‘महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान गप्प का?’

‘महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान गप्प का?’ सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका

मटा ऑनलाइन | Updated:Sep 15, 2018, 06:03AM ISTपुरोगामी भारतात महिलांवरील अन्याय-अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. याबाबत ते मौन बाळगून का आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला. हरयाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करायला हवा. महाराष्ट्रातही सातत्याने मुलींची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होऊन बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या गुन्हे अहवालात अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. याचे उत्तर कोण देणार आहे, असा सवाल सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींचे अपहरण करून उचलून नेण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. हे या सरकारचे अपयश आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/supriya-sule-criticises-narendra-modi-on-womens-safety-issue/articleshow/65815551.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=PMModi150918

Read More

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ; खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ; खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप मोदी मौन बाळगून का आहेत

मुंबई : प्रतिनिधी पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड,बलात्कारअशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार असा संतप्त सवालही खासदार त्यांनी यावेळी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे असा आरोप करतानाच त्या घटनेचा जाहीर निषेध त्यांनी केला. https://www.marathiebatmya.com/ncp-supriya-sule/

Read More

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या अडचणी

शौकत तांबोळीबुधवार, 12 सप्टेंबर 2018नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. सुप्रिया सुळे या नरसिंहपूर परिसरातील गावभेट दौरावर होत्या. गणेशवाडी येथे त्यांच्या गाड्यांचा ताफा शालेय विद्यार्थ्यांनीनी अडवून सदरची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, अशोक घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रियंका खडागळे ही विद्यार्थिनी म्हणाली की बावडा - नरसिंहपूर राज्य मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस आहे. परंतु मोडकळीस आलेल्या, खराब, स्क्रॅप, ब्रेकफेल होणारे एसटी बसेसमुळे आम्हाला अनेकदा शाळा बुडवावी लागली आहे. अनेकदा तर परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चालत जावे लागले आहे.आठवड्यातून दोन दिवस शाळा चुकत असते असे वैष्णवी खंडागळे यांनी सांगितले. तसेच सोनाली खंडागळे, अंकिता भोसले, साक्षी कांबळे, सोनाली जाधव, मनिषा खंडागळे आदि विद्यार्थ्यीनीनी सुळे यांच्याशी बोलताना तक्रारी सांगितले.खासदार सुळे म्हणाल्या, यासंदर्भात मी व भरणेमामा परिवहन मंत्र्यांना भेटून चर्चा करून प्रश्न निकाली काढतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवावे असे आवाहन केले. ताई तुम्ही आमच्या काही विद्यार्थ्यीनीनी सायकल दिल्याने थोडासा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे तुमचे आमच्या व कुटुंबियांचा वतीने खूप खूप आभारी आहे. यापुढेही असाच लोभ राहावा, असेही या विद्यार्थिनींनी आवर्जून सांगितले. http://www.sarkarnama.in/students-stop-mp-supriya-sules-convoy-28564

Read More

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक

सकाळ वृत्तसेवागुरुवार, 13 सप्टेंबर 2018वडापुरी : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील 250 कुटुंबियांना घरकुल मंजूर होऊन गेली 30 वर्षे कालावधी झाला व आता गरीब कुटुंबातील नागरीक घरकुलामध्ये राहत आहेत. परंतु सदर जागा वनखात्याची असल्याने आता या लोकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे असल्याने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यांतील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्या आहेत.या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरीक या ठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे सामान्य जनतेला उभारी देणारी नाहीत, नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे या गावातील नागरीकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा काढावा, मी या भागाची खासदार म्हणून गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.तसेच इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कॅनॉल मधून पाझर तलाव भरावे अशी विनंती केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिले असल्याने तालुक्यातील जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.खासदार सुप्रिया सुळे यांचे लाखेवाडी गावात अभिनंदन -गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून येथील गरीब कुटुंबातील नागरीकांचा वन विभागाचे जागे संदर्भात समस्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सोडविल्या नाहीत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने लाखेवाडी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे.http://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-meets-collector%C2%A0-lakhevadi-village-taluka-indapur-143625

Read More

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा ताईंच्या बातम्यांसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु

आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहापुणे, दि. १३ -  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संबंधित बातम्या, प्रेस रिलीज, व्हिडीओ आदी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी https://news.supriyasule.net/ ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक यांना सुप्रियाताईंच्या संदर्भातील माहिती, बातम्या पाहण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल.या वेबसाईटवर सुप्रियाताईंच्या संदर्भात देशभरातील वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेला मजकूर उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय त्यांचे ब्लॉग, लेख आदींचाही यामध्ये समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय वृत्त पाहण्याची यामध्ये सोय आहे. याखेरीज ताईंची लेटेस्ट छायाचित्रे, प्रेस रिलीज यांचाही समावेश पेजवर करण्यात आला आहे.ही छायाचित्रे डाऊनलोड करण्याचीही सोय या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मुद्रित अथवा दृकश्राव्य माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार मित्रांसह सर्वानी या वेबसाईटचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्याना इशारा

  VIDEOhttps://abpmajha.abplive.in/videos/breakfast-news-bulletin-ram-kadam-statement-issue-supriya-sule-demands-resignation-of-cm-fadnavis-582864

Read More

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे रेडणी येथे कॉलेजची सोय करणार

वडापुरी - रेडणी (ता. इंदापूर) परिसरात दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावात शाळेची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने, मुलींच्या शिक्षणासाठी गावात अकरावी-बारावीची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी करताच खासदार सुप्रिया यांनी शिक्षणाला प्राधान्य देवून मुलींचे शिक्षण  पूर्ण व्हावे यासाठी रेडणी येथे कॉलेजची सोय करणार असून पाच वर्ग खोल्या देणार असल्याचे गाव भेटी वेळी आयोजित केलेल्या सभेवेळी सांगितले.यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, रहेना मुलाणी, विजयराव शिंदे, डी एन जगताप, बाळासाहेब चव्हाण, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला व मुलींचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे नागरिकांच्या असलेल्या समस्या व कामाबद्दल आपुलकीने चौकशी केली. काटी, रेडा, रेडणी, जाधववाडी परिसरात रस्ते, वीज व आरोग्य याची कामे झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे.  आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी या परिसरात दिल्याने गावाची विकास कामे झाली आहेत त्यामुळे दोघांचे सुळे यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींन बद्दल बोललेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी हरिभाऊ तरंगे किसन खाडे  आण्णा काळे अशोक निकम सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नाना तरंगे यांनी केले. http://www.esakal.com/pune/supriya-sule-give-priority-girls-education-rural-areas-142318

Read More

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार - सुप्रिया सुळे

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार – सुप्रिया सुळे गाव भेटी दरम्यान सुप्रिया सुळेंची माहिती

राजकुमार थोरातशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018वालचंदनगर - मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा ‘बारामती पॅटर्न’ इंदापूर तालुक्यामध्ये राबविणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. कळंब (ता.इंदापूर) येथे उपस्थित गाव भेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे, सारिका लोंढे, माजी सदस्य सुहास डोंबाळे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, रामचंद्र कदम, योगेश डोंबाळे, पिन्टू डोंबाळे, तुषार घाडगे, कालिदास राऊत उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये बारामतीमध्ये डॉ.तात्यासाहेब लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरासाठी झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने आले होते.त्यांनी असे शिबीर इंदापूर तालुक्यामध्ये घेण्याची विनंती केल्यामुळे लवकरच इंदापूर तालुक्यामध्ये मोफत मोतिबिंदू शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यामध्ये  एन्‍व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या वतीने आत्तापर्यंत ३८३० नागरिकांवरती मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.तसेच वयोश्री, अपंग शिबिराच्या माध्यमातुन अनेक जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली आहे. याचा दुसऱ्या टप्याचे काम ही लवकर सुरु होणार आहे. आमदार भरणे, सभापती जगदाळे, झेडपीचे सभापती माने हे विरोधी पक्षातील सरकार असताना देखील जास्तीजास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तिघांचे ही कौतुक केले.http://www.esakal.com/paschim-maharashtra/baramati-pattern-cataract-surgery-will-be-implemented-indapur-taluka-supriya

Read More

I dare you to touch a woman in the state, says Supriya Sule

I dare you to touch a woman in the state, says Supriya Sule NCP leader Supriya Sule.

