महाराष्ट्र

इंदापूरातील शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार

इंदापूरातील शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार आपला मतदार संघ,आपला अभिमान

सुळेइंदापूर तालुक्यातील बोरी गावासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे कौतुक केले. बोरी (ता.इंदापूर) येथे आपला मतदार संघ,आपला अभिमान या अभियानातंर्गत येथील सुभाष शिंदे,मल्हारी शिंदे यांच्या द्राक्ष श...

Read More
  243 Hits

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून  ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

बारामती लोकसभा मतदार संघात २० ते २८ मार्च दरम्यान शिबिरे पुणे, दि. १६   (प्रतिनिधी) –  बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत्या मंगळवार पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. साठ आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना उपयुक्त आधार साधने देण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघ निहाय हे शिबीर होणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व  तपासणी करून गरजेनुसार काठी, कुबडी, श्रवणयंत्र, चाकाची खुर्ची अशी आधार साधने देण्यात येणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २०) रोजी खडकवासला येथून या शिबिराची सुरुवात होणार असून त्यानंतर हवेली (दि. २१), पुरंदर (दि. २२) बारामती (दि. २३), इंदापूर (दि. २४), दौंड (दि. २५), भोर (दि. २६), वेल्हा (दि. २७) आणि मुळशी (दि, २८) येथे ही शिबिरे होणार आहेत. ही सर्व शिबिरे त्या त्या ठिकाणच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात होणार असून हवेलीचे शिबीर फुरसुंगी येथील आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे.शिबिरात सहभागासाठी खालीलपैकी कोणताही एक दाखला अनिवार्य आहे. गरीबातील गरीब असल्याचा ग्राममसभेचा दाखला १ लाखापेक्षा कमी उपन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला प्रधानमन्त्री आवास योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला. जिल्हाधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेचा दाखला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला.

Read More
  438 Hits

विषय : पालखी मार्ग भूसंपादनाबाबत

विषय : पालखी मार्ग भूसंपादनाबाबत

इतक्या कमी वेळात हरकती, सूचना कशा मांडायच्या? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे, दि. २८   (प्रतिनिधी) –  बारामती आणि इंदापूर ही दोन मोठी शहरं. त्यापैकी बारामती तालुक्यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावे याचा अर्थ एकूण 26 ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांची जमीन पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक जमीन मालकांना  हरकती आणि सूचना मांडण्यासाठी सरकारने दिलेली मुदत अत्यंत कमी असून नागरिकांचा गोंधळ उडू शकतो, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.इंदापूर आणि बारामती या दोन तालुक्यांच्या हद्दीतून राष्ट्र संत तुकाराम महाराजाची पालखी जाते. हा मूळ रस्ता सहा पदरी होणार असून त्यासाठी या हजारो नागरिकांच्या जमिनी अंशतः घ्याव्या लागणार आहेत. हे करत असताना जसा पालखी आणि वारकऱ्यांचा विचार झाला तसा त्या जमीन मालकांचाही विचार व्हायला हवा होता; तथापि तो झालेला दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी केली आहे.राज्य शासनाने भूसंपादनासाठी अद्यादेश 9 मार्च रोजी काढला असून हरकती सुचनांसाठी 21 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानुसार ही मुदत उद्या म्हणजे 29 मार्च 2018 रोजी संपत आहे. हे पाहता 21 दिवसांची मुदत देताना त्याच तारखेला म्हणजे 9 तारखेलाच किंवा एखादा दिवस आगे-मागे शासनाने जाहिरात प्रसिद्ध करायला हवी होती. तसे न करता ती काल म्हणजे 27 मार्च रोजी प्रसिद्ध केली. ते पाहता अवघ्या दोन दिवसांत हजारो लोकांनी आपल्या हरकती कशा नोंदवायच्या; आणि त्यावर सुनावणी कशी होणार याचे उत्तर शासनाकडे आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.वास्तविक इतक्या मोठ्या संख्येचे प्रश्न 21 दिवसांत सुटनेही अश्यक्य असताना शासनाने लोकाना सांगण्यात आणखी दिरंगाई केली आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या अवघे दोन दिवस मिळत आहेत. या दोन दिवसांत तलाठी, प्रांत आणि तहसीलदार आदी महसूल कार्यालयांत नाहक गर्दी करून 'लोक ऐकत नाहीत. आम्ही ऐकायला तयार आहोत पण विनाकारण गर्दी करून लोक कामात अडथळे आणत आहेत' असा कांगावा सरकारला करायचा आहे काय?, असा सवाल खादार सुळे यांनी उपस्थित केला आहे.शेकडो वर्षांचा पालखी सोहळा सुरळीत व्हावा. वारकर्यांना विना अडथळा पालखी सोबत चालता यावे, त्यासाठी रस्ता रुंद असावा. तो शासनाने करून द्यायला हवा. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार. हे आम्हासही कळते. किंबहुना त्यासाठी आमचा पाठिंबाच आहे; तथापि चांगल्या कार्यात अशा प्रकारचे तांत्रिक घोळ घालून ऐनवेळी सर्वसामान्य नागरिकांचे गळे आवळण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

