1 minute reading time (189 words)

तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे


बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 20, 2018 01:59 AM | Updated: September 20, 2018 01:59 AM


बारामती : मुले चांगल्या शिक्षकांमुळेच हुशार होतात. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या टॅबवर माझा अजिबात विश्वास नाही. या टॅबमुळे मुले अजिबात हुशार होत नाहीत. तंत्रज्ञानावर फार जोर देऊ नये. बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील गदिमा सभागृहात आदर्श शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचा खासदार सुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, पंचायत समिती उप सभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

http://www.lokmat.com/pune/do-not-stress-technology-supriya-sule/
या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सुप्रिया स...
खड्यात जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी सरकार...