महाराष्ट्र

[loksatta]“जर काही झालं, तर त्याची जबाबदारी गृह विभागाची असेल”

शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. "तुमचाही लवकरच दाभोलकर होणार", अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली असून त्या पोस्टमध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद ...

Read More
  261 Hits

[ABP MAJHA]विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे Supriya Sule : देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्णच आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारव...

Read More
  289 Hits

[TV9 Marathi ] Purandar Highlands हा माझा अभिमान - सुप्रिया सुळे

पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकराराव उर्फ अण्णासाहेब उरसळ यांच्या अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा आणि पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अंजीर ज्युसचे लॉन्चिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीची करण्यात आले पुरंदर तालुक्यातील सिंगापूरमध्...

Read More
  345 Hits

[Lokshahi Marathi]शरद पवारांच्या अदानी संबंधी भूमिकेवर सुप्रिया सुळेम्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या याच विधानावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचं बोललं जात असून शरद...

Read More
  287 Hits

[Saamana]'जेपीसीसंदर्भात शरद पवार काय म्हणाले हे शांतपणे समजून घ्या"

सुप्रिया सुळे यांचे आवाहन 'गेल्या महिन्याभरापासून जेपीसीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे. संजय राऊतांचीही सध्या चौकशी चालू आहे. राज्य सरकारने त्यावर समिती नेमली आहे. पण त्याचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? त्या कमिटीत कुठल्या पक्षाचे लोक जास्त आहेत? कमिटीचे अध्यक्ष सत्तेतले, कमिटीतले लोकही सत्तेतलेच जास्त आहेत शरद पवार काय म्हणाले हे ...

Read More
  292 Hits

[Loksatta]“शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या…”

सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या य...

Read More
  345 Hits

[TV9 Marathi]'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि आता दौऱ्यावर गेलेले कसे बोलतात पाहा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल वक्तव्य केले यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पार्लमेंटमध्ये चर्चा तेव्हा ही झालेली आहे, यामध्ये नवीन काही नाही. जेपीसी कमिटी केलेली आहे, यात सत्तेतील लोक जास्त अ...

Read More
  388 Hits

[Maharashtra Desha]“आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”

सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या  मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद...

Read More
  317 Hits

"...और कारवाँ बनता गया"

शरद पवार यांचा साठच्या दशकातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल पुणे : "...और कारवाँ बनता गया!"अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार शरद पवार यांचा १९५६ सालातला एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिल्यांदा विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यांच्या या संसदीय कारकीर्दीला यावर्षी ५६ वर्षे पुर्ण झाली. त्य...

Read More
  378 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा”

गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटा...

Read More
  305 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्यसरकारवर घणाघाती टीका

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.फडणवीस...

Read More
  289 Hits

[abp majhaa]'आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागलीय'

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या... आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्या सत्यशोधक समाज परिषदेत बोलत होत्या. सत्यशोधक समाज स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील ...

Read More
  386 Hits

[Zee 24 Taas]"सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय"

दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या... सत्यशोधक समाजच्या स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये (Saswad) सत्यशोधक समाज परिषदेचं (Satyashodhak Samaj Parishad) आयोजन करण्यात आलं होतं. तिथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुळे यांनी बोलताना सुचक वक्तव्य केलंय. त्यांच्या...

Read More
  392 Hits

[Lokmat News18]...अन् मला पवारांची लेक असल्याचा अभिमान वाटला

सुप्रिया सुळेंनी सांगितली बालपणीची 'ती' आठवण पवार साहेबपुणे, 5 फेब्रुवारी : सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशात दररोज कुठेना कुठे धार्मिक मोर्चे निघत असल्याचं पहायला मिळत आहे. या धार्मिक मोर्चांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमचं घर हे सत्यशोधक आहे. हे आम्ही कृतीतून दाखवून देतो, आम्ही लिंग भेद मानत नाही. मला आणि ...

