1 minute reading time (193 words)

सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज: तारीख,वेळ, ठिकाण सांगा, खुल्या चर्चेस तयार 









विलास कुलकर्णी

बुधवार, 3 ऑक्टोबर 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे .
- सुप्रिया सुळे

राहुरी (नगर) : "आमचा पंधरा व भाजपचा साडेचार वर्षातील कारभार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे", असे आव्हान  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पत्रकारांशी बोलतांना केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करीत खासदार सुळे म्हणाल्या, "बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये तीन वर्षात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील रस्त्यांची वाट लागली. खड्डयांमुळे अपघात वाढले. त्याचा मला त्रास होतो. प्रशासनाला नाही. शेतकऱ्यांवर लाठीमार हे पाप आहे. नवी दिल्लीत तेही घडले."

"महिलांच्या सुरक्षीतते विषयी मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींच्या किडनॅपींगची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'ब्र' शब्द काढला नाही.  त्यांना ते मान्य आहे. किंवा त्यांचे हात बांधले असावेत. सामान्य माणसाने असे विधान केले असते, तर ती व्यक्ती जेलमध्ये असती. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री यावर गंभीर नाहीत. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा."

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, मंजुषा गुंड, संदीप वर्पे, अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, मनीषा ओहोळ, निर्मला मालपाणी, कपिल पवार उपस्थित होते.

http://www.sarkarnama.in/supriya-sule-challenges-devendra-fadnavis-open-debate-29341
 
हेलिकॉप्टरने फिरणाऱ्यांना सामान्यांचे प्रश्‍न समजत...
ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा ...