1 minute reading time (145 words)

मंडई मेट्रो स्थानकास महात्मा फुलेंचे नाव

मंडई मेट्रो स्थानकास महात्मा फुलेंचे नाव

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश

 पुणे : महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

पुणे शहरात स्वारगेट ते पिंपरी दरम्यान मेट्रो सुरू झाली असून या मार्गावर महात्मा फुले मंडई येथे एक स्थानक आहे. या मेट्रो स्थानकाचे नाव प्रशासनाने " मंडई मेट्रो स्थानक" असे ठेवले आहे. परंतु हे नाव "क्रांतिसूर्य महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक" असे ठेवण्यात यावे अशी मागणी खासदार सुळे यांनी केली होती.

त्यांची ही मागणी मान्य करत पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या मागणीची दखल घेऊन या स्टेशनचे नामकरण महात्मा फुले स्टेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल पुणे मेट्रो आणि शासनाचे सुळे यांनी आभार मानले आहेत.
स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल...
दौंड-पुणे डेमूला अंतिम थांबा पुणे रेल्वेस्थानकच