महाराष्ट्र

'आरोग्य परिषदेतील मुद्द्यांवर शासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेणार'

'आरोग्य परिषदेतील मुद्द्यांवर शासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेणार'

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- आरोग्य परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरचे एक शिष्टमंडळ, आरोग्य मंत्रालय आणि अर्थ विभाग यांची पुढील आठवड्यात एक बैठक घेऊन शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मुंबईत १२ मे रोजी राज्यस्तरीय आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली होती.'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना : उपयुक्तता, भूमिका, सल्ला आणि दुरूस्त्या' या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व डाॅक्टर्स उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, "कोरोना काळात राज्य शासनाने नागरिकांना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरचे एक शिष्टमंडळ, आरोग्य मंत्रालय आणि अर्थ विभाग यांची पुढील आठवड्यात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येतील." कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल अजित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे काैतुक केले. या परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित राहून राजेश टोपे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवकांचे अनुभव ऐकून घेतले. त्यांच्या मागण्या पूर्ण करून आरोग्य सेवा क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, " महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी यंदा शासनाने १७०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या योजनेतील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी केली आहे. त्याचबरोबर या योजनेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करण्यात आल्याने 'युनिव्हर्सल योजना' म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेचा अनेकांना लाभ झाला आहे'. आरोग्य क्षेत्रातील शासकीय तरतुदींबाबत बोलताना टोपे यांनी आरोग्य विभागासाठीची तरतूद ४ टक्यावरून ८ टक्के करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दिव्यांग अस्मिता अभियानार्तंगत एक लाख दिव्यांगांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परिषदेच्या सुरूवातीला खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आरोग्य परिषद आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. त्या म्हणाल्या, "आरोग्य विभागावर थेट प्रभाव टाकणा-या योजनांमधील त्रुटी दुर करणे त्याचबरोबर केंद्राची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनांचे ऑडिट करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे. महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. आपल्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर केंद्राने आयुष्मान योजना लागू केली. या परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आपण लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊ". राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही परिषदेत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "धर्मादाय रुग्णालयांची देखरेख समिती कायम केल्यास राज्याच्या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवता येईल. त्याशिवाय अनेक आरोग्य सुविधा रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध आहेत. त्याचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." अशी माहिती तटकरे यांनी दिली.

Read More

तलवारबाजी करणाऱ्या सुप्रियाताई पाहिल्यात का? (व्हिडिओ)

तलवारबाजी करणाऱ्या सुप्रियाताई पाहिल्यात का? (व्हिडिओ)

https://www.snewslive.com/?p=844पुणे : सकाळी कॉलेजमध्ये मुली नुकत्याच आलेल्या, आपापल्या वर्गात जाऊन तासिकांसाठी तयारी करत असतानाच शिक्षकांकडून निरोप येतो… खासदार सुप्रिया सुळे आल्या आहेत; आणि त्यांची टीम स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत. ऐकताच मुली हॉलमध्ये धाव घेतात…. आणि… प्रत्यक्ष सुप्रियाताईच हातात तलवार घेऊन एका काळे डगलेवाल्याशी दोन हात करत असतात. क्षणार्धात सगळ्या मुलींमध्येही वेगळाच हुरूप येतो आणि टाळ्यांच्या गजरात ताईंचे स्वागत करत प्रशिक्षण सुरू होते.शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींपासून कामानिमित्त घरातून बाहेर जाणाऱ्या महिलांपर्यंत हजारोजणींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते, ही गरज ओळखून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग-ता असोशिएशन यांच्या संयुक्त माध्यमातून आज महिला आणि मुलींना तलवरबाजीचे प्रशिक्षण देण्यात आले.हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात झालेल्या या शिबिरात स्वतः सुप्रिया सुळे यांनी हातात तलवार घेऊन पट्टीच्या तलवारबाजाप्रमाणे केलेली प्रात्यक्षिके महिलांसाठी प्रेरणादायी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, प्रा. अरविंद बुरुंगले, अजित अभंगकर, सुरेखा ठाकरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.मुलगी बाहेर गेली तर आता कुठल्याही आईला तिच्या संरक्षणाची काळजी वाटणार नाही. स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी ती सक्षम असेल. यामुळेच बारामती मतदारसंघातील महाविद्यालयांत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. माझ्या मतदार संघातील कोणतीही मुलगी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःच स्वतःचे संरक्षण करायला शिकले पाहिजे. त्यासाठी वेवगवेगळी तंत्रे आत्मसात केली पाहिजेत. त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणत्याही संकटाचा सामना त्या करू शकतील. यातून महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रकार कमी होतील.थांग-ता असोसीएशनचे सचिव महावीर धुळधर आणि उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून सुरू झालेले हे प्रशिक्षण येत्या ६ डिसेंबर पर्यंत बारामती लोकसभा मतदार संघातील निवडक महाविद्यालयांत सुरू राहणार आहे. प्रत्येकी दोन दिवसांच्या या शिबिरात एकूण ३५ प्रशिकधकांची टीम त्या त्या महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना तलवारबाजी आणि स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत.

