3 minutes reading time
(579 words)
[Divya Marathi]मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, मला पत्र लिहू नका
सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंहांवर पलटवार; मंत्र्याच्या अनुपस्थितीवरूनही टीका
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषतः पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तसेच पक्षांतर आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अनुपस्थिती अशा विविध विषयांवर त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारले. यावेळी त्या नुकत्याच शस्त्रक्रिया झालेल्या वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला जाऊन आल्याचेही त्यांनी सांगितले. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही सूचनांसह त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारणा झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका तपशिलात मांडली. या प्रकरणावर माझ्या भावना मी आधीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. एक जबाबदार आई म्हणून, नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी योग्य ते करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपासून या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश आणि त्यांच्यावर असलेले आरोप यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे. या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुळेंना खुले पत्र लिहून त्यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या पत्राला उत्तर देताना सुळे यांनी ठाम भूमिका घेतली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कोणतेही पत्र माझ्याकडे आलेले नाही, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी टोला लगावत सांगितले की, जर त्यांना पत्र लिहायचंच असेल तर ते मला न लिहिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या प्रकरणाचा मागोवा घेत असलेल्या अंजली दमानिया यांना लिहावे. कारण मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे या वादात नवा राजकीय रंग भरल्याचे चित्र आहे.
पत्रकार परिषदेत सुळे यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दाही ठळकपणे मांडला. लोकसंख्या वाढ, वाहतुकीतील गोंधळ, ड्रग्जचे प्रकरण, तरुणांचे वाढते व्यसनाधीनता आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुण्यात गुन्हेगारीचा ग्राफ झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. गुन्हे रोखण्यासाठी अधिक व्यवस्थात्मक पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला सूचना केल्या. याचबरोबर पीपीपी मॉडेलऐवजी सीएसआर निधीतून रुग्णालये चालवण्याचा पर्याय अधिक उपयोगी ठरेल, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
मंत्री उपस्थित नसतील तर निर्णयप्रक्रियेत अडथळे

शेवटी, मंत्रिमंडळ बैठकीला काही मंत्र्यांची अनुपस्थिती हे देखील राज्याच्या प्रशासनासाठी योग्य संकेत नसल्याचे म्हणत सुळेंनी सरकारवर टीका केली. महत्त्वाच्या बैठकीत मंत्री उपस्थित नसतील तर निर्णयप्रक्रियेत अडथळे येतात, आणि त्याचा फटका थेट जनतेला बसतो, असे त्यांनी सांगितले. कालांतराने विविध पक्षप्रवेश, ड्रग्ज प्रकरणे, आरोप-प्रत्यारोप यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. सुळे यांच्या पत्रकार परिषदेने या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी टीकेला एक नवीन दिशा दिल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Supriya Sule PRESS CONFERENCE TARGETS Govt Pune Crime DRUGS Case | मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, मला पत्र लिहू नका: सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंहांवर पलटवार; मंत्र्याच्या अनुपस्थितीवरूनही टीका - Mumbai News | Divya Marathi
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषत: पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तसेच पक्षांतर आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अनुपस्थिती अशा विविध विषयांवर त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारले. यावेळी त्या नुकत्... | राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषत: पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तसेच पक्षांतर आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अनुपस्थिती अशा विविध विषयांवर त्यांनी थेट NCP Sharadchandra Pawar MP Supriya Sule held PRESS CONFERENCE criticized State Government. Sule TARGETED rising Pune CRIME Tuljapur DRUGS case Ministers' absence. She visited senior leader Chhagan Bhujbal confirmed stable health post-surgery.