ET Bureau|Sep 06, 2018, 07.35 PM IST[caption id="attachment_1944" align="alignnone" width="300"] “You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.Nationalist Congress Party Chief Supriya Sule has now waded in to the row over a BJP MLA Ram Kadam threatening to ‘kidnap’ girls if they reject a marriage proposal of boys.“You dare touch any girl in Maharashtra and see that you will have to face me. The people in whose party are making these statements should remember this.”said NCP leader Supriya Sule.“It is black day in a progressive state like Maharashtra if an elected representative of the ruling party is talking about k ..All the guy needs to do is to get his parents and if they say they like the girl then he would ‘kidnap’ the girl and hand it over to the boy. Kadam’s statement has led to an outrage across Maharashtra with even Ministers in his own government condemning his statement. The BJP which initially backed the MLA has now kept a studied silence.https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/i-dare-you-to-touch-a-woman-in-the-state-says-supriya-sule-to-mla-who-threatened-to-kidnap-girls/articleshow/65708426.cms

Read More

57% of potholed roads across Maharashtra fixed

57% of potholed roads across Maharashtra fixed 57% of potholed roads across Maharashtra fixed

Mumbai[caption id="attachment_1940" align="alignnone" width="300"] 57% of potholed roads across Maharashtra fixed The Maharashtra government, out of total 43,830 km of pothole-ridden roads, has attended to a stretch of 25,384 km. The remaining bad patches are likely to be fixed by Ganesh festival. The total length of road network across Maharashtra is 88,893 km. Out of it, the state public works department claimed that it has attended the potholes on 57.91 per cent of the roads. "In Mumbai, we had attended 76.17 per cent of potholes, 67.96 per cent in Pune region, 43.83 per cent in Nasik region, 46.70 per cent in Aurangabad region, 56.39 per cent Amarawati region and 69.47 per cent in Nagpur region. We have attended the 64.15 per cent bad patches on the state roads and 54.07 per cent on the district roads," stated the data. The potholes filling exercise started on July 25, 2018, in the state. The state roads are damaged more than the district roads. Out of its 21,312 km network of roads, 13742 km of roads of Pune were damaged topping the list of the city with most damaged roads. With 10,442 km out of total 16322 km of roads damaged, Nasik is close on the heels. After getting the flake from the public and Oppositions over bad conditions of roads, Maharashtra government has started attending the potholes. The aggressive selfie with potholes campaign started by the Nationalist Congress Party (NCP) across the state definitely played a catalyst. NCP state president Jayant Patil, NCP MP Supriya Sule and other leaders and party workers clicked the picture of potholes and uploaded them on social media tagging the Public Works Department minister Chandrakant Patil. "We want to show the ground reality of the roads to ministers and his staffers," said Nawab Malik, NCP spokesperson. Chandrakant Patil, PWD minister promised that his department will fix all the potholes by Ganesh festival. "Maharashtra government had made a budgetary provision of Rs 1,300 crore to fix the potholes. This year, we had started fixing potholes late because initially, the contractors did not get a long dry spell to fill the potholes. We are confident of meeting the deadline," sources in the PWD said. Malik, on the other hand, accused that inferior quality of materials are being used to fill potholes making them reappear every monsoon.  

Read More

.. तर गाठ माझ्याशी आहे, सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम

.. तर गाठ माझ्याशी आहे, सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम सुप्रिया सुळे यांनी घेतला राम कदमांचा समाचार

Sneha Updated Friday- 7 September 2018 - 3:16 PM[caption id="attachment_1937" align="alignnone" width="300"] सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम टीम महाराष्ट्र देशा – आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुळेंकडून निषेध नोंदविण्यात आला. सुप्रिया सुळे इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. मात्र, संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महिलांचा आत्मविश्वासही वाढवला. https://maharashtradesha.com/supriya-suleen-threatened-ram-kadam-on-their-speech-at-dahihandi/

Read More

“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी”

“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी” संघर्ष करायची वेळ आली

“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 06 Sep 2018 06:48 PM[caption id="attachment_1931" align="alignnone" width="300"] गाठ सुप्रिया सुळेशीhttps://abpmajha.abplive.in/pune/ncp-mp-supriya-sule-criticized-cm-ram-kadam-over-controversial-statement-in-dahihandi-582693

Read More

पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार

पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार बारामतीत टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राचे उदघाटन

बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी अापला पासपाेर्ट काढतानाच्या अाठवणी सांगितल्या. [caption id="attachment_1915" align="alignnone" width="300"] पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 4, 2018 03:05 PM | Updated: September 4, 2018 03:44 PMबारामती : पासपोर्ट काढताना उडालेली धांदल... इजिप्तचा प्रवास... आणि शरद पवार... अशा त्रिकोणातील हास्यभरले किस्से उलगडले स्वत: माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी. पासपोर्ट काढण्यापासून ते परदेशवारी करुन परत येईपर्यंत असलेली धाकधूक, इंदिरा गांधींनी दौऱ्यासाठी दिलेली संधी आणि पोलिसांच्या अहवालाला लागलेला उशीर असे सर्व अनुभव ऐकताना उपस्थितांचीही उत्सुकता ताणली जात होती. बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी  ‘दिलखुलास’ पवार सर्वांना अनुभवायला मिळाले. पवार म्हणाले, मी १९६२ साली पहिला पासपोर्ट काढला. आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी इजिप्त येथे जाण्यासाठी माझी त्यावेळी इंदीरा गांधी यांनी निवड केली होती. जगातील ९० देशांचे तरुण त्या बैठकीला उपस्थित राहणार होते. नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह जाफर शरीफ आदी सदस्य त्या बैठकीला उपस्थित होतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्यावेळी परदेशवारीला निघालो होतो. त्यावेळी पासपोर्टचे वरळी येथे कार्यालय होते. पुण्यात देखील पासपोर्टचे कार्यालय नव्हते. पासपोर्टचा अर्ज घेऊन त्यासाठी बारामती-पुणे-मुंबई असा प्रवास  केला. कार्यालयात जाऊन तेथे अर्ज दिला. त्यावर एक महिन्यानंतर या, पोलीस चौकशी करावी लागेल असे मला सांगण्यात आले. बरोबर एक महिन्यानंतर परत पासपोर्ट कार्यालयात गेलो. मात्र, तुमचा पुणे ग्रामीण पोलिसांचा अहवाल अद्याप आलेला नाही, परत या असे सांगण्यात आले. दीड महीन्यांनंतरही तेच उत्तर मिळाले. अखेर दोन महिन्यांनी माझा पासपोर्ट मिळाला. पासपोर्ट आल्यावर आपण काहीतरी कमविल्याचे समाधान मला मिळाले. त्यानंतर आम्ही इजिप्त येथील  ‘आस्वान’ धरणाच्या परीसरातील आयोजित बैठकीसाठी रवाना झालो. आमचे भाग्य म्हणजे त्या काळी गेलेल्या सर्वांना पुढे मुख्यमंत्री पदी काम करण्याची संधी मिळाली. इंदीरा गांधी यांनी माणसांची नेमकी निवड करण्याचा आदर्श पुढे ठेवल्याचे पवार म्हणाले. आज इथे सहज पासपोर्ट मिळत आहे. याबद्दल समाधानही व्यक्त केले. ...  ‘बंधूं’च्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले१९६०- ६१ साली मी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. माझे मोठे बंधू माधवराव  पवार इंग्लंडला जायला निघाले होते. त्यावेळी आम्ही पवार कुटुंबिय बारामती शहरातील आमराईमध्ये रहायला होतो. इंग्लंडला जाण्यासाठी तीन आठवड्यांचा बोटीचा प्रवास होता. परदेशात  कसे जाणार, याबाबत आमच्या कुटुंबात आठ पंधरा दिवस चर्चा सुरु  होती. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळी बंदरावर गेलो होतो. थोरल्या बंधुंच्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले, एवढे त्या काळात पासपोर्टचे नाविन्य होते. अशी अाठवणही शरद पवरांनी यावेळी सांगितली. http://www.lokmat.com/pune/passport-egypt-and-sharad-pawar/

Read More

डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी अनेकांना नवदृष्टी दिली - शरद पवार

डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी अनेकांना नवदृष्टी दिली - शरद पवार Dr. Ragini Parekh Gave New Life To Many – Sharad Pawar

मिलिंद संगई  : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Dr. Ragini Parekh Gave New Life To Many - Sharad Pawarबारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराच्या समारोप प्रसंगी पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.गेले तीन दिवस सुरु असलेल्या शिबीरात 426  रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला. शरद पवार यांनी लहाने व पारेख गावोगाव जाऊन रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्याचे काम करतात त्याची प्रशंसा केली. बारामतीतही ते नियमितपणे येऊन फोरमच्या माध्यमातून ज्येष्ठांना नवदृष्टी देतात या बाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले.प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी या शिबीराचा आढावा घेतला, या शिबीरासह मागील सर्व शिबीरांसाठी लहाने व पारेख डॉक्टरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रीयेचा फोरमचा प्रयत्न असतो, पुढील शिबीरांपासून रुग्णांची संख्या वाढविण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.डॉ. तात्याराव लहाने यांनी शरद पवार यांच्यासमवेतच्या ऋणानुबंधांची माहिती देत त्यांनी सुरवातीपासूनच या कामात मोलाची मदत केल्याचे नमूद केले. या प्रसंगी या शिबीरासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दृष्टीदानाची चळवळ व्यापक व्हावी...दरम्यान डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी सुरु केलेली ही दृष्टीदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, बारामती प्रमाणेच इंदापूर व इतर तालुक्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी भाषणात व्यक्त केली, त्याला डॉ. तात्याराव लहाने यांनी दुजोरा देत अशी शिबीरे करण्यास तयार असल्याचे सांगितले.http://www.esakal.com/pune/dr-ragini-parekh-gave-new-life-many-sharad-pawar-141646

Read More

बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करु- शरद पवार

बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करु- शरद पवार Sharad Pawar Speak About Baramati Phaltan Rail Route

मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Sharad Pawar Speak About Baramati Phaltan Rail Routeबारामती (पुणे) - येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु. समजा, अडचण आलीच तर तुम्ही सहा महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे याला फार काही वेळ लागणार नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आगामी निवडणूकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले.बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणूकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील या बाबतची जोरदार चर्चा आज बारामतीत होती.शरद पवार यांच्या विधानामुळे आता बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम वेगाने मार्गी लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज बोलताना पवार यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्वाचे स्टेशन होईल व त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे काम रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढून अशी ग्वाही पवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना या प्रसंगी दिली.सुप्रिया सुळे यांनी रेल्वेचे डीआरएम मिलिंद देऊसकर यांची प्रशंसा करीत त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची 225 कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा देण्याबाबत त्यांनी विनंती केली. बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी 2019 पर्यंत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौंडला बारामतीच्याच धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. दौंडचा समावेश पुणे विभागात करावा असे त्या म्हणाल्या. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.खालील कामे प्रगतीपथावर1) जेजुरी येथील प्लॅटफॉर्म उभारणी व त्या नंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती2) जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅक करण्यास मंजूरी मिळाली आहे.3) दौंडला रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत होणारhttp://www.esakal.com/pune/sharad-pawar-speak-about-baramati-phaltan-rail-route-141670

Read More

गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठीचा प्रकल्प उपयुक्त- शरद पवार

गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठीचा प्रकल्प उपयुक्त- शरद पवार Dnyaneshwar Mulay Praise From Sharad Pawar

मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Dnyaneshwar Mulay Praise From Sharad Pawarबारामती- केंद्र सरकारच्या माध्यमातून गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठे काम करीत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.बारामतीच्या पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन आज पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्टमास्टर जनरल एस. एफ. एच. रिझवी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पवार यांनी आपला पासपोर्ट कसा काढला याच्या आठवणींना उजाळा देतानाच पासपोर्टची प्रक्रीया कालानुरुप कशी बदलत गेली या बाबत माहिती दिली. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस देशाच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवपदाच्या माध्यमातून महत्वाचे काम करीत असल्याचा वेगळा आनंद त्यांनी बोलून दाखविला.प्रत्येक व्यक्तीला त्वरेने पासपोर्ट द्यावा असा शासनाचा प्रयत्न असून ही एक चळवळ देशात उभी केल्याचे मुळे यांनी सांगितले. आज पासपोर्ट ही चैनीची बाब राहिली नसून गरज बनली आहे, त्या मुळे प्रत्येकाकडे पासपोर्ट हवा हा आमचा प्रयत्न आहे. सुषमा स्वराज यांच्या सूचनेनंतर आज देशभरात 219 पासपोर्ट कार्यालये सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले.सुप्रिया सुळे यांनीही बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी मुळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांचे आभार व्यक्त केले. यामुळे बारामतीकरांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रशासकीय भवनात कार्यालय हवे...बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालय स्थलांतरीत करावे अशी सूचना शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वर मुळे यांना केली. भविष्यातील गर्दी विचारात घेऊन हा बदल करावा असे ते म्हणाले.http://www.esakal.com/pune/dnyaneshwar-mulay-praise-sharad-pawar-141689

Read More

ज्येष्ठ नागरिकांनी वयाची काळजी न करता सातत्याने आनंदी राहायला हवे- शरद पवार

ज्येष्ठ नागरिकांनी वयाची काळजी न करता सातत्याने आनंदी राहायला हवे- शरद पवार Senior Citizens Should Remain Happy Without Worrying About Age Says Sharad Pawar

सकाळ वृत्तसेवा : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Senior Citizens Should Remain Happy Without Worrying About Age Says Sharad Pawarबारामती- ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची व मायेची अधिक गरज असते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयाची फारशी काळजी न बाळगता सातत्याने आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.बारामती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये सिध्दशिला ग्रुपचे प्रितम राठोड व रवी जैन यांनी उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या सोळा बंगल्यांचे उदघाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे, विलास राठोड, संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, अध्यक्ष मुरलीधर घोळवे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, संभाजी होळकर, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक निवासाला आश्रम अशा शब्दाने संबोधू नये त्या ऐवजी आपण दुसरा कुठला तरी शब्द शोधून काढू असे सांगत या वास्तूला आश्रम असे म्हणू नये, अशी सूचना शरद पवार यांनी केली. मी काय किंवा अरुण गुजराथी काय आम्हाला तुम्ही वयोवृध्दाच्या यादीत टाकून आम्हाला अडगळीत काही टाकू नका, मी आणि अरुणभाई दोघही आता काही निवडणूका लढविणार नाही त्या मुळे आमची चिंता कोणी काही करु नये, झाली तर आमची मदतच होईल, अशा शब्दात पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली.खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुहासिनी सातव यांनी आभार मानले.शरद पवारांनी हास्यकल्लोळात बुडविले....कार्यक्रमादरम्यान एका लेखिकेने पवारांना एक काव्यसंग्रह दिला आणि तोच धागा पकडून शरद पवार यांनी उपस्थितांना अक्षरशः हास्यकल्लोळात बुडविले.....पवारांनी तेथे उपस्थित संबंधित लेखिकेस वय सांगायला अडचण नसेल तर सांगा....असे म्हणताच त्यांनी वय 75 सांगितले...त्यावर त्वरेने पवार उत्तरले...मग आता वय लपवायची काही गरज नाही....(हशा...) 75 व्या वर्षी त्यांनी कविता लिहीली...उद्देशून कोणाला तर प्रियकराला...(पुन्हा हशा) त्यांनी कविताच वाचून दाखविली....शेवटच्या ओळी होत्या.....जिवापाड प्रेम करुनही तुला अजूनही आपले बनवू शकले नाही....पवार म्हणाले म्हणजे अजून दुःख आहे काय...(पुन्हा हशा) कधीतरी तू घालशील मला साद...मीही आनंदाने देईन तुला प्रतिसाद...थोडा पॉज घेऊन पवार म्हणाले वय वर्षे 75.... (प्रचंड हशा) इथे असलेल्या सर्व ज्येष्ठांना मी सांगतो की काही काळजी करु नका आपणही तरुण आहोत...कोणीही येथे वृध्द नाही...http://www.esakal.com/pune/senior-citizens-should-remain-happy-without-worrying-about-age-says-sharad-pawar-141704

Read More

निवडणुकीपर्यंत थांबा; कसे होत नाही बघतो! - शरद पवार

निवडणुकीपर्यंत थांबा; कसे होत नाही बघतो! - शरद पवार wait until the election; How can not see! - Sharad Pawar

सकाळ वृत्तसेवा : बुधवार, 5 सप्टेंबर 2018 Sharad Pawar Railway Baramati Faltanबारामती शहर - ‘‘बारामती-फलटण लोहमार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा निश्‍चित प्रयत्न करू. समजा त्यात अडचण आलीच तर सहा-आठ महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे त्याला फार काही वेळ लागणार नाही,’’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती-फलटण लोहमार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याची ग्वाही दिली.बारामती-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या ५६ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची चर्चा आज बारामतीत होती.बारामती-फलटण लोहमार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्त्वाचे स्टेशन होईल. त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल. हे काम सध्या रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्‍चित मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी या प्रसंगी दिली.पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची २२५ कोटींची कामे मार्गी लागली आहेत. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच, बारामती-दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी-२०१९ पर्यंत व्हावे. दौंडचा समावेश पुणे विभागात करून दौंडला बारामतीच्या धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी या वेळी जाहीर केले. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.ही कामे होणार...जेजुरीत प्लॅटफॉर्मची उभारणी. त्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मितीजेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅकला मंजुरीदौंडला रेल्वेच्या जागेत उद्यान विकसित होणारhttp://www.esakal.com/pune/sharad-pawar-railway-baramati-faltan-141788

Read More

तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे कोणत्या शिस्तीत बसते? – सुप्रिया सुळे

तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे कोणत्या शिस्तीत बसते? – सुप्रिया सुळे सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना सुनावलं

Sneha Updated Tuesday- 4 September 2018 - 6:08 PM[caption id="attachment_1867" align="alignnone" width="300"] कोणत्या शिस्तीत बसते?घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. “महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचे भाष्य करणाऱ्या राम कदम यांच्या वर आपण काही कारवाई करणार आहात का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला.“या राज्यात रोडरोमियोंच्या त्रासामुळे मुली रस्त्यावर उतरायला देखील घाबरत असताना तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते?” अशा कणखर शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली आहे.https://maharashtradesha.com/supriya-sule-criticised-cm-fadnvis-about-ram-kadams-speech/ 

Read More

थोडं थांबा, बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम होत कसे नाही ते पाहतो : शरद पवार

थोडं थांबा, बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम होत कसे नाही ते पाहतो : शरद पवार बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे भूमिपूजन

मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 बारामती शहर : येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु.....आणि समजा अडचण आलीच तर तुम्ही सहा आठ महिने थांबा....एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कस काम होत नाही ते....त्या मुळे याला फार काही वेळ लागणार नाही....असे सांगत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आगामी निवडणुकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले. बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची जोरदार चर्चा आज बारामतीत होती. शरद पवार यांच्या विधानामुळे आता बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम वेगाने मार्गी लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज बोलताना पवार यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्वाचे स्टेशन होईल व त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे काम रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढून अशी ग्वाही पवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना या प्रसंगी दिली. सुप्रिया सुळे यांनी रेल्वेचे डीआरएम मिलिंद देऊसकर यांची प्रशंसा करीत त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची 225 कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा देण्याबाबत त्यांनी विनंती केली. बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी 2019 पर्यंत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौंडला बारामतीच्याच धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. दौंडचा समावेश पुणे विभागात करावा असे त्या म्हणाल्या. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली. खालील कामे प्रगतीपथावर 1. जेजुरी येथील प्लॅटफॉर्म उभारणी व त्या नंतर दुस- या प्लॅटफॉर्मची निर्मिती 2. जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅक करण्यास मंजूरी मिळाली आहे. 3.दौंडला रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत होणार http://www.sarkarnama.in/i-will-ensure-baramati-phaltan-railway-work-done-28261

Read More