अमित शाहांना म्हणाल्या… शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्ल...
सुप्रिया सुळेंचा अमित शाहांवर पलटवार भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद प...
परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीना...
पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, "कोणताही जिल्हा…" Supriya Sule Criticise Pankaja Munde : गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत असून अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न के...
ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या Supriya Sule | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला दारुण पराभव पत्करावा लागला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी पराभवासाठी एकमेका...
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सु...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर...
संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदच...
सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्ह...
इंदापूर : बारामती हा देशातील आदर्श लोकसभा मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. रक्तक्षय तसेच कुपोषण मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत आहे. नकोशी मुलगी हवेशी होण्यासाठी सायकल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. मुलींनी माहेरची आठवण म्हणून सायकल लग्न झाल्यानंतर सासरी नेवू नये असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल मैदानावर इंदापूर विधान सभा मतदारसंघातील आशा वर्कर्स तसेच शालेय युवतींना सुमारे दोन कोटी रूपयांच्या ती हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे यांनी युवतींशी सुसंवाद साधत त्यांना बोलते करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पुन्हा प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत.
सौ. सुळे म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्रत्येकी दहा हजार श्रवणयंत्रे व सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या धोरणाने गरिब महिला व शेतक-यांसाठी लढण्यास कटिबध्द आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सर्वप्रथम रक्तक्षय मुक्त करण्याचे धोरण आहे. महिलांच्या कर्करोगाचे निदान व्हावे म्हणून देशात सर्वप्रथम पुणे जिल्हाप रिषदेने कार्यक्रम हाती घेतला आहे. युवती व महिला सुरक्षितपणे फिरल्या पाहिजेत हे माझे स्वप्न असून हे स्वप्न पुर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देवू.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मामून काम करणा-या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या प्रतिनिधी असल्याने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. खासदार सुळे या आदर्श संसदपटू असून त्यांनी सर्वत्र जनसंपर्क ठेवून विकासकामे केली आहेत. सायकल वाटप कार्यक्रमामुळे युवती व महिला त्यांना कधीच विसरणार नाहीत.