दौंड-पुणे डेमूला अंतिम थांबा पुणे रेल्वेस्थानकच
खासदार सुळे यांच्या पाठपुराव्याला यश
ही गाडी पुणे स्टेशन ऐवजी हडपसर स्टेशन वर थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मार्च २०२३ मध्ये घेतल्याबरोबर लगेचच खासदार सुळे यांनी आश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरच थांबवणे योग्य असल्याचे म्हटले होते. दौंड -पुणे-दौंड या मार्गावर नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये उभा राहणे सुद्धा मुश्किल होते, इतकी गर्दी असते. त्यातच डेमू हडपसरला थांबणार असल्याने त्या गाड्यांवर आणखी गर्दीचा भार पडणार असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतरही वारंवार पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार सुळे यांचा यासाठी पाठपुरावा सुरू होता.
दौंड-पुणे-दौंड डेमू ही गाडी पुण्याला पोहोचण्यासाठी एक तास चाळीस मिनिटे एवढा वेळ घेते. ती जर हडपसरला थांबवली, तर गर्दी आणि वेळ वाढणार. परिणामी नियमित प्रवास करणारे, विद्यार्थी, कर्मचारी, लहानमोठे व्यावसायिक, दूध विक्रेते यांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या गाडीच्या स्थानकात बदल करू नये, अशी मागणी खासदार सुळे या सातत्याने करत होत्या. अखेर या मागणीला यश आले असून दौंड पुणे डेमूचा अंतिम थांबा पुन्हा एकदा पुणे रेल्वे स्टेशन हाच झाला आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
दौंडहून सकाळी पुण्यासाठी जाणारी डेमु गाडी क्रमांक 01522 आता पुणे स्टेशनपर्यंत जाणार आहे. यामुळे गेली काही महिन्यांपासून होणारी नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे. यापुर्वी ही गाडी हडपसर स्थानकापर्यंतच जात असल्याने नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत रेल्वे… pic.twitter.com/bjItvXAklZ
— Supriya Sule (@supriya_sule) October 4, 2024