सकाळ वृत्तसेवादौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दौंड येथे आज (ता. 2) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, ''सीएम चषकाच्या निमित्ताने सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. चषकाला माझा विरोध नाही; परंतु वेळ चुकीची आहे. दुष्काळात होरपळणाऱ्यांना आधार देऊन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळं बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे. राज्यात बेरोजगारी, महागाई, असुरक्षितता आणि दूषित सामाजिक वातावरणामुळे अस्वस्थता असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. जाहिरातबाजीवर तुफान खर्च करणारे हे सरकार आहे. जनतेला हे सरकार वाटत नसून, एखादा प्रॉडक्ट वाटावा, अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्याबद्दल भाजप-शिवसेनेचे नेते बोलत नाहीत. राज्य सरकारची कोणतीही योजना चाललेली नाही. आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या युतीने लोकांची फसवणूक केली आहे.''''सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वाद, रुपयाचे अव्यमूलन, कोलमडणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, सीबीआयअंतर्गत लाच प्रकरणावरून झालेल्या धाडी आणि केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद दुर्दैवी आहेत. अशा विसंवाद आणि वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होत आहे. त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,'' असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदारhttps://www.esakal.com/pune/supriya-sule-criticises-cm-devendra-fadnavis-over-drought-situation-153060
दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. By लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात कीर्तन करण्यात आले. तर दुसरीकडे, गॅस दर ६० रुपयांनी वाढल्यामुळे तहसील कचेरीच्या परिसरात ३ दगडांच्या चुलीवर भाकरी भाजून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध करण्यात आला.या वेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी ६ वाजता सुप्रिया सुळे यांनी दौंड-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अॅड. अजित बलदोटा, सोहेल खान, बादशहा शेख, झुंबर गायकवाड, प्रवीण शिंदे, नागसेन धेंडे, राणी शेळके, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘पुणे-दौंडदरम्यान विद्युत लोकल तातडीने सुरू झाली पाहिजे. दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले गेले पाहिजे. कडेठाण, मांजरी येथील बंद पडलेली रेल्वेची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. प्रभाग क्र. ५ मधील रेल्वे अधिकाºयांनी थांबविलेली कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. रेल्वे झोपडपट्टी कुठल्याही परिस्थितीत हलवू दिली जाणार नाही. रेल्वे परिसरात पाणीटंचाई आहे.‘मीटू’च्या प्रश्नावर मोदी गप्प का?सध्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर ‘मीटू’चा प्रश्न गाजतोय. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर २० महिला आरोप करतात. त्यात काहीतरी तथ्य असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देतात, दुसरीकडे ‘मीटू’वर गप्प का? हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. तेव्हा संबंधित मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे सरकार नसून प्रॉडक्ट आहे. केवळ जाहिरातबाजीवर हे सरकार तरलेले आहे. जलयुक्त शिवाराचे श्रेय सिनेअभिनेता आमिर खान यांना दिले पाहिजे. मात्र, हे श्रेय भाजपा सरकार लाटत आहे. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.http://www.lokmat.com/pune/take-ncp-railway-station/
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. मागील वर्षी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या मार्गाचं भूमीपूजन केलं.निधीही मंजूर झाला. पण तरीही नगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यास टाळाटाळ करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलं होतं.
बारामती लोकसभा मतदार संघात २० ते २८ मार्च दरम्यान शिबिरे पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत्या मंगळवार पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. साठ आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना उपयुक्त आधार साधने देण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघ निहाय हे शिबीर होणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून गरजेनुसार काठी, कुबडी, श्रवणयंत्र, चाकाची खुर्ची अशी आधार साधने देण्यात येणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २०) रोजी खडकवासला येथून या शिबिराची सुरुवात होणार असून त्यानंतर हवेली (दि. २१), पुरंदर (दि. २२) बारामती (दि. २३), इंदापूर (दि. २४), दौंड (दि. २५), भोर (दि. २६), वेल्हा (दि. २७) आणि मुळशी (दि, २८) येथे ही शिबिरे होणार आहेत. ही सर्व शिबिरे त्या त्या ठिकाणच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात होणार असून हवेलीचे शिबीर फुरसुंगी येथील आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे.शिबिरात सहभागासाठी खालीलपैकी कोणताही एक दाखला अनिवार्य आहे. गरीबातील गरीब असल्याचा ग्राममसभेचा दाखला १ लाखापेक्षा कमी उपन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला प्रधानमन्त्री आवास योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला. जिल्हाधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेचा दाखला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला.
