By: एबीपी माझा, वेब टीम | Last Updated: 16 Jul 2018 04:11 PM स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनं शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदानाची मागणी केली. https://abpmajha.abplive.in/maharashtra/ncp-and-shivsena-supports-swabhimani-milk-protest-562977
डाॅ. संदेश शहा : शुक्रवार, 13 जुलै 2018 इंदापूर : बारामती हा देशातील आदर्श लोकसभा मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. रक्तक्षय तसेच कुपोषण मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत आहे. नकोशी मुलगी हवेशी होण्यासाठी सायकल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. मुलींनी माहेरची आठवण म्हणून सायकल लग्न झाल्यानंतर सासरी नेवू नये असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल मैदानावर इंदापूर विधान सभा मतदारसंघातील आशा वर्कर्स तसेच शालेय युवतींना सुमारे दोन कोटी रूपयांच्या ती हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे यांनी युवतींशी सुसंवाद साधत त्यांना बोलते करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पुन्हा प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत. सौ. सुळे म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्रत्येकी दहा हजार श्रवणयंत्रे व सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या धोरणाने गरिब महिला व शेतक-यांसाठी लढण्यास कटिबध्द आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सर्वप्रथम रक्तक्षय मुक्त करण्याचे धोरण आहे. महिलांच्या कर्करोगाचे निदान व्हावे म्हणून देशात सर्वप्रथम पुणे जिल्हाप रिषदेने कार्यक्रम हाती घेतला आहे. युवती व महिला सुरक्षितपणे फिरल्या पाहिजेत हे माझे स्वप्न असून हे स्वप्न पुर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देवू. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मामून काम करणा-या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या प्रतिनिधी असल्याने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. खासदार सुळे या आदर्श संसदपटू असून त्यांनी सर्वत्र जनसंपर्क ठेवून विकासकामे केली आहेत. सायकल वाटप कार्यक्रमामुळे युवती व महिला त्यांना कधीच विसरणार नाहीत.
दिवेघाटाच्या पालखीचा अवघड टप्पा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार केला, यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, या वेळी सुप्रिया सुळे यांनी फुगडीचा फेर देखील धरला. NCP Leader | Supriya Sule Joined Pandharpur Wari Crossed Dive Ghat Valleyhttps://www.youtube.com/watch?v=EgHKTLjux8o
पुणे : दिवेघाटात सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला Updated 09 Jul 2018 11:26 PMhttps://abpmajha.abplive.in/videos/pune-supriya-sule-at-diveghat-wari-560331
संतोष आटोळे : शुक्रवार, 6 जुलै 2018 Baramati Model Of Development Is Famous In The Countryशिर्सुफळ : घरोघरी गॅस ही संकल्पना केंद्र व राज्य सरकार आता राबवित आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील बहुतांशी भागात हा विकास यापूर्वीच पोचला आहे. यामुळेच विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.कटफळ (ता.बारामती) या मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष राहुल वाबळे, अनिल हिवरकर,राजेंद्र काटे, दत्तात्रय आवाळे, अँड.नितीन आटोळे, सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी सुळे म्हणाल्या, तालुक्यामध्ये दौरा करीत असताना कोठेही पायाभूत सुविधांची गैरसोय असल्याची तक्रार येत नाही. याचा अर्थ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सरकार आता ज्या योजना राबवित आहे. त्या बारामतीमध्ये पंचवीस वर्षांपासूनच कार्यान्वित आहेत. या कामाचे कौतुक देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते करीत असतात. यापुढेही विकासाची ही घोडदौड पुढे चालवीत बारामतीची आन, बान आणि शान कायम राखणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सुळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व आयुका संस्थेच्या वतीने प्रत्येक अवकाशाच्या माहिती देणाऱ्या तारांगणचे प्रातिनिधिक उद्घाटन करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मोकाशी, सूत्रसंचालन ग्रामसेवक अमोल घोळवे यांनी तर आभार संग्राम मोकाशी यांनी मानले.तालुकाध्यक्षांच्या कामाचे कौतुक...यावेळी खासदार सुळे यांनी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्य संभाजी होळकर यांचे विशेष कौतुक केले. यासर्व विकासकामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह पूर्वीचे बांधकाम व आरोग्य सभापती व पक्षाचे तालुकाध्यक्ष यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विकासकामांसह पक्षाची चांगली संघटना बांधली. तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.http://www.esakal.com/pune/baramati-model-development-famous-country-says-supriya-sule-128760
