1 minute reading time (108 words)

[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले. तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप या पत्रातून केला. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर केले आहे. "आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कोणतेही पत्र माझ्याकडे आलेले नाही. जर पत्र लिहायचेच आहे तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहावे," असे म्हणत त्यांनी टोला लगावला. 

[My Mahanagar]मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्य...
[NDTV Marathi]Supriya Sule, Sunil Bhusar यांनी Chh...