Read More
  360 Hits

तारखेचा घोळ; शेतकऱ्यांच्या जीवाला घोर

तारखेचा घोळ; शेतकऱ्यांच्या जीवाला घोर

Friday, 30 Mar, 8.18 pmपुणे - राज्य शासनाने पालखी मार्ग रूंदीकरणाकरिताच्या भूसंपादनासाठीचा अद्यादेश दि. 9 मार्चला काढला. परंतु, हरकती व सुचनांसाठीची निविदा मंगळवारी (दि. 27) प्रकाशित करण्यात आली. यामध्ये हरकती व सुचनांकरिता 21 दिवसांचा अवधी दिल्याचे नमुद असले तरी प्रत्यक्षात ही मुदत गुरूवारी (दि. 29) संपल्याने बारामती आणि इंदापुरातील महसूलसह शासकीय कार्यालयात हरकती मांडण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला. केवळ दोनच दिवसांत हरकती व सुचना कशा द्यायच्या तसेच याची सुनावणी दोन दिवसांत कशी होणार? असा घोर जीवाला लागलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्‍त केला असून याबाबत 26 गावांतील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन दिले आहे.पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास राज्य शासनाने मंजुरी दिली असून याकिरता भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता काही गावातील शेतकऱ्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा आद्यादेश दि. 9 मार्चला काढून हरकती व सूचनांकरिता 21 दिवसांची मुदत दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात याबाबतची निविदा मंगळवारी (दि.27) प्रकाशित करण्यात आल्याने शेतकऱ्यांत गोंधळ उडाला आहे.बारामती तालुक्‍यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांतून पालखी मार्ग रूंदीकरण होत आहे. एकूण 26 गावांतील जमीन संपादित करण्यात येणार आहे. परंतु, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना मांडण्यासाठी सरकारने दिलेली मुदत अत्यंत कमी असून केवळ दोन दिवस मिळत असल्याने यात शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. वास्तविक इतक्‍या मोठ्या संख्येचे प्रश्‍न 21 दिवसांत सुटने अश्‍यक्‍य असताना राज्य शासनाने हरकती व सूचनांकरिता शेतकऱ्यांना दोनच दिवसांची मुदत कशी दिली. यातून तलाठी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार आदी महसूल कार्यालयात शेतकऱ्यांनी गर्दी करू लागले असून शेतकऱ्यांचे काही ऐकायचेच नाही, याकरिताचा शासनाची ही खेळी असल्याचा संताप शेतकऱ्यांतून व्यक्त होवू लागला आहे.पालखी सोहळा सुरळीत व्हावा, याकरिता पालखी मार्ग रूंदीकरण होणे गरजेचेच आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून आम्ही राज्य शासनाला काही करू देणार नाही. चुकीचा कारभार चालल्याने मुख्यमंत्र्यांना या प्रश्‍नांत लक्ष घालायला लावू.- सुप्रिया सुळे, खासदा