Read More
  414 Hits

आमच्याही लेकी घेतील गगनभरारी

देशाच्या राजकारण आणि समाजकारणात पवार कुटुंबीय गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. याचा पाया माझ्या वडीलांच्या आई, माझ्या आजी शारदाबाई पवार आणि माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या आहेत. शारदाबाई पवार यांनी अतिशय हिंमतीने कठोर प्रसंगांना सामोरे जात कुटुंबाचे संगोपन केले. सामाजीक जीवनातही त्यांनी मोठ्या हिंमतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारसा होता. त्यांची जडणघडणच सेवासदनमध्ये झाली होती. ही वैचारीक जडणघडणच त्यांना आगामी आयुष्यभर पुरली. त्याचप्रमाणे माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या देखील अतिशय कर्तृत्त्ववान होत्या. मुलं लहान असताना त्यांना ऐन तारुण्यात वयाच्या २८ व्या वर्षी अकाली वैधव्य आलं. या आघाताने खचून न जाता त्यांनी मुला-मुलींचे संगोपन केले व त्यांना उत्तम शिक्षण दिले. त्यांनी आपल्या आयुष्यात सगळे निर्णय स्वतंत्रपणे घेतले. दोन्हीकडील कुटुंबांच्या प्रमुख या माझ्या आज्याच होत्या. माझ्या सर्व बहिणींना आमच्या घरात स्वातंत्र्य मिळाले व समानतेची वागणूक मिळाली, तसेच आमच्या घरात लग्न होऊन आलेल्या माझ्या सर्व वहिन्यांनाही घरात समानतेची वागणूक मिळाली. माझ्या या दोन्ही आज्यांची जीवनकहाणी माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझी आईसुद्धा याच वातावरणात वाढल्यामुळे त्याचप्रमाणे जगणारी आहे. बाबा सामाजिक-राजकीय जीवनामध्ये पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे, माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय मी माझ्या आईच्या मार्गदर्शनाने व मदतीने घेतले आहेत. माझ्या जन्मानंतर म्हणजे साधारणतः ४८ वर्षांपुर्वी माझ्या आई-वडीलांनी दुसरे अपत्य नको असा निर्णय घेतला. यासाठी माझ्या वडीलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. याचा भार त्यांनी माझ्या आईवर टाकला नाही. ही त्याकाळी मोठी क्रांतीकारक गोष्ट होती. आजही जेंव्हा मी याचा विचार करते तेंव्हा मी आश्चर्यचकीत होते. पुढे माझी मुलगी रेवती हिच्यानंतर कुटुंबीयांच्या आग्रहाखातर आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार केला तेंव्हा बाबा मला म्हणाले, ‘एक मुलगी असताना तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार का करताय ?’ स्त्री-पुरुष समानतेचा विचार इतक्या सहजपणे अंगीकारणाऱ्या अशा कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. घरात कधीही मुलगी म्हणून वेगळी वागणूक मला मिळाली नाही. इतर भावांप्रमाणेच मला वागवलं गेलं. त्यात मी स्वतः मुंबईसारख्या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहरात लहानाची मोठी झाले. लग्नानंतर काही काळ आम्ही उभयता परदेशात राहिलो. तेथेही मला स्त्री-पुरुष विषमतेची झळ बसली नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर मी जेंव्हा भारतात परत येऊन सार्वजनिक आयुष्याला सुरुवात केली. त्यावेळी समाजात वावरत असताना स्त्री-पुरुष असमानतेची झळ मला जाणवू लागली. स्त्री-पुरुष जननदरातील मोठी तफावत, मला खूप चिंताजनक बाब वाटत होती. त्याचवेळी २०११ च्या जनगणनेचा अहवाल माझ्या हाती आला आणि त्याने माझ्या शंकेवर शिक्कामोर्तब केले. दर हजारी ९४० पर्यंत मुलींचा जननदर घसरला होता. प्रगत समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांत मुलींचा जननदर तर फारच घसरला होता. त्यात लाजिरवाणी बाब अशी होती कि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्त्री-भ्रुण हत्येचे प्रकार घडत होते. बीड जिल्ह्यातील परळी येथील एका दवाखान्यात एका अशाच दुर्दैवी प्रकरणात मातेचा मृत्यू झाला व त्या प्रकरणात वडिलांना अटक होऊन ४ मुली व वयोवृद्ध आजी हे कुटुंब उघड्यावर आले. मी त्यांच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील भोपा गावातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली, विचारपूस केली व त्यातील ३ मोठ्या मुलींना बारामतीमधील शारदानगर विद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाठविले. त्या मुली अतिशय प्रसन्न आणि तजेलदार चेहऱ्याने आज जेंव्हा मला भेटतात तेंव्हा खूप आनंद होतो. यापुढील काळात अशा अनेक मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेत गेलो. त्यानंतर आम्ही "जागर" हा उपक्रम हाती घेतला आणि त्याचे प्रतिक म्हणून “जागर जाणीवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा” असे घोषवाक्य आमच्या सर्वांच्या डोक्यात सतत घुमू लागले. महाराष्ट्रातील मुली, महिला आणि कार्यकर्त्यांना घेऊन २०११ साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील जन्मस्थळापासून ते पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापर्यंत भव्य पदयात्रा काढली. त्या मोहिमेअंतर्गत जेंव्हा मुली माझ्याशी संवाद साधू लागल्या तेंव्हा माझ्या कल्पनेपलीकडील विश्व माझ्यापुढे उभे राहत गेले. मुली बोलत होत्या, मी ऐकत होते.. त्यांच्या अनुभवांचे विश्व माझ्यासाठी अनोळखी होतेच शिवाय तितकेच धक्कादायकही...या अनुभवांनी माझे भावनाविश्व पुर्णतः बदलून गेले. मी महिलांच्या प्रश्नांविषयी अधिकच संवेदनशील होऊ लागले. त्याविषयी सातत्याने विचार करु लागले. यातूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहत असे तेंव्हा मला तेथे तरुणींचे प्रतिनिधीत्त्व नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळेच त्यांना प्रतिनिधीत्त्व देता येईल का, मुख्य प्रवाहात कसे आणता येईल याचा विचार केला. या विचाराची परिणती म्हणजे २०१२ साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस उभारण्याचा पक्षाने निर्णय घेतला. हा देशातील अशाप्रकारचा पहिलावहिला प्रयोग होता. ज्यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी केलेल्या भाषणातील शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. साहेब म्हणाले होते की, “यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय लाभ होईल का नाही हे मला माहित नाही, पण महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल जरी पडलं तरी या...

Read More
  383 Hits

Born Free

I am born in a family which has been active in the country's politics and in social work for more than half a century. The foundation for this was laid by my father's mother, my grandmother, Shardabai Pawar and my mother's mother, Nirmala Shinde. Shardabai Pawar was a lady of great courage who brought up the family while battling against significant odds in life. She created her unique identity in politics and social work with great courage and fortitude. She had the legacy of the Satyashodhak Samaj, a society that sought truth and rationality. Her personality was shaped and moulded in the intellectual atmosphere of Sevasadan. This intellectual legacy supported her all through her life. Similarly, my mother's mother, Nirmala Shinde was a very strong lady. While her four daughters were still very young, she was prematurely widowed at the age of 28 years.She with great courage brought up her 4 daughters single handedly and gave them the best education. Both my grandmothers took all the decisions in life independently. Both my grandmothers were part of large and not very wealthy families. All the girls in my got freedom and equal treatment in our house along with the males. Similarly all my sisters-in-laws who came into our family after marriage were treated equal to the males in the family. The life stories of both of my grandmothers are inspiring to me. Since my mother was brought up in this atmosphere, she also lives in the same way. Since my father has been extremely busy in his socio-political life, I have taken all decisions with the guidance and assistance of my mother. After birth i.e. around 48 years ago, my parents decided to only have one child since they both came from large families ... my father felt family planning was a must given the large population Of our country.. they had only child child which was me - a girl and after this, my father underwent a vasectomy- which was unheard of in those days .He did not cast the burden of birth control on my mother. This was truly a revolutionary thinking in that era. Whenever I recall this now, I am amazed. After my daughter, Revati, was born and we were thinking of having another child my father said, “when you have a daughter why are you thinking of second child?”. I was brought up in a family where gender equality was a given. I was never treated differently just because I was a girl . Moreover I was brought up in the cosmopolitan city of Mumbai. After marriage we lived abroad for a few years. There too I never faced any gender discrimination.Against this background, when I returned to India and started working that’s where I for the first time encountered cases of female-male inequality while interacting in society. I was deeply disturbed by the disparity in the birth rate of women and men. Around that time I read the 2011 census report and it confirmed my doubt. The birth rate of girls had declined and it was 940 for every 1000 boys. Even the so called progressive districts had seen a sharp decline in the birth rate of girls. This was clearly related to female foeticide which was taking place in many places in Maharashtra. In one such unfortunate incident, a woman died in the hospital in Parali in Beed district during delivery and her husband was arrested in that case, following which the family of four daughters and an old grandmother was rendered helpless and without support. I visited that family in the Bhopa village in Majalgaon taluka of Beed district and extended them support. We decide to adopt and supports three elder girls of that family to Shardanagar school in Baramati for further education. When these girls meet me with joyous and bright faces today, I feel elated. Thereafter we continued taking the responsibility of...