Read More

NCP leader Supriya Sule tries her hand at sword fighting (watch video)

IndiaTV    https://www.youtube.com/watch?v=8iNFHryd4EI&feature=youtu.be

Read More

खासदार सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सासवडला टाळनाद आंदोलन

खासदार सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सासवडला टाळनाद आंदोलन

https://www.youtube.com/watch?v=6W2Q_ql5gB8&feature=youtu.be

Read More

...आणि सुप्रियाताईंनी चालवली तलवार!

...आणि सुप्रियाताईंनी चालवली तलवार!

हडपसर : हडपसर येथील साधना शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत:च तलावारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या चेहेऱ्यावर आणि हालचालींमध्ये अत्मविश्वास दिसत होता. त्यांची तलवारबाजी पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल, पवार पब्लिक ट्रस्ट आणि आॅल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने महाविदयालयीन विदयार्थीनींना स्व-संरक्षणासाठी आता मी सुरक्षित... माझे रक्षण मीच करणार या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी स्वतः हातात तलवार घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, प्राचार्य डॅा. अरविंद बुरूंगले, प्राचार्य अजित अभंगकर, सुरेखा ठाकरे, वैशाली नागवडे उपस्थित होते. ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत, तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच, पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. खासदार सुळे पुढे म्हणाल्या, महिलांनी आपले संरक्षण स्वत:च करावयास शिकले पाहिजे. त्यासाठीची विविध टेकनीक्स अत्मसात करायला हवीत. महिलांच्या मनात आत्मविश्वास व जिद्द असेल आणि प्रतिकार करण्याची शक्ती असले तर महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. यासाठी आता मी सुरक्षित... माझे रक्षण मीच करणार या विषयावरील कार्यशाळा उपयोगी ठरेल. थांग-ता हि आपल्या भारतातील प्राचीन मार्शल आर्ट युध्द कला आहे. महाराष्ट्र थांग- ता ही राष्ट्रीय स्तरावरील थांग- ता संघटनेशी संलग्न आहे. महाराष्ट्रातील विविध भागात या संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. या संघटनेचे मुख्य प्रशिक्षक व संघटनेचे सचिव महावीर धुळधर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या सहयोगाने 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 पर्यंत पुणे शहर व जिल्हयातील विविध अशा निवडक महाविदयालयीन विदयार्थीनींना स्व-संरक्षणाचे दोन दिवसांचे शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी 35 प्रशिक्षकांची टीम प्रशिक्षण दिले जाणार आहे.http://www.sarkarnama.in/supriya-sule-takes-sword-hand-31089

Read More

सुप्रिया सुळेंची तलवारबाजी, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अचंबित

https://lokmat.news18.com/maharashtra/ncp-mp-supriya-sule-program-in-pune-319610.html

Updated On: Nov 27, 2018 04:33 PM IST गोविंद वाकडे, पुणे, 27 नोव्हेंबर : पुण्यातील हडपसर परिसरातील एस एम जोशी कॉलेज आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वत:च तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस चालणा-या या शिबिरात मुलींना कराटे आणि शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. https://lokmat.news18.com/maharastra/ncp-mp-supriya-sule-program-in-pune-319610.html

Read More

खा. सुप्रिया सुळे जेंव्हा तलवारबाजी करतात !

https://www.youtube.com/watch?v=Goo7ZGWKknU&feature=youtu.be

Read More

लक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा

लक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा

'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. स्टच्या वतीने धनकवडी येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक संयोजक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. संविधान जागृती करण्याचे कार्य केल्याप्रीत्यर्थ प्रा. सुभाष वारे, डॉ. प्रशांत पगारे आणि डॉ. अशोक शिलवंत यांचा सन्मान करण्यात आला. 'संविधानाचा आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील लोकशाही व्यवस्था अजूनही टिकून आहे. सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाच्या मार्गानेच जावे लागणार आहे,'असेही पवार म्हणाले. संविधान स्तंभाच्या माध्यमातून चांगले संस्कार घडविण्याचा आणि समाजातील ऐक्य टिकविण्याचा प्रयत्न आहे. या स्तंभाच्या धर्तीवर परराज्यातील आणि अन्य पक्षातील खासदारांनीही आपापल्या ठिकाणी स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुळे यांनी दिली. पंपावर गेल्यावर 'राम' आठवतो का? विचारांचा मुडदा पाडण्यात आपल्या देशाइतका पटाईत दुसरा देश नाही. संविधानाचे संस्कार घरात, शाळेत मुलांवर कसे होणार? सुरुवातीपासून आपण सारे एक आहोत, हे सांगणारे संस्कार मुलांवर कसे होणार? आपल्याला फार मोठा बदल करायचा असून, आपण परिवर्तनाचे भुकेले आहोत. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आपण 'रामा'वर बोलत आहोत. पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला राम आठवतो की पेट्रोलचा भाव आठवतो, असा प्रश्नही डॉ. आढाव यांनी उपस्थित केला. पवारांनीच केली प्रोटोकॉलची आठवण कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजकांनी शरद पवार यांचा सत्कार केला. त्यांच्याच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या सत्काराची घोषणा करण्यात आली. मात्र, व्यासपीठावर डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे यांच्यासारखे लोक आहेत. त्यांचा सत्कार आधी करावा, असे पवार यांनी सुचविले. एवढेच नाही, तर पवार यांनी स्वत:हा डॉ. आढाव यांचा हात धरून उभे करून त्यांना सत्कार स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ram-temple-issue-to-turn-the-attention-sharad-pawar/articleshow/66816494.cms

Read More

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue“Youths are jobless, farmers and citizens are suffering from drought. There is no water for people to drink and THE elected representatives, instead of paying attention to these issues, are going to Ayodhya,” he said indirectly taking a jibe at Shiv Sena Chief Uddhav Thackeray.He was speaking at an event organised by Pawar Public Charitable Trust (PPCT) of dedicating the ‘Constitution Pillar’ on the occasion of ‘Constitution Day’, which was celebrated on Monday. Baramati MP Supriya Sule was also present.“Today, many districts in the state are reeling under drought and there is no water for people to drink. People are jobless and worried. Now, in such a situation, elected representatives should stand by the people, but in spite of that, the Ayodhya issue was dug up. I don’t want to get into Ayodhya issue or Ram Janambhoomi issue. But if the country is being taken into a different direction from the main issue, then I think something wrong is happening,” he said.On the eve of Diwali, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath had announced that he will build a 151-metre-long statue of Lord Ram in Ayodhya.Taking it up, Pawar said, “A chief minister of a state says that he will build a bigger statue. He can do that, I have no doubts about it. But today, in this situation, whether to build a tall statue or help the drought-affected people is the question. An attempt is being done to divert all from the main issues and from genuine issues.”“Today, some people in country talk about changing the constitution. Recently, a minister from Central government openly said that ‘in Karnataka, they had come to change the Constitution and to correct it’. You (people) have been given strong rights by the constitution and that they want to take it away.Hence, they make such statements but this country will never accept it. If someone tries to attack the Constitution, then this country does not accept it and we have seen this in the past as well,” the NCP chief said.http://www.sakaltimes.com/pune/pawar-attacks-sena-bjp-raking-ayodhya-issue-28267

