1 minute reading time (138 words)

लालबागच्या राजाला अजितदादा-सुप्रियाताईंचे साकडे








सरकारनामा

मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि 'महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे' असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले.


महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.

अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली.
 http://www.sarkarnama.in/ajit-pawar-supriya-sule-offer-prayaers-lalbagchaa-raja-28816

सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून ...
महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां का...