Read More
  324 Hits

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी पुणे :  सासवड - जेजुरी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दुभाजकांची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी कधी करणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर अपघाताचे काही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला आहे. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी झाली पाहिजे असेही त्या म्हटल्या आहेत. या मार्गाशी अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ होतोय. त्यामुळे या दुभाजकांची दुरावस्था झाल्याने या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुणे आणि आसपासच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हागणदारी मुक्त महाराष्ट्र या अभियानावर देखील प्रश्न उपस्थित केले होते. तसेच हा केवळ भ्रम आहे, मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात त्यांना रस्त्यावरील सत्य माहित नाही, असेही त्यांनी म्हटले होते. एकूणच निवडणूक जवळ आली असल्याचे यातून दिसून येत आहे, त्यामुळे निवडणूक जवळ असल्याकारणाने आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र असेच सुरु राहणार का ? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित झाला आहे. http://mahamtb.com/Encyc/2018/4/23/Supriya-sule-asking-questions-to-CM-Fadnavis-.amp.html?__twitter_impression=true

Read More
  299 Hits

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   राजकुमार थोरात 04.07 PM 2supriya_sule_17सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976

Read More
  259 Hits
Tags:

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे

त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, सुप्रिया सुळे यांची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर | Last Updated: 24 May 2018 07:04 PMइंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळेंनी हा सल्ला दिला.जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन-तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे, असा सुप्रिया सुळे म्हणाल्या.राज्य चांगल्या प्रकारे चालवायचे असेल, तर अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी. त्याची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, असं म्हणत त्यांनी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपवरही सडकून टीका केली.

Read More
  265 Hits

महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावल्या...

महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावल्या...

राजकुमार थोरात : शुक्रवार, 25 मे 2018 Women From Walchandnagar Felicitated MP Supriya Suleवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. सुळे यांनी तालुक्यामध्ये अकरा तासामध्ये १६ गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गावभेटी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुळे यांचा दौरा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरु झाला. व रात्री ९ वाजता संपला. अकरा तासामध्‍ये १६ गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सुळे यांनी विशेष:ता महिलांशी संपर्क साधला. वयश्री योजनेची माहिती मिळाली होती का? अपंगाच्या मेळाव्याची माहिती देण्यात आली होती का? गावामध्ये पाणी येते का? रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत का? याची माहिती घेतली.एरवी राजकीय कार्य्रकमाला महिलांची हजेरीचे प्रमाण कमी असते. मात्र सुळेच्या दौऱ्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता.या वेळी सुळे यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये मध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. आज अनेक गावामध्ये महिला कारभारी (सरपंच) असून गावचा कारभार सक्षमपणे सांभाळत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच अनेक गावामध्ये सुळे यांचा महिलांनी सत्कार केल्यामुळे सुळे भारावून गेल्या. पुणे जिल्हातील अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ कार्ड तयार करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी देवून महिलांना कामानिमित्त फिरण्यासाठी विशेष सायकलची निर्मिती ही करणार असून इंदापूर तालुक्यातील मुलींसाठी ३५०० सायकली वाटप करणार असल्याचे सांगितले.आमदार भरणे, सभापती जगदाळे व माने यांचे कौतुक...इंदापूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान खासदार सुळे यांनी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या कामाचे कौतुक करुन तालुक्याचा विकास होत आहे. नागरिकांना अडचणी असल्यास त्यांनी थेट आमदार भरणे, सभापती जगदाळे, माने व  माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.http://www.esakal.com/pune/women-walchandnagar-felicitated-mp-supriya-sule-119315

Read More
  270 Hits

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून इंदापुरात तीन हजार मुलींना मिळाली सायकल

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून इंदापुरात तीन हजार मुलींना मिळाली सायकल

