गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...
नाशिक | एक महिन्यात शेतकऱ्यांना (Farmer) सरसकट कर्जमाफी न केल्यास सरकारला रस्त्यावर (Road) फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्य...
मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा! Supriya Sule on Devendra Fadnavis : मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशाव...
The transcript discusses India's political response to Operation Sindoor. NCP leader Supriya Sule outlines the message of Indian delegations to the world: zero tolerance for terrorism and India's unity in challenging times. Sule emphasizes the focus on exposing Pakistan's role in supporting terrorists. The conversation also touches on domestic poli...
सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदेंसहीत कोण कोण? नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकच्या अलिकडच्या लष्करी संघर्षाबद्दल प्रमुख परदेशी सरकारांना माहिती देण्यासाठी केंद्राने सात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. खासदारांच्या या शिष्टमंडळात महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.गट)च्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यां...
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वाद होतानाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कशी गुप्तपणे भेट घेतली, याबाबत खुलासा केला होता. मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून ते किमान 10 ते 12 वेळा वेश बदलून कसे गेले होते हे त्यांनी सांगितले होते. तसेच ...
राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर नाट्य घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. भाजप-शिंदे सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. त्यानंतर नाही, हा म्हणता म्हणता राष्ट्रवादीतही फुट पडली. सहकाऱ्यांसह अजितदादा महायुतीत सहभागी झाले. त्यांनी दोन वर्षानंतर सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भेटायला जायचो. वेशांतर करायचो याची माहिती माध्यमांना दिल...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर बाजू मांडली. अखेर निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच...
सकाळ वृत्तसेवाशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली.शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हा एक्स्पो होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, माजी मंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.श्री. खोतकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यात मराठा समाजाचे नुकसान शेतीनेच झाले आहे. अधिकच्या शेतीमुळे पूर्वी व्यवसायात लोक उतरायचे नाहीत. आता ही परिस्थिती बदलायला हवी.’’ श्री. बागडे यांनीही महाएक्स्पोला शुभेच्छा दिल्या.यावेळी रंगनाथ काळे, माजी आमदार कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उद्योजक सचिन मुळे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार, शिवाईच्या पुष्पा काळे, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख, डॉ. अनुपमा पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती.आपल्यावरील संस्कार रामायणातूनशासन हे सातत्याने चालणारे काम आहे. सारखे कायदे बदलतात, सध्याचे जग ऑटोमेशनचे असल्याने नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत. कुठल्याही सरकारसमोर हा प्रश्न असेल. त्यामुळे निवडणुकात कितीही टोकाची टीका केली तरी नंतर सोबत काम करायलाच हवे. तसेच आपल्यावर जे संस्कार आहेत ते रामायणातून झाले आहेत. ते विसरता कामा नये, असेही यावेळी खासदार सुळे यांनी नमूद केले.https://www.esakal.com/marathwada/fight-unity-drought-supriya-sule-business-mahaexpo-151914
सकाळ वृत्तसेवागुरुवार, 13 सप्टेंबर 2018वडापुरी : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील 250 कुटुंबियांना घरकुल मंजूर होऊन गेली 30 वर्षे कालावधी झाला व आता गरीब कुटुंबातील नागरीक घरकुलामध्ये राहत आहेत. परंतु सदर जागा वनखात्याची असल्याने आता या लोकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे असल्याने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यांतील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्या आहेत.या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरीक या ठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे सामान्य जनतेला उभारी देणारी नाहीत, नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे या गावातील नागरीकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा काढावा, मी या भागाची खासदार म्हणून गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.तसेच इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कॅनॉल मधून पाझर तलाव भरावे अशी विनंती केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिले असल्याने तालुक्यातील जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.खासदार सुप्रिया सुळे यांचे लाखेवाडी गावात अभिनंदन -गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून येथील गरीब कुटुंबातील नागरीकांचा वन विभागाचे जागे संदर्भात समस्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सोडविल्या नाहीत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने लाखेवाडी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे.http://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-meets-collector%C2%A0-lakhevadi-village-taluka-indapur-143625