Read More
  383 Hits

त्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..

प्रत्येक सजीवासाठी पाणी ही मुलभूत गरज आहे. भारतीय उपखंडात पाण्याची गरज मुख्यत्वे मोसमी पावसाच्या माध्यमातून भागविली जाते. मोसमी पाऊस हे या उपखंडाला लाभलेले निसर्गाचे अनोखे वरदान आहे. मोसमी पावसाच्या माध्यमातून नद्यांसारखे जलस्रोत ओसंडून वाहू लागतात. त्यांच्या माध्यमातून माणसाची पाण्याची गरज पुर्ण होते. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठावरच मानवी संस्कृती वसली याचे मुख्य कारणही पाण्याची गरजच आहे. प्राचीन काळी मानवी संस्कृतीही गंगा, ब्रह्मपुत्रा, सरस्वती असा जलस्रोतांच्या आसपासच वसली. जेथे मुबलक पाणी तेथे जगण्याच्या संधी अधिक, म्हणूनच पाण्याला जीवन असेही म्हणतात. जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचे नव्हे तर जीवनाचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा जगभरात घेतली जाते. गेल्या काही वर्षांतील वातावरणीय बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पाण्याच्या व्यवस्थापनास अपिरमित महत्त्व आले आहे. जलव्यवस्थापनाच्या मुद्याकडे वळण्यापुर्वी खान्देशातील हल्लाबोल आंदोलनाच्या काळात आलेला एक अनुभव मला नमूद करायचा आहे. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक महिलांनी पाणीटंचाईमुळे होत असलेला त्रास सांगितला. हंडाभर पाण्यासाठी त्यांना दूर जावे लागते, यामुळे अनेक कामे अडून राहतात असेही त्यांनी सांगितले. त्यावेळीच एक खुणगाठ मनाशी बांधली की, महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरुपी काढायचा. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती भीषण आहे. पाण्याचे अनियमित झालेले चक्र आणि जलव्यवस्थापनाच्या बदललेल्या पद्धती यांचा सर्वात मोठा फटका महिलांना बसतो. मानवी श्रमाचे जे अमूल्य तास देशाच्या कारणी लागायला हवेत, ते पाण्याची सोय करण्यात वाया जातात. पाण्याची टंचाई हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात उभा आहे. सर्वांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे किंबहुना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणे हा त्याचा मुलभूत अधिकार ठरायला हवा. संसदेत ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे त्या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ, अवर्षण अशी संकटं पुजलेली असत, असं कोणी सांगितलं तर आज कदाचित विश्वास बसणार नाही. या भागाचे गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रतिनिधीत्त्व करणारे शरद पवार साहेब यांच्या प्रेरणेतून येथे जलसंधारणाची मुलभूत कामे मोठ्या प्रमाणावर झाली. यामुळेच येथील बहुतांश भाग हा सिंचनाखाली आला. विशेष म्हणजे येथील जनतेनेही जलसंधारणाचं तत्त्व समजून घेऊन ते जोपासलं आहे. योग्य जलव्यवस्थापन केल्यामुळे आज हा भाग कृषीक्षेत्रातील प्रगतीचे एक मॉडेल म्हणून भारतात सर्वत्र नावाजला जातो. पाण्याची नासाडी थांबून त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २२ मार्च हा दिन जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या क्षेत्रात बारामती अथवा अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावांनी केलेल्या कामाचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. गेल्या काही वर्षांत पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याची कधी नव्हे तेवढी गरज निर्माण झाली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आता करावेच लागेल असा इशारा निसर्गाने देण्यास सुरुवात केली आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचे भरणपोषण करण्यासाठी कृषी क्षेत्रावर आलेला दबाव पाहता आगामी काळात उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध जलस्रोत असो किंवा पावसाचे पाणी, ते अधिकाधिक प्रमाणात जतन करण्यातच खरा शहाणपणा आहे. भूजल पातळीतील घट लक्षात घेता जमीनीत अधिकाधिक प्रमाणात पाणी मुरवून ठेवणे आवश्यक आहे. गेल्या पन्नास वर्षांची आकडेवारी आपण लक्षात घेतली तर दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भाग नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर विभागामधील अनेक जिल्ह्यांचा यात समावेश आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास शेती आणि दररोजच्या वापरासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. किंबहुना अलिकडच्या काळात त्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. जलसंवर्धनाच्या तंत्राचा आपण जेंव्हा विचार करतो तेंव्हा इस्त्रायलचे उदाहरण देणे आवश्यक आहे. जगाच्या नकाशावर ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या या देशाने जलस्रोतांचे उत्तम नियोजन करुन कृषीक्षेत्रात जी झेप घेतली आहे ती थक्क करणारी आहे. आपल्याकडेही या राष्ट्राच्या कामगिरीचा वस्तुपाठ गिरविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरात आणलेली पाणीयोजना असो किंवा महात्मा जोतीबा फुले यांनी सुचविलेली सिंचनाची पद्धती ही त्या दोन द्रष्ट्या युगपुरुषांनी ओळखलेली काळाची पावलेच होती. आपण फक्त त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने चालण्याची गरज आहे. सध्या तरी आपण शहरी असो किंवा ग्रामीण, प्रत्येकाने पाण्याच्या नियोजन आणि वापराबाबत जागरुक झाले पाहिजे. यामध्ये शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन, घरगुती पाण्याचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, विहीर पुनर्भरण आणि रेनवॉटर हार्वेस्टींग अशा तंत्रांचा वापर करण्याची गरज आहे. शहरांमध्ये सोसायटी तेथे रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सांडपाणी पुनर्वापर यंत्रणा अशा मोहिमा राबविण्याची आवश्यकता असून यासाठी जनतेचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय शासकीय पातळीवरुनही अशा प्रयोगांना बळ दिले पाहिजे. सिंचनाखाली जास्तीत जास्त जमीन कशी आणता येईल आणि कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. याशिवाय भूजलाच्या वापरावरही मर्यादा नसल्यामुळे जमीनीच्या पोटात कोट्यवधी वर्षांपासून साठलेले पाणी माणसाने अक्षरशः हिसकावून बाहेर काढले आहे. परिणामी देशातील...

