1 minute reading time (226 words)

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणार - खासदार सुप्रिया सुळे रेडणी येथे कॉलेजची सोय करणार

वडापुरी - रेडणी (ता. इंदापूर) परिसरात दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावात शाळेची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने, मुलींच्या शिक्षणासाठी गावात अकरावी-बारावीची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी करताच खासदार सुप्रिया यांनी शिक्षणाला प्राधान्य देवून मुलींचे शिक्षण  पूर्ण व्हावे यासाठी रेडणी येथे कॉलेजची सोय करणार असून पाच वर्ग खोल्या देणार असल्याचे गाव भेटी वेळी आयोजित केलेल्या सभेवेळी सांगितले. यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, रहेना मुलाणी, विजयराव शिंदे, डी एन जगताप, बाळासाहेब चव्हाण, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला व मुलींचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे नागरिकांच्या असलेल्या समस्या व कामाबद्दल आपुलकीने चौकशी केली. काटी, रेडा, रेडणी, जाधववाडी परिसरात रस्ते, वीज व आरोग्य याची कामे झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे.  आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी या परिसरात दिल्याने गावाची विकास कामे झाली आहेत त्यामुळे दोघांचे सुळे यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींन बद्दल बोललेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी हरिभाऊ तरंगे किसन खाडे  आण्णा काळे अशोक निकम सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नाना तरंगे यांनी केले.

http://www.esakal.com/pune/supriya-sule-give-priority-girls-education-rural-areas-142318

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिय...
मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर त...