आम्हास वारसा शिवछत्रपतींचा... !

‘मायमराठी’साठी हे करायलाच हवं...

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती... यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी आपल्या राज्यात बिंबविले. त्यांना आपल्यातून जाऊन शतके उलटली आहेत पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष जरी कानावर पडला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. रयतेच्या हितासाठी सदैव दक्ष असणारा हा राजा अजूनही लोकांच्या मनामध्ये जीवंत आहे. कुळवाडीभूषण शिवछत्रपतींनी केवळ एक राज्य उभं केलं नाही तर आत्मविश्वास हरवलेल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा उभारी दिली. बहुजन समाजातील दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन शून्यातून स्वराज्य निर्माण करताना त्यांनी प्रस्थापितांना जाणीवपूर्वक हादरे दिले. त्यांनी सामाजीक अभिसरणाचे जे अनोखे मॉडेल त्या काळी उभे केले होते ते विशिष्ठ प्रवृत्तींना पुर्वीही आवडले नव्हते आणि आजही त्यांना ते पसंत नाही. त्यामुळेच महाराजांच्या मृत्युनंतर त्यांची समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनी शोधून काढेपर्यंतच्या काळात महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचाच प्रयत्न झाला. परंतु सत्य काळाच्या विवरात कितीही खोलपर्यंत दडवून ठेवलं तरीही ते लपून राहू शकत नाही एवढे त्याचे तेज प्रचंड असते. त्यामुळे महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढून शिवजयंतीला सुरुवात केल्यानंतर तीचा प्रसार मोठ्या वेगाने झाला. महाराजांच्या चरीत्रातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात वीरांचे जत्थेच्या जत्थे उतरले. महाराजांच्या विचारांची जादू ही एवढी प्रखर होती की, त्यानंतरच्या प्रत्येक समाजसुधारकांनी महाराजांच्या कार्यातूनच प्रेरणा घेतल्याचे प्रांजळपणे नमूद केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांना हव्या असणाऱ्या आणि सर्वांचे हित जोपासणाऱ्या भारताची, समतेचे राज्य, सर्वांना न्याय देणारी व्यवस्था जेंव्हा उभारायची होती तेंव्हाही महाराजांच्या शासनव्यवस्थेचे आणि तंत्राचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवले गेले होते. महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती तेंव्हापासून महाराजांना बदनाम करण्यासाठी टपल्या होत्या. त्यातूनच त्यांच्या नावाने सवर्ण आणि दलित दंगली पेटविण्याचा घृणास्पद प्रयत्नही करण्यात आला पण तो सजग समाजानं उधळून लावला. त्यामुळेच या मंडळींचा पोटशूळ आणखीच वाढला. ओठांवर महाराजांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांचा प्रभाव कशा प्रकारे संपवायचा याच्या योजना आखण्याचे उद्योग करायचे हा यांचा आवडता धंदा. राज्यातील सत्ताधारी पक्षानेही निवडणूकीच्या काळात शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्ता स्थापन करण्यास निघालो आहोत असा प्रचार केला होता. शिवरायांच्या नावाने मतांचा जोगवा त्यांनी मागितला. त्यांना जनतेने मतेही दिली. परंतु जेंव्हा ते निवडून आले तेव्हा मात्र ते महाराजानांच विसरले. आता त्यांच्याच पक्षाच्या अहमदनगर शहरातील श्रीपाद छिंदम या उपमहापौराने शिवरायांबद्दल अपशब्द काढून आपल्या विचारांची मळमळ बाहेर काढली. अर्थात छिंदम ही व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत तथाकथित उच्च विचारांचे आणि संस्कृतीरक्षणाचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आहे. अर्थात छिंदमचे प्रकरण ‘ ही मंडळी’ कशाप्रकारे विचार करतात याचे प्रातिनिधीक उदाहरण आहे. शिवरायांच्या पुण्यतिथीला यांच्याच विचारांचे लोक ढोल वाजवितात. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा करुन ते रखडविले जाते. सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा विकासही निधी अभावी रखडवला जातो. ही सर्व उदाहरणे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत अशा प्रवृत्तीचा भरणा आहे हे गुपित यानिमित्ताने उघड झाले आहे. ओठात एक आणि पोटात एक अशी यांची स्थिती. यामुळेच आता या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या याच विचारांच्या लोकांची सद्दी असली तरी छत्रपती शिवरायांच्या घोर अपमानानंतर आता त्यांची उलटगिणती सुरु झाली आहे. कारण जरी छिंदमने माफी मागितली तरी ते प्रकरण तेवढ्यावरच थांबत नाही. कारण त्याने संपुर्ण महाराष्ट्राचा आणि त्याच्या गौरवशाली परंपरेचा अपमान केला आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या विचारांनी भारलेला मावळा अशा विचारांना पराभूत करण्यासाठी सदैव कार्यरत राहील याचा मला विश्वास आहे. शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. - सुप्रिया सुळे,  खासदार

