1 minute reading time (226 words)

दुष्काळाशी एकजुटीने लढू - सुप्रिया सुळे

दुष्काळाशी एकजुटीने लढू - सुप्रिया सुळे



सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018
औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली.
शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्‍स्पो २०१८’च्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये २५ ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान हा एक्‍स्पो होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, माजी मंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.

श्री. खोतकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यात मराठा समाजाचे नुकसान शेतीनेच झाले आहे. अधिकच्या शेतीमुळे पूर्वी व्यवसायात लोक उतरायचे नाहीत. आता ही परिस्थिती बदलायला हवी.’’ श्री. बागडे यांनीही महाएक्‍स्पोला शुभेच्छा दिल्या.

यावेळी रंगनाथ काळे, माजी आमदार कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उद्योजक सचिन मुळे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार, शिवाईच्या पुष्पा काळे, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख, डॉ. अनुपमा पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती.

आपल्यावरील संस्कार रामायणातूनशासन हे सातत्याने चालणारे काम आहे. सारखे कायदे बदलतात, सध्याचे जग ऑटोमेशनचे असल्याने नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत. कुठल्याही सरकारसमोर हा प्रश्‍न असेल. त्यामुळे निवडणुकात कितीही टोकाची टीका केली तरी नंतर सोबत काम करायलाच हवे. तसेच आपल्यावर जे संस्कार आहेत ते रामायणातून झाले आहेत. ते विसरता कामा नये, असेही यावेळी खासदार सुळे यांनी नमूद केले.

https://www.esakal.com/marathwada/fight-unity-drought-supriya-sule-business-mahaexpo-151914
केवळ संघटनकौशल्य पाहून सुप्रिया सुळे यांनी युवती स...
शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी...