रिपोर्ट 2010 मध्ये आला  होता.या घोटाळ्याप्रकरणी दोन याचिका सीबीआयने दाखल केल्या होत्या, तर एक अंमलबजावणी संचलनालयने दाखल केली होती.

Read More

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं.  <blockquote class="twitter-video" data-lang="en-gb"><p lang="mr" dir="ltr">पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा <a href="https://twitter.com/hashtag/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#हल्लाबोल</a> सुरू या <a href="https://twitter.com/hashtag/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#खोटारड्या</a> सरकारवर.!!<br>आजचा मार्ग भिडी - कस्तुरबा ग्रामीण स्वास्थ्य केंद्र - रत्नापुर - दापोर<br>एकपाला फाटा -देवळी - हिंगणघाट फाटा <br>या सर्वांनी सामील व्हा.!! <a href="https://t.co/wIjvfPD0mx">pic.twitter.com/wIjvfPD0mx</a></p>&mdash; Supriya Sule (@supriya_sule) <a href="https://twitter.com/supriya_sule/status/937543213417603072?ref_src=twsrc%5Etfw">4 December 2017</a></blockquote><script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>  तर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही पदयात्रेदरम्यान आदिवासी मंडळींसोबत फुगडी घातली. दुसरीकडे एका नवरदेवाने हल्लाबोल पदयात्रेत सहभागी होऊन अजित पवार, सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत सेल्फीही काढला. विशेष म्हणजे अजित पवारांनी नवरदेवाला लग्नाचा आहेरही दिला.  हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका 

Read More

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.", असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले. शिवसेनेचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे का? "भाजप आणि शिवसेना एका सरकारमध्ये काम करतात. काल शिवसेनेने 'घोटाळेबाज भाजप!' नावाची एक पुस्तिका काढली आहे. जर एवढे घोटाळेबाज भाजप असेल, मग शिवसेनेची क्रेडिबिलिटी काय? तुम्ही करप्शनला सपोर्ट करता? हा प्रश्न मला शिवसेनेला विचारायचा आहे. तुम्ही सत्तेसाठी इतके स्वत:ला कॉम्प्रमाईज करता? तुम्ही भ्रष्टाचारालापण सपोर्ट करता?", अशा प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केली. सेनेच्या खोट्या डरकाळ्या! "खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला. सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे : - खड्ड्यांबाबत चंद्रकांतदादांच्या 18 डिसेंबरच्या डेडलाईनचं स्वागत - सुप्रिया सुळे- सरकार जाहिराती उत्तम करतंय, अतिशय सुंदर - सुप्रिया सुळे- सरकार किती सफाईने खोटं बोलतं, याची खरंतर दाद दिली पाहिजे - सुप्रिया सुळे- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली - सुप्रिया सुळे- सरकारमध्ये कुणीही गंभीर नसल्यासारखं वाटू लागलंय - सुप्रिया सुळे- निवडणूक जिंकणं, ही एक गोष्ट आणि प्रशासनात काम करणं, ही वेगळी गोष्ट - सुप्रिया सुळे- सरकारला डायलॉग करायचा नाही, हे सातत्याने दिसतंय - सुप्रिया सुळे- एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आम्ही कायम उभे राहणार - सुप्रिया सुळे- 'घोटाळेबाज भाजप' पुस्तिका काढूनही शिवसेना सत्तेत का? शिवसेना भ्रष्टाचाराला सपोर्ट करते का? - सुप्रिया सुळे- पवारसाहेबांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध - सुप्रिया सुळे- फेरीवाल्यांच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न आहे, तेही गरीब आहेत, मारहाण करुन प्रश्न सुटणार नाहीत - सुप्रिया सुळे- भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती, कामं करा, जाहिरताबाजीने काही होणार नाही - सुप्रिया सुळे VIDEO : सुप्रिया सुळेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://www.youtube.com/watch?v=C_A59H_cBXo भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे 

Read More

सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा'

सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे.कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी लिहिले आहे, "#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat. @ChDadaPatil" #Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5 — Supriya Sule (@supriya_sule) 1 November 2017अगदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंच्या या 'सेल्फी विथ खड्डे'ला महत्त्वं प्राप्त झालं आहे.दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटखाली आता राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक खड्ड्यांसोबतचे फोटो शेअर करत असून, व्यथाही मांडत आहेत.आता खड्ड्यांविरोधातील हा ऑनलाईन आवाज तरी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहेचेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा' 

Read More

ओवाळीते भाऊराया...सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीज!

ओवाळीते भाऊराया...सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीज!

देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. "दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!!" असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील 'गोविंदबाग' या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या

Read More

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट

राज्यभर सुरू असलेल्या बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यावेळी पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क आपल्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट दिली. एकीकडे बसच्या संपानं त्रस्त असलेल्या प्रवाशांना सुप्रिया सुळेंनी दिलेल्या लिफ्टमुळे आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी प्रवाशांनी एसटी संपाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. आज सकाळच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांशीही त्यांनी बातचीत केली. त्यानंतर काही प्रवाशांना त्यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या संपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कोकणच्या ग्रामीण भागातून शहरात यायचे महत्वाचे माध्यम एसटी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोकणच्या ग्रामीण भागात कालरात्री वस्ती करिता आलेल्या गाड्या शहरात दाखल झाल्या, पण आज सकाळपासून एकही बस रत्नागिरी स्थानकातून सुटलेली नाही. जे चाकरमानी मोठ्या शहरातून आज दिवाळीनिमित्ताने कोकणात दाखल झाले आहेत, त्यांना शहरातून आपल्या गावात पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नव्हत्या . एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते. किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या? राज्यात एसटी कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे. दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.  खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट 

Read More

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : सुप्रिया सुळे

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : सुप्रिया सुळे

‘1 जानेवारीपर्यंत कोपर्डी घटनेचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रीवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. ‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे आता या खटल्याचा निकाल नेमका कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कारअहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्रीमुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले होते, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.” ...अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : सुप्रिया सुळे  

Read More

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिवाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, पारदर्शी मुख्यमंत्री राज्यातील माध्यमांना न्याय देतील असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कर्जमाफीबाबत सरकारवर ताशेरे ओढताना, आपल्याला कर्जतमध्ये एक तरुण भेटला, कर्जमाफीसाठी कागदे गोळा करायला त्याने 400 रुपये खर्च केले आणि त्याच्या 2 खात्यात केवळ 130 रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली, असं सांगत आपण हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असून, या सरकारने दिलेला शब्द पाळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  https://www.youtube.com/watch?v=XFGztIsLyzs  https://www.youtube.com/watch?v=pLsAqJEk9-0  कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

Read More

वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला

वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला

आधार कार्डच्या आधारे ओळख पटवण्यात वृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध शेतकरी यांना पेन्शन काढताना, रेशन खरेदी करताना आधार व्हेरिफिकेशन होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे अनेकदा वृद्ध शेतकऱ्यांच्या हातावरच्या रेषा झडतात. या बोटांचे ठसे मशीनवर व्यवस्थित घेता येत नाहीत. त्यामुळे मुळात या व्यक्तींना आधार कार्ड बनवण्यातच अडचणी येतात. सध्या मोबाईल सिम कार्डशीही आधार लिंक करण्याचा सरकारचा आदेश आहे. शिवाय पगार, पेन्शन काढताना इतर सरकारी सबसिडी मिळवतानाही आधार कार्डचीच सक्ती आहे. त्यामुळे या लोकांना ही गरजेची कामं करताना अडचणी येत आहेत. रेशनकार्ड खरेदी करतानाही अनेक ठिकाणी पीओएस मशीनवर या लोकांच्या बायोमेट्रिक्सची ओळख नीट पटत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी जेटलींकडे केली. शिवाय या व्यक्तींच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, याबाबत स्थायी उपाययोजना करेपर्यंत त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डशिवाय इतर कागदपत्रांना ग्राह्य धरण्यात यावं, अशीही विनंती त्यांनी केली.  वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला 

Read More

हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली.  आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF — Supriya Sule (@supriya_sule) 7 August 2017सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे.हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

Read More

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र दिल्लीत आपला ठसा कायमच उमटवत आला आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. ‘स्वच्छता मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांनी सुरु केली’ ‘पंतप्रधान मोदींनी आता जरी स्वच्छेतेची मोहीम हाती घेतली असली तरी या मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वीच आर. आर. पाटील यांनी केली होती.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वच्छता मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसनच सुरु केल्याचं ठासून सांगितलं. राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन आई-वडील आणि सासू-सासरे सोडून मला कोणाचीही भीती नाही : सुप्रिया सुळे महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हायल हवं : सुप्रिया सुळे ठिबक सिंचन आणि पाण्याच्या उपलब्धतेवर काम गरजेचं : सुप्रिया सुळे आत्महत्यामुक्त आणि कुपोषणमुक्त महाराष्ट्र व्हायला हवं : सुप्रिया सुळे शिक्षण क्षेत्रात भरीव काम होणं गरजेचं : सुप्रिया सुळे स्वच्छतेची सुरुवात दिल्लीतून नाही, तर 17 वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी सुरु केली : सुप्रिया सुळे व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

Read More

फुरसुंगीची कचराकोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले

फुरसुंगीची कचराकोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले

पुण्याला कचऱ्यामध्ये सोडून परदेश दौऱ्यावर गेलेल्या महापौर मुक्ता टिळक अखेर पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या आंदोलकांसोबक बिबवेवाडीत मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दुपारी होणाऱ्या बैठकीत तरी पुण्याची कचराकोंडी सुटते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. फुरसुंगी आणि उरळी देवाची मधील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याचं निवेदन त्यांनी दिलं होतं. पुण्यातल्या कचऱ्याला आता राजकीय दुर्गंधीही येऊ लागली आहे. फुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही, तर राजीनामा देईन, असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला होता. येत्या 15 दिवसात तोडगा निघाला नाही, तर स्वत: फुरसुंगीकरांसोबत आंदोलनाला बसेन असंही शिवतारे म्हणाले होते. काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न? पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो. त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

Read More

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. आपण सत्तेत आहोत कि विरोधात आहोत, याचंच त्यांना भान राहात नाही, अशी टीका सुळे यांनी यावेळी केली. शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका 

Read More

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी”मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी शिवसेना, भाजपच्या मुंबईतील कारभारावरही टीका केली. “…म्हणून भाषणात ‘नागिण’ संबोधलं”कुंडल्यांसदर्भातील मुंख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यास, त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार "  “2019 पूर्वीच राज्याची निवडणूक येऊ शकते”"शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान झालं. यांचं जनतेकडे लक्ष नाही. राज्य सरकारची निवडणूक 2019 च्या आधीही येऊ शकते. या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे) पडली.", असे म्हणत मध्यवधी निवडणुकांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी मत मांडलं. "होय, आमच्या घरात घराणेशाही""होय, आमच्या घरात घराणेशाही आहे. मात्र, आम्ही लोकांमधून निवडून आलोय. घराणेशाहीमुळे तुम्ही एखाद्या वेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच", असे सुप्रिया सुळेंनी घराणेशाहीबाबत बोलताना सांगितले. मात्र, माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत आघाडीशी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आम्ही एका ताटात जेवलो आहे, त्यामुळे त्यांच्यावर करणार टीका नाही, असे सुप्रिया सुळे काँग्रेसबद्दल म्हणाल्या. शिवाय, राहुल गांधी अतिशय चांगला सहकारी ही माझी भूमिका आहे, असेही त्यांनी न विसरता सांगितले. खासदार सुप्रिया सुळेंचे ‘माझा कट्टा’वरील महत्त्वाचे मुद्दे :  जेंडरमध्ये पद अडकू नये, मुख्यमंत्री पुरुष असावा की स्त्री, त्याने योग्य काम करावं – सुप्रिया सुळे  माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे – सुप्रिया सुळे  घराणेशाहीमुळे तुम्ही एखादेवेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच- सुप्रिया सुळे  माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 पट इमोशनल - सुप्रिया सुळे  पवार कुटुंबावर टीका केल्याने आमचं काही नुकसान होत नाही - सुप्रिया सुळे  आर. आर. पाटील यांची आठवण येते - सुप्रिया सुळे  टीव्ही, ट्विटरमुळे सर्व रेकॉर्ड राहतं,मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द पाळावेत - सुप्रिया  मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधण्यास कमी पडलो - सुप्रिया सुळे  बाळासाहेबांनी चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही - सुप्रिया सुळे  महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांचा नंबर, ते दिलदार होते - सुप्रिया सुळे  शिवसेनेने 25 वर्षात मुंबईत काय काम केलं? लक्षात राहील असं एकही काम दाखवू शकणार नाहीत - सुप्रिया सुळे  शिवसेनेचा हेवा वाटत नाही, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हा प्रश्न आहे - सुप्रिया सुळे  आऊट गोईंगची काळजी वाटत नाहीत, प्रत्येक संघटनेत चढ-उतार येतोच - सुप्रिया सुळे  1978 ला पवारसाहेबांनी 50 आमदार निवडून आणले,त्यापैकी 45 जण सोडून गेले, आज त्यांचं अस्तित्व काय?- सुप्रिया सुळे  जे पक्ष सोडून गेलेत त्यांना शुभेच्छा, ते का सोडून गेले हे मला माहीत नाही - सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री आधी करप्ट पार्टी म्हणाले, आता कन्फ्युजन म्हणतायेत, मग खरं कन्फ्युज कोण हे दिसतंय - सुप्रिया सुळे  माझा भाऊ चुकतोय असं मला वाटत नाही - सुप्रिया सुळे  शरद पवारांच्या भाषणांना वैचारीक बैठक, काँग्रेस-राष्ट्रवादीची भाषणं पूर्णत: वेगळी - सुप्रिया सुळे  बाळासाहेबांची भाषणाची वेगळी स्टाईल होती, महाराष्ट्राने ती स्वीकारली होती - सुप्रिया सुळे  आता मुंबई केंद्रीत प्रश्न झालेत, राज्याच्या प्रश्नांकडे तितकंस लक्ष दिलं जात नाही - सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं- सुप्रिया सुळे  सत्ता असो की नसो, लोकप्रतिनीधी म्हणून काम करताना जनतेचं हित महत्त्वाचं - सुप्रिया सुळे  स्वाभिमानी संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं होतं, आता शेतमालाला भाव नाही मग कुठे आहेत?- सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते तेव्हा एक बोलायचे आणि आता दुसरंच बोलतायेत - सुप्रिया सुळे  बाबा बोडके या गुंडाला आम्ही प्रवेश दिला होता, मात्र दीड तासात तो रद्द केला - सुप्रिया सुळे  नोटाबंदी, कांद्याला भाव नाही, कापूस-सोयाबीनला दर नाही, हे सरकारचं अपयश- सुप्रिया सुळे  अडीच वर्षांनी मी भाजपला विचारतेय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? - सुप्रिया सुळे ht  शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान, यांचं जनतेकडे लक्ष नाही - सुप्रिया सुळे  राज्य सरकारची निवडणूक 2019च्या आधीही येऊ शकते - सुप्रिया सुळे  या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे)पडली - सुप्रिया सुळे  या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर...

Read More

वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील सभेसाठी सुप्रिया सुळेंची बुलेट स्वारी

https://www.youtube.com/watch?v=2m6S1hCxHkc

Read More

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ताकीद देते पोलिसांना काय बोलतात तर याद राखा.’ अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री रोज गुंडांच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात’उद्धव ठाकरेंसोबतच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधलं. ‘रोज गुंडाच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात. मुख्यमंत्र्याना लाज वाटली पाहिजे. पुण्यात एक मशीन आणलं आहे मुख्यमंत्र्यांनी, इकडून गुंड घातला कि मुख्यमंत्री गृहखात्याची पावडर टाकतात. मग बाहेर येतो एक सुसंस्कृत माणूस. आमच्या पुण्यात एक शेलार आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारले, काय करतोस रे बाबा? तो बोलला ‘तडीपार आहे, पाच खून केले आहेत’, मुख्यमंत्री म्हणतात, ‘ये रे बाबा, मशीनमध्ये टाकलं गृहखात्याची पावडर टाकली आणि बाहेर आले माननीय शेलार, मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढला झालं. अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.’ ‘ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात, ही काय संस्कृती आहे?’‘सिरीयलवाले कमी भांडतात पण हे शिवसेना-भाजप त्यांच्यापेक्षा जास्त भांडतात. उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीसांच्या डोक्यात खड्डे झाले आहेत. तर मुख्यमंत्री म्हणतात. ‘खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे कळत नाही?’ तर दुसरीकडे ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात. ही काय संस्कृती आहे का?’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेना-भाजपवर टीका केली. ‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

Read More