शौकत तांबोळीबुधवार, 12 सप्टेंबर 2018नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. सुप्रिया सुळे या नरसिंहपूर परिसरातील गावभेट दौरावर होत्या. गणेशवाडी येथे त्यांच्या गाड्यांचा ताफा शालेय विद्यार्थ्यांनीनी अडवून सदरची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, अशोक घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रियंका खडागळे ही विद्यार्थिनी म्हणाली की बावडा - नरसिंहपूर राज्य मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस आहे. परंतु मोडकळीस आलेल्या, खराब, स्क्रॅप, ब्रेकफेल होणारे एसटी बसेसमुळे आम्हाला अनेकदा शाळा बुडवावी लागली आहे. अनेकदा तर परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चालत जावे लागले आहे.आठवड्यातून दोन दिवस शाळा चुकत असते असे वैष्णवी खंडागळे यांनी सांगितले. तसेच सोनाली खंडागळे, अंकिता भोसले, साक्षी कांबळे, सोनाली जाधव, मनिषा खंडागळे आदि विद्यार्थ्यीनीनी सुळे यांच्याशी बोलताना तक्रारी सांगितले.खासदार सुळे म्हणाल्या, यासंदर्भात मी व भरणेमामा परिवहन मंत्र्यांना भेटून चर्चा करून प्रश्न निकाली काढतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवावे असे आवाहन केले. ताई तुम्ही आमच्या काही विद्यार्थ्यीनीनी सायकल दिल्याने थोडासा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे तुमचे आमच्या व कुटुंबियांचा वतीने खूप खूप आभारी आहे. यापुढेही असाच लोभ राहावा, असेही या विद्यार्थिनींनी आवर्जून सांगितले. http://www.sarkarnama.in/students-stop-mp-supriya-sules-convoy-28564
मटा ऑनलाइन | Updated:Sep 15, 2018, 06:03AM ISTपुरोगामी भारतात महिलांवरील अन्याय-अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. याबाबत ते मौन बाळगून का आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला. हरयाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करायला हवा. महाराष्ट्रातही सातत्याने मुलींची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होऊन बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या गुन्हे अहवालात अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. याचे उत्तर कोण देणार आहे, असा सवाल सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींचे अपहरण करून उचलून नेण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. हे या सरकारचे अपयश आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/supriya-sule-criticises-narendra-modi-on-womens-safety-issue/articleshow/65815551.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=PMModi150918
खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना ट्विटप्रभात वृत्तसेवा पुणे – “दुष्काळ सेस’च्या नावाखाली पेट्रोलवरील लावलेल्या अधिभाराच्या रकमेतून नेमके काय केले, त्याची आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यासंदर्भातील ट्विट सुळे यांनी केले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे पावसाचे दुर्भिक्ष असते. त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांच्या हिताचे नाव देत राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पेट्रोलवर “दुष्काळ सेस’ लावला. प्रतिलिटर तीन रुपये असा त्याचा दर आहे. आज देशातील सर्वात महागडे पेट्रोल महाराष्ट्रात विकले जाते. दराने नव्वदी गाठली आहे. सेसमधून मागील तीन वर्षांत ते पैसे जमा केले, त्याचा पडताळा जाहीर करावा. महाराष्ट्राला रोजच्या रोज किती पेट्रोलची गरज आहे, त्यातील प्रत्यक्ष विक्री किती होते? त्यातून शासनाला किती महसूल मिळतो, दुष्काळ सेस अंतर्गत किती रक्कम जमा झाली, त्यातील किती रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली, कोणत्या नव्या कृषीयोजना आणल्या, त्याचा किती शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, किती शेतकऱ्यांची कर्जे फिटली, किती शेतकरी कायमचे कर्जमुक्त झाले याची सविस्तर आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.कर्जमाफीसाठी या सरकारने शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतके करूनही पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचे लाभ पोहोचलेही नाहीत. एक चूक झाली तर अर्ज अपलोडच होत नव्हता, असे असताना शेकडो गोरगरीब शेतकऱ्यांना “बोगस’ ठरवले गेले, असा आरोप सुळे यांनी केला आहे.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95/
खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाहीपुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – गुजर-निंबाळकरवाडी येथील प्रस्तावित पीएमआरडीएच्या रिंगरोडमुळे या भागातील काही नागरिकांची घरे बाधित होत आहेत. त्यांची घरे पाडण्यापेक्षा यातून सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे. यादृष्टीने मी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथील नागरिकांना दिली. गुजर-निंबाळकरवाडी या गावातून रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातून रस्त्याला विरोध होत आहे. येथील सर्व्हे क्रमांक १२ मधील अनेक घरे या रिंगरोडमुळे उध्वस्त होणार असून त्यांचे संसार उघड्यावर येतील. या कुटुंबांचा विचार करावा, आणि आपण याकामी लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आज सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. वास्तविक रिंगरोडचा प्रस्ताव १९९७ मध्ये आला. त्यानंतरही या भागात जागा विक्री होत राहिली. अनेकांनी जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. त्याचवेळी येथील जमीन खरेदी विक्रीला पायबंद घातला असता तर ही वेळ आली नसती. असे न करता याठिकाणी घरे उभारू दिली आणि आता १९९७ च्या प्रस्तावानुसार रिंगरोडसाठी जागेची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मोजणी होताच घरे पडली जातील. या भीतीने येथील अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. पीएमआरडीएने याबाबत सर्वसमावेशक तोडगा काढावा, त्यासाठी सुळे यांनी मध्यस्ती करावी, अशी मागणी येथोल नागरिकांनी निवेदनात केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेत सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात लोकांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढावा, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सरकारनामामंगळवार, 18 सप्टेंबर 2018 मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि 'महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे' असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली. http://www.sarkarnama.in/ajit-pawar-supriya-sule-offer-prayaers-lalbagchaa-raja-28816
बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 20, 2018 01:59 AM | Updated: September 20, 2018 01:59 AM बारामती : मुले चांगल्या शिक्षकांमुळेच हुशार होतात. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या टॅबवर माझा अजिबात विश्वास नाही. या टॅबमुळे मुले अजिबात हुशार होत नाहीत. तंत्रज्ञानावर फार जोर देऊ नये. बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील गदिमा सभागृहात आदर्श शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचा खासदार सुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, पंचायत समिती उप सभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.http://www.lokmat.com/pune/do-not-stress-technology-supriya-sule/
मिलिंद संगई11.26 AMबारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत, राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णतः निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिध्द करणारी असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणा-या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर टीका केली आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sule-ask-question-cm-about-rape-incident-145106
सरकारनामा ब्युरोशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 बारामती : राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलीवर बलात्कार झाला, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णत: निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिद्ध होते असे सुळे यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्तेच्या परिस्थिीतवर गंभीर टीका केली आहे. http://www.sarkarnama.in/supriya-question-law-and-order-state-28898
सकाळ वृत्तसेवा01.38 AMहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. कासारसाई परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे.या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळे, अमित कंधारे, हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, कासारसाईचे सरपंच युवराज कलाटे आदी उपस्थित होते.पीडितेच्या नातेवाइकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसून, या घटनेत जुजबी कलम लावल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी सुळे यांना दिली असता त्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याशी संपर्क साधून गुन्ह्याची गंभीरता व नोंदवलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली.या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असून अटकेत असलेला आरोपी गणेश निकम (वय २२) याच्यावर कलम ३७६ एबी, ३७६ डीबी, ३७७, पाक्सो ५ एम (सामूहिक बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार कलमे लावल्याचे गवारे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवश्यक ते पुरावे व जवाब नोंदविण्याचे काम पोलिस करत आहे.’’कायदा जनजागृतीची गरजअशा घटनांबाबत मीडिया, सोशल मीडियामध्ये चर्चा होत असताना लोकांना कायद्याची भीती का वाटत नाही. एका चुकीमुळे संपूर्ण जीवन उदध्वस्त होते. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. सरकारनेही लैंगिक शिक्षणापेक्षा अशा घटनांचे दुष्परिणाम व कायद्याची भीती निर्माण होईल असा अभ्यासक्रम आणणे काळाची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.http://www.esakal.com/pune/give-us-justice-victims-family-members-demand-145245
सकाळ वृत्तसेवा12.19 PMभाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.http://www.esakal.com/maharashtra/ncp-mp-supriya-sule-talked-about-nagar-incident-and-government-146031