प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018[caption id="attachment_1126" align="alignnone" width="300"] सिद्धेश्वर_हॉस्पिटल_दौंडदौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दौंड येथे सिध्देश्वर मॅटर्निटी, सर्जिकल व जनरल हॅास्पिटलचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले व त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह डॅा. दत्तात्रेय लोणकर, राणी शेळके, झुंबर गायकवाड, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आनंद थोरात, डॅा. सुनीता कटारिया, बबन लव्हे, अॅड. अजित बलदोटा, नंदकुमार पवार, आदी उपस्थित होते. हॅास्पिटलचे प्रमुख डॅा. मयूर महादेव भोंगळे यांनी प्रास्ताविकात या सुसज्ज हॅास्पिटल मधील उपलब्ध सुविधा आणि औषधोपचारांविषयी माहिती दिली.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ``नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात देशात कुपोषण आणि स्त्रीभ्रुणहत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ते अतिशय गंभीर आहे. विशेषकरून महिलांमध्ये रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देत त्याद्वारे रक्त तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आदींची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील महिला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.``त्या पुढे म्हणाल्या, ``जैव वैद्यक कचर्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने आपल्या आरोग्यासह पर्यावरणावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील डॅाक्टर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेऊन कुरकुंभ येथील कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून निधी उभारून प्रकल्प केला कार्यान्वित केला पाहिजे.``शशांक मोहिते व रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सभापती रंगनाथ फुलारी यांनी आभारप्रदर्शन केले.खासदार सुप्रिया सुळे यांनी डॅा. मयूर व डॅा. अनुराधा भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करीत गरीब आणि गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे काबाडकष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणारे महादेव भोंगळे व हिराबाई भोंगळे यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.http://www.esakal.com/pune/make-daund-tehsil-anemia-and-malnutrition-free-says-supriya-sule-113263
मिलिंद संगई : 12.07 PM To Get The Work Of Various Stations From Pune To Daund Railway Soonबारामती शहर - पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानके आणि गावांमध्ये तसेच लोहमार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, प्लॅटफॉर्म दुरुस्ती आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेकडे केली आहेत.रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पुणे विभागीय प्रबंधक मिलिंद केळुसकर यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले असून लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, असे त्यात म्हटले आहे. नुकतीच त्यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वानी लोहानी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.दौंड रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या नागरीकांचे पुनर्वसन अनेक दिवसांपासून प्रलंबित असून तातडीने त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. याशिवाय सहजपुर, कासुर्डी, यवत, खुटबाव, कडेठाण, पाटस, सोनेवाडी, खुरवाडी, भिरवडे आणि पुढे भिगवण याठिकाणी लोहमार्गावर उड्डाणपूल उभे करावेत. सहजपुर आणि कासुर्डी येथे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वे स्थानक करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.पाटस येथे उड्डाणपुलाची गरज असून रेल्वे विभाग या कामाच्या निविदा काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी केली. याबरोबरच दौंड येथून बंगळूर आणि राजस्थान दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या दौंड स्थानकावर थांबत नाहीत. त्या याठिकाणी थांबवण्यात याव्यात. बारामती, दौंड, इंदापूर आणि भिगवण येथून या गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र कोटा जाहीर करण्यात यावा, असे सुळे यांनी या पत्रात नमूद केले आहे. या सोबतच बारामती, फलटण आणि लोणंद याठिकाणी नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन करावयाचे आहे. तो प्रश्न स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मार्गी लावावा, असेही त्यांनी म्हटले आहे.नीरा-जेजुरी रेल्वे मार्गावर जेजुरी येथे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. त्यांच्यासाठी जेजुरी येथे भुयारी मार्गाची गरज असून सुकळवाडी येथे मशिदीत प्रार्थना करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठीही भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे. नीरा रेल्वे स्थानकाजवळ स्थानिक नागरिकांना छोटे व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी.जेजुरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या छताची उंची वाढविण्याबरोबरच नव्या इमारतीची उभारणी करणे, विस्तारित विश्रांती कक्ष उभारणी, प्लॅटफॉर्म वाढविणे, सहजपुर, खामगाव, खुटबाव, कडेठाण, पाटस, आळेगाव, बोरिबेल, मलठण, राजेगाव स्थानकांची उंची वाढविणे, बारामती येथे सर्व्हिस रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शिरसूफळ, गावडे वस्ती, सोनबा पाटील वस्ती, सर्व्हे क्रमांक 17 या ठिकाणी जोड रस्ता तयार करून देणे आदी कामे प्राधान्याने करण्यात यावीत, असे सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.http://www.esakal.com/pune/get-work-various-stations-pune-daund-railway-soon-140867