2 minutes reading time (410 words)

[My Mahanagar]मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना लिहा, सुप्रिया सुळेंनी दिला राणा जगजितसिंह पाटलांना सल्ला

मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना लिहा, सुप्रिया सुळेंनी दिला राणा जगजितसिंह पाटलांना सल्ला

मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले. तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप या पत्रातून केला. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर केले आहे. "आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कोणतेही पत्र माझ्याकडे आलेले नाही. जर पत्र लिहायचेच आहे तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहावे," असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, माझ्या ऑफिसमध्ये कोणतेही पत्र आलेले नाही. पण, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ड्रग्सविरोधात मोहीम करू असे पत्र लिहिले. त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण करून मला का पत्र लिहितात? ते मला माहिती नाही. पत्र वाचून मी तुम्हाला उत्तर देईन, पण उत्तर हव असेल तर तेही मी देईन. माझा पहिला मुद्दा असा आहे की, ड्रग्स प्रकरणात माझ्या भावना एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. त्याचे स्पष्टीकरण हे मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे होते." असे त्यांनी स्पष्ट केले.

तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, "तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते."

"आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोलले गेले, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारे आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जी विधाने केली आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित 'मीडिया ट्रायल' करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे." असे ते या पत्रात म्हटले आहे. 

...

Supriya Sule : मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना लिहा, सुप्रिया सुळेंनी दिला राणा जगजितसिंह पाटलांना सल्ला

मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार …
[Jai Maharashtra]माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड ह...
[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद