1 minute reading time
(202 words)
दुष्काळी परिस्थितीचे भान राखा; सत्कारांवर खर्च नको : सुप्रिया सुळे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.http://www.esakal.com/pune/be-aware-drought-conditions-do-not-spend-felicitates-said-supriya-sule-149138