विलास कुलकर्णीबुधवार, 3 ऑक्टोबर 2018मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे .- सुप्रिया सुळे राहुरी (नगर) : "आमचा पंधरा व भाजपचा साडेचार वर्षातील कारभार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे", असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. पत्रकारांशी बोलतांना केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करीत खासदार सुळे म्हणाल्या, "बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये तीन वर्षात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील रस्त्यांची वाट लागली. खड्डयांमुळे अपघात वाढले. त्याचा मला त्रास होतो. प्रशासनाला नाही. शेतकऱ्यांवर लाठीमार हे पाप आहे. नवी दिल्लीत तेही घडले." "महिलांच्या सुरक्षीतते विषयी मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींच्या किडनॅपींगची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'ब्र' शब्द काढला नाही. त्यांना ते मान्य आहे. किंवा त्यांचे हात बांधले असावेत. सामान्य माणसाने असे विधान केले असते, तर ती व्यक्ती जेलमध्ये असती. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री यावर गंभीर नाहीत. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा." राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, मंजुषा गुंड, संदीप वर्पे, अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, मनीषा ओहोळ, निर्मला मालपाणी, कपिल पवार उपस्थित होते. http://www.sarkarnama.in/supriya-sule-challenges-devendra-fadnavis-open-debate-29341
सरकारनामा ब्युरोमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 औरंगाबाद: भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याची भाषा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तरी बोलाव ही अपेक्षा होती. पण ते बोलले नाही, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा होता ?अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात सुळे बोलत होत्या. भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे त्याठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली. संविधान जाळण्याचा प्रयत्न जेव्हा दिल्लीत झाला, तेव्हा संविधान बचावसाठी सर्वात आधी राष्ट्रवादीने आंदोलन केले आणि त्यानंतर देशभरात सुरू झाले याची आठवण करून देतांनाच महिलांची सुरक्षितता गंभीर बाब असून सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी यापुढे महिलांच्या बाबतीत चुकीची, अपमान करणारी वक्तव्य केली तर राष्ट्रवादी ते कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला. तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? सुप्रिया सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला. धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे म्हणत त्यांनी मुंडे यांची फिरकी घेतली. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-cm-29513
सरकारनामा ब्युरो, गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच पदाधिकारी चुकिचे विधान करीत आहेत. आमदार चक्क मुलीना पळवून नेण्याच्या गोष्टी करतात, परंतु गृहविभाग त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपला खरोखरच सत्तेची मस्ती आली आहे, जनताच आता ती मस्ती उतरवेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांराशी बोलतांना व्यक्त केले. सुळे काल (ता. 10) पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, की राज्यात महिलामध्ये असुरक्षततेची भावना आहे. महिलांच्या मनात भिती आहे. त्यांच संरक्षण हे सरकार करू शकत नाही, त्यात सत्तेतील आमदारच मुलीना पळविण्याची विधान करतात. त्यांच्यावरही कारवाई होत नाहीत. राज्यातील सरकार संपूर्णपणे असंवेदनशील झालेले आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. आता जनताच त्यांची मस्ती उतरविणार आहे. दुष्काळ जाहीर करावामराठवाडा, खानदेश भागात पाण्याची परिस्थित भीषण आहे. परंतु हे शासन झोपलेले आहे. अद्यापही दुष्काळ जाहीर करून उपययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जर दुष्काळाची स्थिती आहेच तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन विलंब का करीत आहे. दुष्काळ निवारण्यासाठीही शासन वेळकाढू धोरण राबवित आहे. असा आरोपही त्यांनी केला. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-bjp-government-29587
सकाळ वृत्तसेवागुरुवार, 11 ऑक्टोबर 2018पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.सत्कारावर होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरावी. खरेतर या स्थितीची सरकारी यंत्रणेने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून दखल घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळ नाहीच असे चित्र उभा करीत आहेत. हे खेदजनक आणि असंवेदनशीलतेचे अत्युच्च टोक देखील आहे. कसलीही घोषणा अथवा पुर्वसूचना न देता राज्यात ठिकठिकाणी भारनियमन, विजकपात सुरु आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी देतानाही हात आखडता घेतला जात आहे, असा आरोप ही सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. दुष्काळ जाहीर करायला विलंब का होतोय? सरकारने संवेदनशीलता जपत मराठवाडा आणि अन्य ठिकाणी जेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे, त्या त्या ठिकाणी तातडीने दुष्काळ जाहिर करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.http://www.esakal.com/pune/be-aware-drought-conditions-do-not-spend-felicitates-said-supriya-sule-149138
कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: October 12, 2018 09:52 PM | Updated: October 12, 2018 09:57 PM धरणगाव - कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, युवतीवरील अत्याचार व युवकांची व्यसनाधिनता विरोधात त्यांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, पी.आर.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, संचालीका निनाताई पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, मुख्याध्यापक प्रा.बी.एन. चौधरी, के.एम. पाटील, सी.के.पाटील उपस्थित होते.तुझ्या प्रश्नाचे उत्तर मोदीसाहेबच देतील...ईश्वर पवार या विद्यार्थ्याने आपली परिस्थिती गरीबीची असल्याने मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू शकलो नाही. आरक्षण घटकात मोडत नसल्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा लागला. शेतकºयाच्या लेकरांना सरकार फी माफी देत नाही तर दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांना भरमसाठ सवलती सरकार देत आहे. तेव्हा हे सरकार १२५ कोटी जनतेचे आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे..? असा प्रश्न उपस्थित करताच टाळ्यांचा गजर झाला. यावेळी खासदार सुळे मात्र निरुत्तरीत झाल्या. या प्रश्नाचे उत्तर मोदी साहेबच देवू शकतील. मी तुझा प्रश्न त्यांना टिष्ट्वटर वरुन विचारते व तुला कळवते असे त्यांनी सांगितले.http://www.lokmat.com/jalgaon/give-farmers-farmers-guarantee-their-farm-loan-waiver-mp-supriya-sule/
योगिराज प्रभुणे, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 पुणे : सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार या योजनेतून केली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. "जलयुक्त शिवार'च्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत त्या म्हणाल्या, "माननीय मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात येतील तेव्हा हे त्यांना जरूर विचारा. हा त्यांचा, त्यांच्या सरकारचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम' आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. कारण, त्यांच्यासारखे नुसते आरोप करण्याची माझी स्टाइल नाही आणि खोटं मी बोलत नाही.'' "जलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार हा कार्यक्रमाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पुरेसा अभ्यास न करता घाईघाईने योजना राबविली. हा "पब्लिसिटी स्टंट' असेल. मुख्यमंत्री जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात. कार्यक्रमाची अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्याचा मिळणारा प्रतिसादाचा आढावा घेतला नाही. त्यातच हा प्रकल्पातील तांत्रिक चुका आणि नंतर पैशाचीपण कमतरता झाल्याने सगळा गोंधळ झाला आहे,'' असे त्या म्हणाल्या. "जलयुक्त शिवारासाठी सरकारने किती कामे केली आणि श्रमदानातून किती कामे उभी राहिली, याचाही हिशेब सरकारने दिला पाहिजे. सरकारने त्यांचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम राबविला. त्यासाठी "पब्लिसिटी' केली,'' असे सुळे यांनी सांगताच यावर तुमची भूमिका काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ""मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचे "क्रेडिट' घेत नाही आणि त्यांच्यासारखे बिनबुडाचे आरोपही करत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आता बोलत आहेत. पण, सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली.'' http://www.sarkarnama.in/i-dont-speak-lie-cm-sule-29931
योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे. अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली. राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर "राष्ट्रवादी'च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. http://www.sarkarnama.in/amalner-supriya-sule-devendra-fadanvis-29575
सरकारनामा ब्युरोशनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड, बलात्कार अशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-questions-devendra-fadavnis-28676
मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर - रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sules-selfie-pothole-cm-will-be-answerable-144500
सरकारनामा ब्युरोमंगळवार, 18 सप्टेंबर 2018 बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-target-cm-fadanvice-pitch-28780