Read More

मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार

मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार

पुणे: प्रतिनिधी राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. जनावरांसाठी चारा-पाणी नाही. लोकांच्या हाताला काम नाही. देशातही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, असे असताना मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. देशातील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले संविधान दिनाचे औचित्य साधून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धनकवडी येथे साकारलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, स्थानिक नगरसेवक व संयोजक विशाल तांबे,  प्रा. सुभाष वारे, डॉ. अशोक शिलवंत, डॉ. प्रशांत पगारे आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, देशातील विविध जाती- धर्मांच्या लोकांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने केले आहे. खा. सुळे म्हणाल्या,  संविधानासंबंधी जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या हेतूने संविधान स्तंभ उभारण्यात आला असून देशातील इतर राज्यातील खासदारही याचे अनुकरण करणार आहेत. प्रा. सुभाष वारे म्हणाले, ज्यांनी संविधान जाळले त्यांना मोकाट सोडून त्याविरोधात आंदोलन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. पंपावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिरशालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश होणे गरजेचे आहे. आज राज्यकर्त्यांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जाते. नागरिकांचे मन दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिर आठवते यावर कोणीच बोलत नाही.  - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते http://www.pudhari.news/news/Pune/Ram-temple-issue-to-keep-original-questions-says-Sharad-Pawar/

Read More

संविधानावर हल्ला करणाऱ्यांना देश माफ करणार नाही - पवार

संविधानावर हल्ला करणाऱ्यांना देश माफ करणार नाही - पवार

सकाळ वृत्तसेवा कात्रज - संविधानात बदल करण्याची भूमिका मांडणाऱ्यांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच गदा आणून मुठभरांच्या हाती देशाची सूत्रे द्यायची आहेत. हा प्रयत्न देशवासीय कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. संविधानावर हल्ला करणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असा घणाघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला.धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक विशाल तांबे, बाळा धनकवडे, अश्विनी भागवत यांच्या प्रयत्नातून संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. याचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, कुमार गोसावी, माजी महापौर दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप, महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नाना देवकाते, रूपाली चाकणकर उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘गेल्या पन्नास वर्षांत भारताच्या भोवतालच्या देशात मोठी उलथापालथ झाली. त्या देशातील लोकशाही संपुष्टात आली. लष्करी राजवट आली, हुकूमशाही आली; परंतु खंडप्राय विशाल भारतात विविध जाती- धर्मांचे, विविध भाषांचे लोक असतानाही देश एकविचाराने भक्कम आणि एकसंध राहिला तो केवळ संविधानामुळे. संविधानातील आशय मार्गदर्शक तत्त्व म्हणून सर्वांनी स्वीकारल्यामुळेच देश आज समर्थपणे उभा आहे.’’ या वेळी संविधान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संविधान मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करणारे सुभाष वारे, डॉ. अशोक शीलवंत, डॉ. प्रशांत पगारे यांचा सत्कार करण्यात आला.सत्यमेव जयतेचा संदेश देणाऱ्या संविधानासंबंधीचे अज्ञान दूर करून संविधानातील सत्याचा संस्कार रुजवतानाच परिवर्तनासाठी सज्ज झाले पाहिजे.- डॉ. बाबा आढाव, कष्टकऱ्यांचे नेते<"https://www.esakal.com/pune/country-will-not-forgive-those-who-attacked-constitution-says-sharad-pawar-157095">https://www.esakal.com/pune/country-will-not-forgive-those-who-attacked-constitution-says-sharad-pawar-157095

Read More

अयोध्यावारीवरुन शरद पवारांच्या कानपिचक्या

https://www.youtube.com/watch?v=9bcHs18Y6QM&feature=youtu.beराज्यातील अनेक भागांत दुष्काळ असताना दुष्काळ निवारणाचं काम करण्याऐवजी काही जण अयोध्येला जात आहेत तर, काही जण राम मंदिराचा मुद्दा पुढे करुन महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या वारीचा

Read More

जागतिक अपंग दिनी तरी राज्याने दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करावे - सुप्रिया सुळे

जागतिक अपंग दिनी तरी राज्याने दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करावे - सुप्रिया सुळे

पुणे दि. २६ (प्रतिनिधी) - शेजारची राज्ये दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करीत असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र हे धोरण अद्याप मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. दिव्यांग व्यक्तिसुद्धा समाजाचा भाग असून त्यांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने येत्या जागतिक अपंग दिनी तरी धोरण तयार करावे, या मागणीचे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांनी दिव्यांगांसाठी धोरण तयार करून मंजूरही केले आहे. याशिवाय महाराष्ट्राचाही विचार केला, तर समाजातील इतर वंचीत घटकांसाठी धोरण तयार आहेत. त्याचा त्या त्या घटकांना त्याचा फायदाही होत आहे. असे असताना दिव्यांग व्यक्ती मात्र अपेक्षित सुविधांपासून आजही वंचीत आहेत. याबाबत आपण यापूर्वीही अनेक वेळा पत्र पाठवून धोरण तयार करावे, अशी मागणी केली आहे. इतकेच नाही, तर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य अपंग धोरण कृती समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला सर्वंकष अहवाल देखील सरकारला सादर झालेला आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.मसुद्यानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. यासाठी आपण स्वतः शासनाकडे पत्राच्या माध्यमांतून, तसेच प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीतून दिव्यांगांचा विकास ही शासनाची जबाबदारी आहे. तरी हे धोरण तातडीने मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून ३ डिसेंबर रोजी दिव्यांग धोरण जाहीर झाल्यास त्यांना शासनाकडून एक आगळी वेगळी भेट ठरू शकेल, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.https://www.maharashtrabhumi.com/news-details.php?nid=95

Read More

संविधानामुळेच देश एकसंध : शरद पवार

संविधानामुळेच देश एकसंध : शरद पवार

https://www.snewslive.com/?p=740पुणे : संविधानामुळेच भारत देश एकसंध असल्याचे सांगत राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना लोकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा, काही लोक मूळ मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मूर्ती उभारण्यापेक्षा दुष्काळाने मरत असलेल्या लोकांना मदत करणे अधिक महत्वाचे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज मांडले.पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून धनकवडी येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुद्देशीय भवनाच्या आवारात ‘संविधान स्तंभ लोकार्पण आणि सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले, भारताच्या आजूबाजूचे देश आणि पन्नास वर्षांचा इतिहास पाहिला तर काही ठिकाणी लष्कराचे राज्य आले, राजवटी उलथवून टाकल्या गेल्या, लोकशाहीचे राज्य उद्ध्वस्त करण्यात आले. नेपाळ, श्रीलंका, पाकीस्तान या देशांत आपण हे सर्व पाहिले. या देशांपेक्षा कितीतरी मोठा खंडप्राय भारत असताना, अनेक जातीचे धर्माचे भाषेचे राज्याचे लोक असतानाही हा देश एक विचाराने मजबूतीने उभा आहे. या देशातील राज्यपद्धती येथील लोकांना एकसंध ठेवण्याठी उपयुक्त पडली. यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेले संविधान आणि त्यातील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यामुळेच आपली अवस्था इतरांपेक्षा वेगळी आणि चांगली आहे.आजकाल या देशात काही लोकांनी संविधान बदलण्याची भाषा करायला सुरुवात केली आहे. मागे कर्नाटकात एका मंत्र्यानेच अशी जाहिर भूमिका व्यक्त केली. यामागे जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणून मूठभरांच्या हातात सत्ता देण्याची काही लोकांची इच्छा आहे. पण हा देश हे कधीही मान्य करणार नाही. या देशातील सामान्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर हा देश हे मान्य करणार नाही. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव, सुभाष वारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे, काका चव्हाण, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला एक विचार दिला. तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा छोटा प्रयत्न आम्ही या संविधान स्तंभाच्या माध्यमातून करीत आहोत. अजितदादा पवार, आदरणीय शरद पवार साहेब आणि मी स्वतः असे  आम्ही तिघेही देवाची शपथ न घेता, संविधानाची शपथ घेतो. पुणे हे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर आहे. या शहराला आम्ही ही एक छोटीशी भेट देत आहोत. भविष्यात आणखी बऱ्याच ठिकाणी संविधान स्तंभ उभे करायचे आहेत. आम्ही सुरू केलेल्या या अभियानाची दखल घेत, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, झारखंड आणि अन्य काही राज्यातील खासदारांनीही त्यांच्या मतदार संघात संविधान स्तंभ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे, की ते खासदार आमच्या पक्षाचे नाहीत, तर भाजप आणि अन्य पक्षाचे आहेत.आम्ही खास करून महाराष्ट्राने सुरू केलेली ही मोहीम हळूहळू देशभर जात आहे, याचे खूप मोठे समाधान आहे. त्या पुढे म्हणाल्या, समाजात सध्या संविधानाबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. सत्तेत बसणारे लोकच यामध्ये पुढाकार घेत आहेत. एवढंच नाही तर संविधानची प्रत जाळण्याचाही प्रयत्न दिल्लीमध्ये काही लोकांनी केला.या सर्व घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्लीत जाऊन केला. महाराष्ट्रात परतल्यावर या महिला कार्यकर्त्यांनी संविधान बचाव आंदोलन सुरु केले. मला अभिमान वाटतो की, संविधानाबाबत अशी आग्रही भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. या आंदोलनात योगदान म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ९ संविधान स्तंभ उभारले जात आहेत. यावेळी डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, प्रशांत पगारे यांचीही भाषणे झाली.

Read More

दुष्काळावर चर्चा हवी की मूर्तीच्या उंचीवर : शरद पवार यांचा सवाल

दुष्काळावर चर्चा हवी की मूर्तीच्या उंचीवर : शरद पवार यांचा सवाल

अश्विनी जाधव-केदारी : सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 दुष्काळावर चर्चा हवी की मूर्तीच्या उंचीवरपुणे : अयोध्येच्या प्रश्नात किंवा त्याच्या वादात मला पडायचं नाही. मात्र मूळ प्रश्नापासून बाजूला जाण्याचे काम आहे. खऱ्या प्रश्नांकडे दूर जाण्याचे काम केले जात आहे. मूर्तीची उंची किती असावी यावर चर्चा करायची की दुष्काळावर, असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.धनकवडी भागात असलेल्या लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन याठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ  शरद पवार यांच्या हस्ते आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी संविधान स्तंभ बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत बारामती, सासवड, जेजुरी, मुळशी आणि अन्य ठिकाणी हे स्तंभ उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनकवडी भागातही स्तंभ उभारण्यात आला आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला.देशाचे संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांना मूठभर लोकांच्या हातात पुन्हा सत्ता आणण्याचा उद्देश आहे, मात्र देशातील लोक आता तसे होऊ देणार नाही, असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला.सुप्रिया सुळे म्हणाल्या की काही महिन्यांपूर्वी संविधान जाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला ज्याचा राष्ट्रवादी ने निषेध केला होता. राष्ट्रवादी हा पहिला पक्ष आहे ज्याने संविधान बचाव हे आंदोलन हाती घेतले.त्याअंतर्गत विविध ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आले आहेत. मी, अजित पवार आणि शरद पवार हे देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.संविधान जाळल्याची घटना ज्यांनी केली त्यांना अजूनही अटक नाही, त्यांच्यावर खरेतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी सुभाष वारे यांनी केली.http://www.sarkarnama.in/discussion-drought-or-height-statue-sharad-pawar-31072

Read More

जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर-शरद पवार

जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर-शरद पवार

जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणेघेणे नाही का? असाही प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. जनतेच्या प्रश्नांना बगल लोकसत्ता ऑनलाइन | November 26, 2018 06:38 pm राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळतो आहे, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. ते करण्याचे सोडून आणि लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत भाजपा आणि शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. तसेच रामाच्या मूर्तीची उंची किती असावी? यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याना सविस्तर चर्चा करायची आहे मग जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आहे का? असेही शरद पवारांनी विचारले आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघा च्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, समाजवादी नेते सुभाष वारे, पुणे महापालिके तील विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या देशात अनेक भाषा आणि प्रांतातील नागरिक राहत असताना देखील आज अखेर देश भक्कम उभा आहे. त्याच प्रमुख कारण हे आपल्या देशाचं संविधान आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या एका नेत्याने संविधान दुरुस्ती च्या नावाखाली संविधान बदलण्याची भाषा केली. यातून त्यांना मूठभर लोकांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न दिसतो आहे. मात्र हा प्रयत्न देशातील जनता स्वीकारणार नाही. असा प्रयत्न करणार्‍याना जनतेने बाजूला केल्याची अनेक देशात उदाहरणे आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजापर्यंतचाच इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे होता कामा नये तर सगळा इतिहास समाजापर्यंत येण्याची गरज आहे. तसेच आता देशभरात संविधानावर चर्चा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बालवयापासून संविधान शिकवण्याची गरज असून आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर सोहळे होतात. त्यावेळी येणार्‍या प्रत्येक नागरिकाला संविधानाची प्रत द्यावी आणि सर्वांनी संविधान समजून घ्यावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.  ते पुढे म्हणाले की, आपला देश हा हिंदू किंवा मुस्लिमांचा नसून संपूर्ण भारती याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर ते पुढे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल भरण्यास पंपावर गेल्यावर त्याचा भाव आठवतो की रामाची आठवण होते. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. https://www.loksatta.com/pune-news/shivsena-and-bjp-misguiding-people-on-ram-temple-issue-says-sharad-pawar-1795650/

Read More

आम्ही देवाऐवजी संविधानाची शपथ घेतो : सुप्रिया सुळे

आम्ही देवाऐवजी संविधानाची शपथ घेतो : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा  : सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 We Swear By The Constitution Rather Than God Said Supriya Suleपुणे : ''अजित पवार, शरद पवार आणि मी देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतो''  असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आज (ता.26) पुण्यातील धनकवडी भागात असलेल्या लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन याठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळा त्या बोलत होत्या.खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बारामती लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी संविधान स्तंभ बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत बारामती, सासवड, जेजुरी, मुळशी आणि अन्य ठिकाणी हे स्तंभ उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनकवडी भागातही स्तंभ उभारण्यात आला आहे.सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा सत्कारही याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.याबाबत बोलताना त्या म्हणाल्या. ''काही महिन्यांपूर्वी काही लोकांनी संविधान जाळण्याचा प्रयत्न केला ज्याचा राष्ट्रवादीने निषेध केला होता. ''संविधान बचाव हे आंदोलन हाती घेणारा राष्ट्रवादी हा पहिला पक्ष आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आले आहेत.एकूण उभारल्या जाणाऱ्या 9 संविधान स्तंभांपैकी 7 स्तंभांचे काम पूर्ण झाले आहे.'' अशी माहिती त्यांना यावेळी दिली.https://www.esakal.com/pune/we-swear-constitution-rather-god-said-supriya-sule-157039

Read More

पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव

पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव दिल्ली:खासदार सुप्रियाताई सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रियाताईंनी केलं आहे. या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळेंना याआधीही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच लोकसभेत सर्वाधिक हजेरी, सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. पण युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदतकार्याची पावती आहे. केवळ आठ तासांत बारामतीतील चार हजार ८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया त्यांनी साधली. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्र्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत त्यांनी घेतली. त्यांच्या या कार्यक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात चार हजारहून अधिक मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. याशिवाय अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी,विद्यार्थिनींना केलेला सायकल वाटप या सगळ्या कार्याची दखल युनिसेफने घेत त्यांना हा पुरस्कार दिला.खासदार ,संसदपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुप्रिया यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supriya-sule-awarded-by-unicef/articleshow/66689296.cms 

Read More

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली. आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला. http://aplapune.com/article/ncp-mp-supriya-sule-received-parliamentarians-award-for-children-given-by-parliamentarians-group-for

Read More

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

सकाळ वृत्तसेवापुणे-  पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्‍यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.  ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.https://www.esakal.com/maharashtra/immediately-start-tanker-and-fodder-camps-says-supriya-sule-154819

Read More