अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली. आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF — Supriya Sule (@supriya_sule) 7 August 2017सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे.हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!
देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. "दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!!" असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील 'गोविंदबाग' या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या