1 minute reading time (250 words)

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..
वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.

 
 
 



राजकुमार थोरात 04.07 PM

2supriya_sule_17


सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.

त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.

ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.

http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सु...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी क...