Read More
  337 Hits

राष्ट्रवादी काँग्रेस : दोन दशके विश्वासाची

नोंद: सदर लेख हा सरकारनामा या ऑनलाईन पोर्टल वर दिनांक ९ जून २०१८ रोजी पब्लिश झाला आहे. http://www.sarkarnama.in/blog-supriya-sule-two-decades-ncp-24759 अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि देशातील मोठ्या नेतृत्त्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. लोक मोठ्या उत्कंठेने त्यांच्या भाषणाची वाट पाहत होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजीपार्क अक्षरशः दुमदुमून गेले. आपल्या नेहमीच्या शैलीत साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. साहेब म्हणाले, "दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे." देशाला एक नवा विश्वास देताना साहेब पुढे म्हणाले, "सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे." पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे. साहेबांनी शिवाजीपार्कवरील त्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठीत राजकारणाचा वसा घेऊन शरद पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेली विविध क्षेत्रातील कामे जनतेच्या लक्षात आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. आपल्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात देशातील कृषीव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याव्दारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पोषक निर्णय घेतले.त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही तर अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख राष्ट्र बनला. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रीया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्त्व असणाऱ्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचा जनतेला दीर्घकालीन फायदाच झाला आहे. म्हणूनच विकास कार्याबाबत शरद पवार हे अधिक विश्वासार्ह नाव आहे, याची जनतेला खात्री आहे. प्रत्यक्ष अनुभवातून देशभरात याची प्रचितीही आलेली आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पवधीतच जनतेची पसंती मिळाली. खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते. खरेतर १९-२० वर्षे हा काळ एखाद्या संघटनेसाठी फार मोठा काळ नाही. आता तर कुठे खरी सुरुवात झाली असून पक्षाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा संदेश देणारी वेळ आहे. आजघडीला समाजाच्या प्रत्येक स्तरात पक्षाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्त्व आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, गेल्या चार वर्षांत त्याचे मजबूत जाळ्यात रुपांतर केले आहे. हे जाळे पवार साहेबांसारख्या कणखर आणि कर्तबगार नेतृत्त्वाखाली पुर्वीपेक्षाही अधिक सक्रीयतेने कार्यरत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आपल्या दीड दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजीक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, उर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपुर्व अशी आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने शेतीसाठी पतपुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरविले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पुरविला. बचत गटाची व्यापक चळवळ...