Read More
  131 Hits

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा… !

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा… !

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती… यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी आपल्या राज्यात बिंबविले. त्यांना आपल्यातून जाऊन शतके उलटली आहेत पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष जरी कानावर पडला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. रयतेच्या हितासाठी सदैव दक्ष असणारा हा राजा अजूनही लोकांच्या मनामध्ये जीवंत आहे. कुळवाडीभूषण शिवछत्रपतींनी केवळ एक राज्य उभं केलं नाही तर आत्मविश्वास हरवलेल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा उभारी दिली. बहुजन समाजातील दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन शून्यातून स्वराज्य निर्माण करताना त्यांनी प्रस्थापितांना जाणीवपूर्वक हादरे दिले. त्यांनी सामाजीक अभिसरणाचे जे अनोखे मॉडेल त्या काळी उभे केले होते ते विशिष्ठ प्रवृत्तींना पुर्वीही आवडले नव्हते आणि आजही त्यांना ते पसंत नाही. त्यामुळेच महाराजांच्या मृत्युनंतर त्यांची समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनी शोधून काढेपर्यंतच्या काळात महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचाच प्रयत्न झाला. परंतु सत्य काळाच्या विवरात कितीही खोलपर्यंत दडवून ठेवलं तरीही ते लपून राहू शकत नाही एवढे त्याचे तेज प्रचंड असते. त्यामुळे महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढून शिवजयंतीला सुरुवात केल्यानंतर तीचा प्रसार मोठ्या वेगाने झाला. महाराजांच्या चरीत्रातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात वीरांचे जत्थेच्या जत्थे उतरले. महाराजांच्या विचारांची जादू ही एवढी प्रखर होती की, त्यानंतरच्या प्रत्येक समाजसुधारकांनी महाराजांच्या कार्यातूनच प्रेरणा घेतल्याचे प्रांजळपणे नमूद केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांना हव्या असणाऱ्या आणि सर्वांचे हित जोपासणाऱ्या भारताची, समतेचे राज्य, सर्वांना न्याय देणारी व्यवस्था जेंव्हा उभारायची होती तेंव्हाही महाराजांच्या शासनव्यवस्थेचे आणि तंत्राचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवले गेले होते. महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती तेंव्हापासून महाराजांना बदनाम करण्यासाठी टपल्या होत्या. त्यातूनच त्यांच्या नावाने सवर्ण आणि दलित दंगली पेटविण्याचा घृणास्पद प्रयत्नही करण्यात आला पण तो सजग समाजानं उधळून लावला. त्यामुळेच या मंडळींचा पोटशूळ आणखीच वाढला. ओठांवर महाराजांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांचा प्रभाव कशा प्रकारे संपवायचा याच्या योजना आखण्याचे उद्योग करायचे हा यांचा आवडता धंदा. राज्यातील सत्ताधारी पक्षानेही निवडणूकीच्या काळात शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्ता स्थापन करण्यास निघालो आहोत असा प्रचार केला होता. शिवरायांच्या नावाने मतांचा जोगवा त्यांनी मागितला. त्यांना जनतेने मतेही दिली. परंतु जेंव्हा ते निवडून आले तेव्हा मात्र ते महाराजानांच विसरले. आता त्यांच्याच पक्षाच्या अहमदनगर शहरातील श्रीपाद छिंदम या उपमहापौराने शिवरायांबद्दल अपशब्द काढून आपल्या विचारांची मळमळ बाहेर काढली. अर्थात छिंदम ही व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत तथाकथित उच्च विचारांचे आणि संस्कृतीरक्षणाचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आहे. अर्थात छिंदमचे प्रकरण ‘ ही मंडळी’ कशाप्रकारे विचार करतात याचे प्रातिनिधीक उदाहरण आहे. शिवरायांच्या पुण्यतिथीला यांच्याच विचारांचे लोक ढोल वाजवितात. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा करुन ते रखडविले जाते. सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा विकासही निधी अभावी रखडवला जातो. ही सर्व उदाहरणे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत अशा प्रवृत्तीचा भरणा आहे हे गुपित यानिमित्ताने उघड झाले आहे. ओठात एक आणि पोटात एक अशी यांची स्थिती. यामुळेच आता या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या याच विचारांच्या लोकांची सद्दी असली तरी छत्रपती शिवरायांच्या घोर अपमानानंतर आता त्यांची उलटगिणती सुरु झाली आहे. कारण जरी छिंदमने माफी मागितली तरी ते प्रकरण तेवढ्यावरच थांबत नाही. कारण त्याने संपुर्ण महाराष्ट्राचा आणि त्याच्या गौरवशाली परंपरेचा अपमान केला आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या विचारांनी भारलेला मावळा अशा विचारांना पराभूत करण्यासाठी सदैव कार्यरत राहील याचा मला विश्वास आहे. शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा.– सुप्रिया सुळे,  खासदार