डाॅ. संदेश शहा : शुक्रवार, 13 जुलै 2018 इंदापूर : बारामती हा देशातील आदर्श लोकसभा मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. रक्तक्षय तसेच कुपोषण मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत आहे. नकोशी मुलगी हवेशी होण्यासाठी सायकल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. मुलींनी माहेरची आठवण म्हणून सायकल लग्न झाल्यानंतर सासरी नेवू नये असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल मैदानावर इंदापूर विधान सभा मतदारसंघातील आशा वर्कर्स तसेच शालेय युवतींना सुमारे दोन कोटी रूपयांच्या ती हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.  सुळे यांनी युवतींशी सुसंवाद साधत त्यांना बोलते करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पुन्हा प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत. सौ. सुळे म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्रत्येकी दहा हजार श्रवणयंत्रे व सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या धोरणाने गरिब महिला व शेतक-यांसाठी लढण्यास कटिबध्द आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सर्वप्रथम रक्तक्षय मुक्त करण्याचे धोरण आहे. महिलांच्या कर्करोगाचे निदान व्हावे म्हणून देशात सर्वप्रथम पुणे जिल्हाप रिषदेने कार्यक्रम हाती घेतला आहे. युवती व महिला सुरक्षितपणे फिरल्या पाहिजेत हे माझे स्वप्न असून हे स्वप्न पुर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देवू. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मामून काम करणा-या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या प्रतिनिधी असल्याने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. खासदार सुळे या आदर्श संसदपटू असून त्यांनी सर्वत्र जनसंपर्क ठेवून विकासकामे केली आहेत. सायकल वाटप कार्यक्रमामुळे युवती व महिला त्यांना कधीच विसरणार नाहीत.

Read More
  264 Hits

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार - सुप्रिया सुळे

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार – सुप्रिया सुळे गाव भेटी दरम्यान सुप्रिया सुळेंची माहिती

राजकुमार थोरातशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018वालचंदनगर - मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा ‘बारामती पॅटर्न’ इंदापूर तालुक्यामध्ये राबविणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. कळंब (ता.इंदापूर) येथे उपस्थित गाव भेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे, सारिका लोंढे, माजी सदस्य सुहास डोंबाळे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, रामचंद्र कदम, योगेश डोंबाळे, पिन्टू डोंबाळे, तुषार घाडगे, कालिदास राऊत उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये बारामतीमध्ये डॉ.तात्यासाहेब लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरासाठी झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने आले होते.त्यांनी असे शिबीर इंदापूर तालुक्यामध्ये घेण्याची विनंती केल्यामुळे लवकरच इंदापूर तालुक्यामध्ये मोफत मोतिबिंदू शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यामध्ये  एन्‍व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या वतीने आत्तापर्यंत ३८३० नागरिकांवरती मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.तसेच वयोश्री, अपंग शिबिराच्या माध्यमातुन अनेक जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली आहे. याचा दुसऱ्या टप्याचे काम ही लवकर सुरु होणार आहे. आमदार भरणे, सभापती जगदाळे, झेडपीचे सभापती माने हे विरोधी पक्षातील सरकार असताना देखील जास्तीजास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तिघांचे ही कौतुक केले.http://www.esakal.com/paschim-maharashtra/baramati-pattern-cataract-surgery-will-be-implemented-indapur-taluka-supriya

Read More
  256 Hits

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे रेडणी येथे कॉलेजची सोय करणार

वडापुरी - रेडणी (ता. इंदापूर) परिसरात दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावात शाळेची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने, मुलींच्या शिक्षणासाठी गावात अकरावी-बारावीची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी करताच खासदार सुप्रिया यांनी शिक्षणाला प्राधान्य देवून मुलींचे शिक्षण  पूर्ण व्हावे यासाठी रेडणी येथे कॉलेजची सोय करणार असून पाच वर्ग खोल्या देणार असल्याचे गाव भेटी वेळी आयोजित केलेल्या सभेवेळी सांगितले.यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, रहेना मुलाणी, विजयराव शिंदे, डी एन जगताप, बाळासाहेब चव्हाण, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला व मुलींचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे नागरिकांच्या असलेल्या समस्या व कामाबद्दल आपुलकीने चौकशी केली. काटी, रेडा, रेडणी, जाधववाडी परिसरात रस्ते, वीज व आरोग्य याची कामे झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे.  आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी या परिसरात दिल्याने गावाची विकास कामे झाली आहेत त्यामुळे दोघांचे सुळे यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींन बद्दल बोललेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी हरिभाऊ तरंगे किसन खाडे  आण्णा काळे अशोक निकम सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नाना तरंगे यांनी केले. http://www.esakal.com/pune/supriya-sule-give-priority-girls-education-rural-areas-142318

