[Jai Maharashtra]माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हा हल्ला राजकारणातून झाला...'
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण का झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारहाण झालेले नितीन तावरे हे माळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आमच्या पक्षाच्या माळेगांव येथील शहराध्यक्षांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. शासनाने हल्ला करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे. हा हल्ला राजकारणातून झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
नितीन तावरे यांना बुधवारी सायंकाळी मारहाण झाली. या घटनेने माळेगावात वातावरण तापले. राजकीय कारणांतूनच मारहाण झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मारहाणीची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी राजकीय कारणांतूनच मारहाण झाल्याचे सांगितले जाते. माळेगावात नगराध्यक्षपदासाठी एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीतीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरीकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण…
— Supriya Sule (@supriya_sule) November 19, 2025

