[Zee 24 Taas]पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप; मदतीला धावल्या सुप्रिया सुळे, 'कोणी फसवलंय का...'
Supriya Sule On Parth Pawar: पार्थ पवार यांच्यावर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रकरणी पार्थ पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. जमीन खरेदी कारणासाठी नियमानुसारच प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सविस्तर जाणून घेऊया.
नुसते आरोप प्रत्यारोप करुन चालणार नाही. मीडिया ट्रायल करु नये. पार्थ माझ्या मुलासारखा आहे. तो कधीच गैरव्यवहार करणार नाही. माझा पार्थवर विश्वास आहे. कादगपत्र व्यवस्थित तपासायला हवी, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे म्हणाल्या. ही सरकारची जमीन असेल तर असं कसं असेल? जमीनीचा व्यवहार कसा होईल? पार्थला कोणी फसवलंय का? हा वेगळा प्रश्न आहे. मी काही कागदपत्र पाहिले नाहीत. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा काय व्यवहार आहे हे तपासावं. मला त्या व्यवहाराबद्दल काही माहिती नाही. घाईघाईने बोलण्यापेक्षा मी पार्थशी बोलेन. मी स्वत: एकही कागद पाहीला नसल्याचे त्यांनी सांगितले
300 कोटींची जमीन घेण्यासाठी पैसा कुठून येतो? या प्रश्नावर मी माहिती घेते आणि उत्तर देते, असे सुप्रिया सुळे म्हणाले. मला रेवती, विजय आहेत तसे रोहित, पार्थ ही सर्व मुले आमचीच आहेत. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण पार्थची बाजू जाणून घेऊया, असे त्या म्हणाल्या.
हा देश कोणाच्याही मनमर्जीने चालत नाही. न्याय सर्वांसाठी सारखाच असला पाहीजे. कदाचित हा व्यवहार झालाही नसेल. जी प्रक्रीया करुच शकत नाही. सरकारची जमीन विकूच शकत नाही. त्या कंपनीचा कुठल्या वर्षी व्यवहार झाला मला माहिती नाही. कलेक्टर त्यांची बाजू मांडतील. मला सकाळीच ही माहिती मिळाली. याची माहिती घेते. जे काही होईल ते पारदर्शक व्हाव, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