Read More
  262 Hits

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक

सकाळ वृत्तसेवागुरुवार, 13 सप्टेंबर 2018वडापुरी : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील 250 कुटुंबियांना घरकुल मंजूर होऊन गेली 30 वर्षे कालावधी झाला व आता गरीब कुटुंबातील नागरीक घरकुलामध्ये राहत आहेत. परंतु सदर जागा वनखात्याची असल्याने आता या लोकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे असल्याने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यांतील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्या आहेत.या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरीक या ठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे सामान्य जनतेला उभारी देणारी नाहीत, नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे या गावातील नागरीकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा काढावा, मी या भागाची खासदार म्हणून गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.तसेच इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कॅनॉल मधून पाझर तलाव भरावे अशी विनंती केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिले असल्याने तालुक्यातील जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.खासदार सुप्रिया सुळे यांचे लाखेवाडी गावात अभिनंदन -गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून येथील गरीब कुटुंबातील नागरीकांचा वन विभागाचे जागे संदर्भात समस्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सोडविल्या नाहीत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने लाखेवाडी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे.http://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-meets-collector%C2%A0-lakhevadi-village-taluka-indapur-143625

Read More
  294 Hits

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या अडचणी

शौकत तांबोळीबुधवार, 12 सप्टेंबर 2018नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. सुप्रिया सुळे या नरसिंहपूर परिसरातील गावभेट दौरावर होत्या. गणेशवाडी येथे त्यांच्या गाड्यांचा ताफा शालेय विद्यार्थ्यांनीनी अडवून सदरची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, अशोक घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रियंका खडागळे ही विद्यार्थिनी म्हणाली की बावडा - नरसिंहपूर राज्य मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस आहे. परंतु मोडकळीस आलेल्या, खराब, स्क्रॅप, ब्रेकफेल होणारे एसटी बसेसमुळे आम्हाला अनेकदा शाळा बुडवावी लागली आहे. अनेकदा तर परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चालत जावे लागले आहे.आठवड्यातून दोन दिवस शाळा चुकत असते असे वैष्णवी खंडागळे यांनी सांगितले. तसेच सोनाली खंडागळे, अंकिता भोसले, साक्षी कांबळे, सोनाली जाधव, मनिषा खंडागळे आदि विद्यार्थ्यीनीनी सुळे यांच्याशी बोलताना तक्रारी सांगितले.खासदार सुळे म्हणाल्या, यासंदर्भात मी व भरणेमामा परिवहन मंत्र्यांना भेटून चर्चा करून प्रश्न निकाली काढतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवावे असे आवाहन केले. ताई तुम्ही आमच्या काही विद्यार्थ्यीनीनी सायकल दिल्याने थोडासा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे तुमचे आमच्या व कुटुंबियांचा वतीने खूप खूप आभारी आहे. यापुढेही असाच लोभ राहावा, असेही या विद्यार्थिनींनी आवर्जून सांगितले. http://www.sarkarnama.in/students-stop-mp-supriya-sules-convoy-28564

Read More
  317 Hits

जैन समाजाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय : खा. सुप्रिया सुळे

प्रशांत चवरेबुधवार, 17 ऑक्टोबर 2018भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे येथील जैन स्थानकांमध्ये सुरु असलेल्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, डि.एन. जगताप, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, धनाजी थोरात, जैन संघाचे संघपती अशोक रायसोनी, अध्यक्ष अभय रायसोनी, रवींद्र रायसोनी, विजय बोगावत,संजय रायसोनी उपस्थित होते. यावेळी बोलताना साध्वी सन्मितीजी म्हणाल्या, राजकारण व समाजकारण यांचा उत्तम मिलाफ पवार कुटुंबामध्ये पहावयास मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात येत असलेले मुलींसाठी सायकल वाटप, सर्वसामान्यांच्या आरोग्यांसाठी शिबीर असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले सुत्रसंचालन राहुल गुंदेचा यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले.https://www.esakal.com/pune/contribution-jain-community-very-important-said-supriya-sule-150224

Read More
  1 Hits

News 1

First News

Read More
  268 Hits