आमच्याही लेकी घेतील गगनभरारी

आमच्याही लेकी घेतील गगनभरारी

देशाच्या राजकारण आणि समाजकारणात पवार कुटुंबीय गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. याचा पाया माझ्या वडीलांच्या आई, माझ्या आजी शारदाबाई पवार आणि माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या आहेत. शारदाबाई पवार यांनी अतिशय हिंमतीने कठोर प्रसंगांना सामोरे जात कुटुंबाचे संगोपन केले. सामाजीक जीवनातही त्यांनी मोठ्या हिंमतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारसा होता. त्यांची जडणघडणच सेवासदनमध्ये झाली होती. ही वैचारीक जडणघडणच त्यांना आगामी आयुष्यभर पुरली. त्याचप्रमाणे माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या देखील अतिशय कर्तृत्त्ववान होत्या. मुलं लहान असताना त्यांना ऐन तारुण्यात वयाच्या २८ व्या वर्षी अकाली वैधव्य आल...

Read More
  340 Hits

Born Free

Born Free

I am born in a family which has been active in the country's politics and in social work for more than half a century. The foundation for this was laid by my father's mother, my grandmother, Shardabai Pawar and my mother's mother, Nirmala Shinde. Shardabai Pawar was a lady of great courage who brought up the family while battling against significant odds in life. She created her unique identity in politics and social work with great courage and fortitude. She had the legacy of the Satyashodhak Samaj, a society that sought truth and rationality. Her personality was shaped and moulded in the intellectual atmosphere of Sevasadan. This intellectu...

Read More
  343 Hits

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

आजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या आजीची आवर्जून आठवण येते. आई खुप लहान असतानाच माझे आजोबा सदुभाऊ शिंदे यांचे निधन झाले. त्यावेळी माझी आजी निर्मला शिंदे यांचे वय केवळ सत्तावीस वर्षांचं होतं. या संकटाला आजी मोठ्या धीराने सामोरी गेली. आजोबांच्या पश्चात तिनं सगळ्या मुलांचं संगोपन मोठ्या हिंमतीनं केलं. माझ्या आजीचं हे ए...

Read More
  301 Hits

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा... !

‘मायमराठी’साठी हे करायलाच हवं...

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती... यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी आपल्या राज्यात बिंबविले. त्यांना आपल्यातून जाऊन शतके उलटली आहेत पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष जरी कानावर पडला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. रयतेच्या हितासाठी सदैव दक्ष असणारा हा रा...

Read More
  288 Hits

‘मायमराठी’साठी हे करायलाच हवं...

‘मायमराठी’साठी हे करायलाच हवं...

मातृभाषेबाबत लिहिण्याचं जेंव्हा ठरवलं तेंव्हा माझ्यासमोर राज्यातील सद्यस्थिती आहे. मुंबईसारख्या बहुभाषक, बहुसांस्कृतिक शहरांतील मराठी शाळांची दयनीय अवस्था माझ्यापुढे आहे. दुसरीकडे कमी पटसंख्येसारखे अव्यवहार्य कारण देऊन राज्यातील तेराशेहून अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयामुळे मराठी माणूस मग तो शहरी असो की ग्रामीण नाराज असल्याचे मला जाणवत आहे. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन शासनकर्त्यांना जाब विचारुन त्यांना जबाबदारीचे भान करुन देऊन साहित्यिकांनी सामाजीक अभिसरणातील आपले स्थान नेमकेपणाने दाखवून दिलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठी भाष...

Read More
  269 Hits

स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक...

स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक...

संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. जागतिक महिला दिन साजरा होत असताना क्रीडा क्षेत्रातून चांगल्या बातम्या आहेत. नेमबाजीमध्ये भारतीय महिलांनी देदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदके पटकाविली. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याचे एक समाधानी चित्र डोळ्यासमोर दिसत आहे.यावर्षी ब्लॉगसारख्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रथमच आपणा सर्वांशी संवाद साधत असताना माध्यमात गेल्या पंधरा वीस दिवसांच्या काळात प्रकाशित झालेल्या एका बातमीची मी आवर्जून उल्ल...

Read More
  286 Hits

त्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..

त्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..

प्रत्येक सजीवासाठी पाणी ही मुलभूत गरज आहे. भारतीय उपखंडात पाण्याची गरज मुख्यत्वे मोसमी पावसाच्या माध्यमातून भागविली जाते. मोसमी पाऊस हे या उपखंडाला लाभलेले निसर्गाचे अनोखे वरदान आहे. मोसमी पावसाच्या माध्यमातून नद्यांसारखे जलस्रोत ओसंडून वाहू लागतात. त्यांच्या माध्यमातून माणसाची पाण्याची गरज पुर्ण होते. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठावरच मानवी संस्कृती वसली याचे मुख्य कारणही पाण्याची गरजच आहे. प्राचीन काळी मानवी संस्कृतीही गंगा, ब्रह्मपुत्रा, सरस्वती असा जलस्रोतांच्या आसपासच वसली. जेथे मुबलक पाणी तेथे जगण्याच्या संधी अधिक, म्हणूनच पाण्याला जीवन असेही म्हणतात. जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचे नव्हे तर जीवनाचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा ज...

Read More
  306 Hits