Read More
  324 Hits

क्रांतीचे अग्रदूत

क्रांतीचे अग्रदूत

देशातील लोकशाही व्यवस्था एवढी बळकट का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जेंव्हा मी प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवले की, येथे आहार-विहार-विचार आदींची विविधता असली तरी लोकसत्ताक मूल्यांबाबत जनता प्रचंड जागरुक आहे. ही जागरुकता एका दिवसात आलेली नाही तर ती सततच्या विचारप्रक्रियेतून येथील समाजमनात खोलवर रुजलेली आहे. यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. लोकसभेत मी जेंव्हा त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करण्याची मागणी केल्याचे वृत्त माध्यमांत आले, तेंव्हा त्याचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. काही माणसं ही पुरस्कारांपेक्षाही मोठी असतात. फुले दांम्पत्य हे त्यापैकीच एक आहे. त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करणे म्हणजे खरेतर ‘भारतरत्न’चाच गौरव ठरणारा आहे. अर्थात त्यासाठी केंद्र सरकारने तशी मानसिकता दाखविण्याची आवश्यकता आहे. महात्मा फुले यांच्या मृत्यूला सव्वा शतकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी घालून दिलेल्या सत्यशोधकी पायवाटेचा आज महामार्ग झाला आहे. पण हे सर्व करताना त्यांना त्या काळात ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्यांची आता कल्पनाही करवत नाही. कर्मठ विचारांच्या प्रवृत्तींनी त्यांच्या अंगावर अक्षरशः मारेकरी घातले. सावित्रीबाईंना तर शेण आणि दगडांचा माराही सहन करावा लागला. पण तरीही या दोघांनीही आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. ज्या काळात मुलींनी शाळा शिकणे हे पाप समजले जात असे, धर्मशास्त्रानुसार त्यांना ज्ञानार्जनाची संधी नाकारण्यात आली होती, त्या काळात त्यांनी १८४८ साली स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली. शुद्रातिशुद्र समाजासाठी त्यांनी नवी दृष्टी दिली. ज्ञानाचा नवा प्रकाश त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुला केला. यामागील त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. हे महात्मा फुले यांच्या पुढील रचनेतूनच लक्षात येते. फुले म्हणतात.... विद्ये विना मती गेली । मती विना निती गेली ।। निती विना गती गेली । गती विना वित्त गेले ।। एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ।। महात्मा फुले यांच्या कार्याची महतीच सांगायची असेल तर मला इतिहासातील तीन मोठ्या व्यक्ती त्यांच्याबद्दल काय विचार करायच्या ते आवर्जून सांगावे लागेल. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांना गुरुस्थानी मानायचे हे सर्वश्रृत आहेच. ‘फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू ’ असे ते अभिमानाने सांगायचे. पुण्यामध्येच १९३२ साली एका भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘जोतीराव फुले देशातील पहिले आणि खरे महात्मा होते’. तर सावरकरांनी त्यांचा उल्लेख करताना ‘समाज क्रांतिकारक’ असे विशेषण वापरले आहे. हे तिन्ही नेते एका विशिष्ट विचारसरणीचे नेतृत्त्व करतात; पण जेंव्हा ते फुल्यांबाबत बोलतात, तेंव्हा मात्र त्यांचे एकमत होते. अगदी अलीकडे येऊन बोलायचं झाल्यास, प्रख्यात विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जे शाळा बंद करण्याचे फर्मान सोडले आहे, ते वाचताना १८८२ साली महात्मा फुले यांनी हंटर आयोगाकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची केलेली मागणी आवर्जून आठवते. तळागाळातील जनता जर शिक्षित व्हायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या सुविधा सहज उपलब्ध होतील अशा असल्या पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका कित्येक दशके उलटून गेल्यानंतरही समर्पक वाटते. शिक्षणाबाबत त्यांच्या भूमिका आणि धारणा अगदी पक्क्या होत्या. त्या सखोल अभ्यासाअंती तयार झाल्या होत्या. शैक्षणिक गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी १८५४ साली ‘प्रौढ शिक्षण अभियान’ सुरु केले होते. यामध्ये त्यांनी स्त्रीयांना शिक्षण कसे मिळेल याकडे आवर्जून लक्ष दिले होते. या सर्व कामांमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना केवळ साथच दिली नाही तर त्यांच्या पश्चात आपल्या दत्तक मुलास सोबत घेऊन त्यांचे कार्य पुढे सुरुच ठेवले. यातून जी कार्यनिष्ठा दिसते तिला तोड नाही. पुण्यातील भिडेवाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील शिक्षिका सावित्रीबाई फुले याच होत्या. त्या जेंव्हा शिकविण्यासाठी जात तेंव्हा सनातनी विचारांचे गावगुंड त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करीत. त्यांच्या अंगावर शेण-दगड फेकून मारत. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबांनी दाखवून दिलेल्या वाटेवरुन त्या चालत राहिल्या. जर त्या वाटेवरुन सावित्रीबाई माघारी फिरल्या असत्या, तर स्त्रीशिक्षणाची पहाट उजाडण्यासाठी आणखी किती शतके वाट पहावी लागली असती, याची कल्पनाही करवत नाही. फुल्यांच्या या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने ‘मांगा महारांच्या दुःखा’विषयी लिहिलेल्या निबंधातून शिक्षणाचा प्रकाश वंचितांच्या अंधारविश्वात पडल्यानंतर त्यांच्या जाणीवांना कसे शब्द आले हे स्पष्ट होते. त्यानंतर स्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, पहिली स्त्री संपादक तान्हुबाई बिर्जे अशा विद्यार्थिनी पुढे उदयास आल्या. त्यांच्या साहित्याची खोली पाहिली तर फुल्यांच्या विचारांची उंची सहज लक्षात येईल. शेतकऱ्यांच्या समस्यांची मांडणी करण्यासाठी त्यांनी लिहिलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आजही शेतकरी चळवळींसाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी मार्गदर्शक असेच आहे. इंग्लंडचा राजकुमार 'ड्यूक ऑफ कॅनॉट' समोर देशातील जनतेचे खरे चित्र दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा वेश...

Read More
  124 Hits