Read More
  345 Hits

पवार साहेब आणि महिला धोरणाची २५ वर्षे

साहेब आणि महिला धोरणाची पंचविशीआदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना या देशातील जनतेने अलोट प्रेम दिलं आहे. हे प्रेम लाभण्यामागे पवार साहेबांनी जनतेसाठी अहोरात्र उपसलेले कष्ट, असंख्य जागून काढलेल्या रात्री, अफाट प्रवास अशा असंख्य गोष्टी आहेत. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि केंद्रीय मंत्रीपदांच्या कार्यकाळात पवार साहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन ते अग्रक्रमाने राबविण्यास नेहमीच प्राधान्य दिले. शेतकरी, कष्टकरी, महिला अशा वंचित घटकांसाठी त्यांनी जाणीवपूर्वक अभिनव कल्पना राबविल्या. त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर माझ्या आजी -शारदाबाई गोविंदराव पवार अर्थात त्यांच्या आईच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा ठसा आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात माझी आजी जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आली होती. महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या विचारांच्या मुशीत ती तयार झाली होती. रुढ चौकटींना छेद देऊन नवं आभाळ निर्माण करण्याची धमक तिला या विचारांतून मिळाली होती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या भूमीतून ती पवारांच्या घरात सुन म्हणून आली होती. आपल्या विचारांच्या शिदोरीवर तिने घर यशस्वीपणे सांभाळलंच शिवाय सामाजिक क्षेत्रातही आपली भूमिका अपार निष्ठेने बजावली. पवार साहेबांनी आईचं हे कर्तृत्व अगदी जवळून अनुभवलं होतं. ज्या काळात महिलांना घरातूनही बाहेर पडण्याची बंदी होती; त्या काळात माझ्या आजीनं सार्वजनिक व्यासपीठावरुन केलेलं भरीव काम त्यांच्यासमोर होतं. यातूनच त्यांची एक वैचारीक बांधणी निश्चित झाली. याचा परिपाक म्हणजे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात म्हणजे १९९३ साली महिला आणि बालविकास विभाग खात्याची सुरुवात करण्यात आली.  महिलांचे उत्थान आणि बालविकासाच्या क्षेत्रात विविध योजना राबविण्यासाठी पुढे या खात्याने संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम केले. याच वर्षी आणखी एक महत्वाचे पाऊल म्हणजे राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांचे न्याय्य आणि नैसर्गिक हक्क अबाधित राखण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली. महिला सक्षमीकरणाकडे ही सर्वात महत्वाची दोन पावले उचलल्यानंतर पवार साहेबांनी त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९९४ साली महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली. एवढंच नाही तर या धोरणामध्ये कालसुसंगत बदल करुन त्यानुसार महिलांच्या उत्थानासाठी वेळोवेळी कार्यक्रम देखील राबविण्यात आले. महिलांसाठी सत्तेचा सोपान खुला करुन देण्यात आला. याचा फायदा समाजातील सर्वच स्तरातील महिलांना मिळाला असून आज त्या पुरुषांच्या बरोबरीने सार्वजनिक क्षेत्रात वावरत आहेत, ही समाधानाची बाब आहे. जनतेशी संवाद साधत असताना मला नेहमी एक बाब सातत्याने जाणवते ती म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचा वावर लक्षणीयरित्या वाढला आहे. एकेकाळी चुल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या महिला केवळ सार्वजनिक व्यासपीठच नाही तर जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. यामध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. याची मुळं आदरणीय पवार साहेबांच्या काळात महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेल्या महिला धोरणात आहेत. या धोरणानुसार महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, त्यांची मानहानी करणाऱ्या प्रथांवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर सल्ला देणे यावर भर देण्यात आला. यावर्षी महिला धोरण राबविण्याच्या क्रांतिकारी घटनेला २५ वर्षे पुर्ण होत आहेत. एखाद्या व्यक्तीसाठी २५ वर्षांचा कालखंड कदाचित खुप मोठा असू शकेल पण संपुर्ण समाजासाठी तो तसा अल्प काळ आहे. परंतु या अल्पकाळातच महिला धोरणाची अतिशय चांगली फळे आली आहेत. महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांचा विकास होईल हे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्त्व पवार साहेबांचे आहे हे विसरुन चालणार नाही. आपल्या संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान हक्काची तरतूद केली आहे. याशिवाय सर्वांना मताधिकार देखील बहाल केला आहे. त्यांनी पाहिलेल्या आणखी एका सुंदर स्वप्नाची परिपुर्ती देखील पवार साहेबांच्याच काळात झाली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा १९९४ साली या राज्यात अस्तित्वात आला. योगायोग असा की, केंद्रातील सरकारमध्ये ते कृषीमंत्री म्हणून सहभागी असताना २००५ साली हा कायदा भारत सरकारनेही व्यापक स्तरावर राबविला. या कायद्यामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाला अधिकच गती मिळाली. याखेरीज आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय देखील समानतेच्या चळवळीतील एक मैलाचा दगड ठरला. पुढे २०११ साली हे आरक्षणाचे प्रमाण ५० टक्के एवढं करण्यात आली. उंबरठ्याच्या आत आयुष्य कंठणाऱ्या महिलांना ‘समान संधी, समान सत्ता’ या न्यायाने सत्तेची कवाडे खुली झाली. महिलांनी पुढाकार घेऊन गावांचा विकास केल्याची अनेक उदाहरणे यानंतर उजेडात आली आहेत. स्त्री-पुरुष समानतेचे पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. महिलांकडे कोणतेही काम काळजीपुर्वक करण्याची दृष्टी असते याची नोंद घेऊन पवार साहेबांनी आपल्या संरक्षणमंत्रीपदाच्या काळात महिलांना तिन्ही सैन्यदलात ११ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील क्रांतिकारी ठरला. याच काळात त्यांनी महिलांना हवाई दलात वैमानिक म्हणून संधी देण्यासाठी...

