कुंभारगाव-इंदापूरला भेट देण्याचे पर्यटकांना आवाहन इंदापूर : उजनीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यावर मुक्त विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी ही चालू हंगामातील एक नितांत सुंदर अशी पर्वणीच असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या धरणाकाठी वास्तव्यास आलेल्या या परदेशी पाहुण्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच...
इतक्या कमी वेळात हरकती, सूचना कशा मांडायच्या? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) – बारामती आणि इंदापूर ही दोन मोठी शहरं. त्यापैकी बारामती तालुक्यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावे याचा अर्थ एकूण 26 ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांची जमीन पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक जमीन मालकांना हरकती आणि सूचना मांडण्यासाठी सरकारने दिलेली मुदत अत्यंत कमी असून नागरिकांचा गोंधळ उडू शकतो, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.इंदापूर आणि बारामती या दोन तालुक्यांच्या हद्दीतून राष्ट्र संत तुकाराम महाराजाची पालखी जाते. हा मूळ रस्ता सहा पदरी होणार असून त्यासाठी या हजारो नागरिकांच्या जमिनी अंशतः घ्याव्या लागणार आहेत. हे करत असताना जसा पालखी आणि वारकऱ्यांचा विचार झाला तसा त्या जमीन मालकांचाही विचार व्हायला हवा होता; तथापि तो झालेला दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी केली आहे.राज्य शासनाने भूसंपादनासाठी अद्यादेश 9 मार्च रोजी काढला असून हरकती सुचनांसाठी 21 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानुसार ही मुदत उद्या म्हणजे 29 मार्च 2018 रोजी संपत आहे. हे पाहता 21 दिवसांची मुदत देताना त्याच तारखेला म्हणजे 9 तारखेलाच किंवा एखादा दिवस आगे-मागे शासनाने जाहिरात प्रसिद्ध करायला हवी होती. तसे न करता ती काल म्हणजे 27 मार्च रोजी प्रसिद्ध केली. ते पाहता अवघ्या दोन दिवसांत हजारो लोकांनी आपल्या हरकती कशा नोंदवायच्या; आणि त्यावर सुनावणी कशी होणार याचे उत्तर शासनाकडे आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.वास्तविक इतक्या मोठ्या संख्येचे प्रश्न 21 दिवसांत सुटनेही अश्यक्य असताना शासनाने लोकाना सांगण्यात आणखी दिरंगाई केली आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या अवघे दोन दिवस मिळत आहेत. या दोन दिवसांत तलाठी, प्रांत आणि तहसीलदार आदी महसूल कार्यालयांत नाहक गर्दी करून 'लोक ऐकत नाहीत. आम्ही ऐकायला तयार आहोत पण विनाकारण गर्दी करून लोक कामात अडथळे आणत आहेत' असा कांगावा सरकारला करायचा आहे काय?, असा सवाल खादार सुळे यांनी उपस्थित केला आहे.शेकडो वर्षांचा पालखी सोहळा सुरळीत व्हावा. वारकर्यांना विना अडथळा पालखी सोबत चालता यावे, त्यासाठी रस्ता रुंद असावा. तो शासनाने करून द्यायला हवा. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार. हे आम्हासही कळते. किंबहुना त्यासाठी आमचा पाठिंबाच आहे; तथापि चांगल्या कार्यात अशा प्रकारचे तांत्रिक घोळ घालून ऐनवेळी सर्वसामान्य नागरिकांचे गळे आवळण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया. राजकुमार थोरात 04.07 PM 2supriya_sule_17सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976