Read More
  317 Hits

लढवय्ये बाबा

सोशल मिडियाचा हा जमाना आहे.विधानसभा निवडणूकीच्या काळात बाबांचा तो पावसात भिजलेला फोटो आणि त्याखालील एक कॅप्शन मनात घर करुन गेलं. त्यात लिहिलं होतं की, ‘सर्व काही संपत आल्यासारखं वाटू लागलं तर हा फोटो पहा, नवी भरारी मारण्याची उमेद मिळेल’. बाबा लढवय्ये आहेत,प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन तिला अनुकूल करणारे जादूगार आहेत. बाबांचं हे विलक्षण रुप मी लहानपणापासून अनुभवतेय.पण यंदाच्या निवडणूका आणि त्यानंतरच्या घडामोडींमध्ये त्याचा परमोच्च बिंदू आम्ही सर्वांनीच अनुभवला. एवढी कठीण परिस्थिती अवतीभोवती असतानाही ते हताश,निराश झाल्याचं मी पाहिलं नाही. उलट सर्वांनाच ते धीर देत परिस्थिती बदलण्यासाठी लढण्याचं सामर्थ्य देत राहिले. साताऱ्याच्या सभेत भर पावसात भिजत-भिजत केलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रात अक्षरशः चमत्कार घडला. लोकांचा आपल्या नेत्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. समोर हजारोंची गर्दी पावसात भिजत असताना ते भाषणाला उभे राहिले. जनतेशी अफाट निश्चयाने त्यांनी अगदी अंतरीचा संवाद साधला. त्यांचा हा संवाद सोशल मिडिया,वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून देशभरात पोहोचला. जेंव्हा मी ही सभा पाहत होते, तेंव्हा त्यांचं हे असं भिजणं थोडं काळजीचं वाटलं. पण बाबा, पावसासारख्या अडचणींना पुरुन उरणारे आहेत, ही खात्री देखील मनात होतीच. बाबांनी, साताऱ्याच्या त्या पावसात लोकांच्या मनातील निराशा, हताशा हे सगळं धुवून काढलं. त्यांना बदलासाठी, लढण्यासाठी प्रवृत्त केलं.निवडणूकीनंतरच्या सत्तास्थापनेच्या काळातील सर्व अडचणींवर ते स्वतः लक्ष देऊन मार्ग काढत राहिले.केवळ जनतेलाच नाही तर मित्रपक्षांतील नेत्यांनाही त्यांनी लढत राहण्याचा विश्वास दिला.   अर्थात बाबांचा हा लढावू बाणा एका दिवसांत आलेला नाही. त्यामागे त्यांची किमान पाच दशकांची वैचारिक मशागत आहे. अगदी पूर्वीपासूनच बाबांची भवतालचं आकलन करुन घेण्याची क्षमता अफाट आहे. या आकलनातून ते अचूक अंदाज बांधतात आणि त्यानुसार कृती करतात. लोकसभा निवडणूकीचं मतदान झाल्यानंतर ते लगेचच शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधू लागले. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला बाबांना असं थेट भेटणं खुपच आश्वासक वाटत होतं.गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतीक्षेत्राचं अतोनात नुकसान झालं आहे.नैसर्गिक संकटांची साखळी आणि त्यात केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांची शेतीप्रश्नांबाबतची अनास्था यांमुळे या वर्गाच्या मनात मुख्य प्रवाहापासून तोडले गेल्याची असुरक्षितपणाची भावना आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते.यामुळेच जेंव्हा ते थेट बांधावर जाऊन लोकांना भेटू लागले तेंव्हा लोकांना ते खुपच आश्वासक वाटलं. स्वतः बाबा देखील तब्येतीची कसलीही फिकीर न करता त्यांना भेटत होते. त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या संकटावर कशी मात करता येईल याचा विचारही करीत होते. त्यांच्यातील हा लढवय्या त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही,हेच त्यांचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी पुरेसं आहे.   बाबा,यावर्षी आयुष्याची आठ दशकं पुर्ण करीत आहेत.पण जणू काळ त्यांच्यासाठी थांबलेला आहे.आजही बाबांची नव्या जगाशी ओळख करुन घेण्याची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत काही ना काहीतरी वाचन करीत राहणे हा त्यांचा आवडता छंद... मी तर अगदी लहानपणापासून सकाळी सकाळी त्यांना पाहतेय ते वर्तमानपत्रांची मोठी चळत घेऊन वाचत बसल्याचं. वर्तमानपत्रांतील ओळ न् ओळ ते वाचून काढतात. मान्यवरांचे आणि अगदी नवोदितांचे देखील लेख ते वाचतात. त्यांची विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी मैत्री आहे. अगदी आमच्या दिल्लीतील घरी देखील आम्ही अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जमत असतो. बाबा, आमच्यात अगदी मिसळून जातात.हास्यविनोदात रमतात. रात्री कितीही जागरण झालं तरी भल्या पहाटे उठून त्यांचा नेहमीचा परिपाठ मात्र चुकत नाही आणि सकाळचं पेपरवाचन देखील. गेली पन्नास वर्षांहून अधिक वर्षे बाबा समाजजीवनात वावरत आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांना बाबांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. बाबांचे आणि माझे नाते कसे आहे याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असते. जे सर्वसामान्य घरांतील बाप-लेकीचं नातं असतं,अगदी तसंच हे नातं आहे. त्यात वेगळं असं काहीही नाही. माझ्या अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या कुटुंबात आपल्या समाजजीवनातील व्यस्तता आणलेली नाही.आपले काम आणि कुटुंब यांची सरमिसळ त्यांनी कधीच केली नाही. कुटुंबासाठी त्यांनी नेहमीच वेळ काढून ठेवला. अगदी वेळात वेळ काढून बाबा माझ्यासाठी माझ्यासोबत आले आहेत. माझ्या शाळेतही अगदी मुख्यमंत्रीपदावर असतानाही इतर पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिलेले आहेत. सत्ता ही क्षणभंगूर असते कायम राहते ती माणूसकी हे तत्त्व त्यांनी आम्हाला आपल्या कृतीतून सतत शिकविलं आहे. त्यांची ही शिकवण अंगी बाणवत आम्ही चालत आहोत. बाबा, माझ्यासाठी माझे रोल मॉडेल आहेत आणि राहतील. उलट यावर्षी त्यांचे हे स्थान आणखी घट्ट झालेय हे नक्की....

Read More
  350 Hits