संतोष आटोळे : 09.32 AM Supriya Sule Appreciates Water Conservationशिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाले आहेत. यासाठी प्रशासनासह विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.बारामती मधील गाडीखेल येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मगरपट्टा सिटी यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण करण्यात आले. या ठिकाणी पियाजिओ व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पुजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या ''खाजगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातुन दोन टक्के निधी हा सामाजिक विकासकामांसाठी राबविण्याचा निर्णय हा आघाडीसरकारच्या कालखंडात घेतलेला निर्णय आहे. यामाध्यमातुन सर्वत्र विविध कंपन्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये बारामती तालुक्यात सकाळ रिलीफ फंड, भारत फोर्ज, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मगरपट्टा सिटी, शरयू फाउंडेशन यांच्या सारख्या संस्थाच्या माध्यमातुन होत असलेली जलसंधारण, शैक्षणिक कामे समाधानकारक आहेत. याचे सुखद परिणाम भविष्यात दिसतील.'' यावेळी खा.सुळे यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुळे यांनी गाडीखेल अंर्तगत येणाऱ्या धायतोंडेवस्ती येथील आयएसओ मानांकन ठरलेल्या अंगणवाडीची पाहणी केली व अंगणवाडीच्या रंगरंगोटी व इतर सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल दळवी, शरद शेंडे, राणी गाढवे, संगिता धायतोंडे, लिलाबाई दळवी, माजी सरपंच दिलीप आटोळे, रायचंद आवदे, दादा आटोळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच अनिल आटोळे यांनी केले.http://www.esakal.com/pune/supriya-sule-appreciates-water-conservation-128844
सरकारनामा ब्यूरो : गुरुवार, 5 जुलै 2018 किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठकपुणे : किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न किरकटवाडी-नांदोशी विकास फोरमने ट्विटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडला. त्याची तत्काळ दखल घेत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक बोलवली आहे.ट्विटरच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेला इतक्या तातडीने मिळालेल्या प्रतिसादामुळे विकास फोमचे पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.या संदर्भात बोलताना किरकटवाडी-नांदोशी फोरमचे सदस्य प्रफुल्ल पेटकर म्हणाले, "" आमच्या रस्त्याचा प्रश्न मोठा बिकट आहे. नांदोशी, सणसवाडी, किरकटवाडी या भागात जवळपास 10 हजार लोकसंख्या आहे. मात्र रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. मार्च महिन्यात खासदार सुळे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.Kirkatwadi Development Forum@KirkatwadiForum · 5 Jul Good morning everybody ! Another new day starts but the old story continues. #KirkatwadiNandoshiRoad @supriya_sule @Dev_Fadnavis @ChDadaPatil @OfficialPMRDA @kirangitteias @CollectorPune @eSakalUpdate @abpmajhatv @nitin_gadkari pic.twitter.com/9kRRacsVfq Supriya Sule✔@supriya_sule I have written letters to concern authorities about #KirkatwadiNandoshiRoad and taking regular follow up.Meeting with @CollectorPune Shri. Naval Kishore Ram is scheduled for Mon. 9th July at 10 am to discuss the said issue.Kindly be present. 5:57 PM - Jul 5, 2018 69 35 people are talking about thisआम्ही ट्विटरवर खासदार सुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेकांना हा विषय कळविला होता. मात्र खासदार सुळे यांनी दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क करून येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा पेटकर यांनी व्यक्त केली.http://www.sarkarnama.in/supriya-sule-responds-immediately-twitter-25689
पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला खाद्य महोत्सव आजपासून धनकवडी येथे सुरू झाला. धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय केंद्र येथे रविवार पर्यंत हा महोत्सव चालू राहणार आहे.ग्रामीण भागातील गरजू आणि कष्टकरी वर्गातील महिलांना रोजगार मिळावा, तसेच त्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांना योग्य ती बाजारपेठ मिळावी म्हणून सुळे यांनी याच महिलांच्या बचत गटाद्वारे विविध ठिकाणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. ही संकल्पना पुण्यात आता चांगलीच रुजत असून आज धनकवडी येथे सुरू झालेल्या या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापूर्वी वारजे, सिंहगड रस्ता परिसर आणि कात्रज भागात हे महोत्सव झाले आहेत.धनकवडी येथील खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुळे यांच्या भगिनी रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक विशाल तांबे, किशोर धनकवडे यांच्यासह अश्विनी भागवत, नरेंद्र पवार, विजया ठाकरे, आदी याप्रसंगी उपस्थित होते. या महोत्सवात नेहमीप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात आंबेगाव बुद्रुक येथील तेजल मरगजे यांनी पैठणी जिंकली असून ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
Vijay Chavan, Pune Mirror | Updated: Jun 12, 2018, Assures better coordination between different authorities to address issues related to road, water and sanitation; irate residents seek results instead.After time and again approaching the civic authorities in a span of four years to get their woes addressed, the residents of housing societies in Mahalunge finally saw a ray of hope recently. Things took a positive turn when the locals wrote to the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) and the Prime Minister’s Office (PMO). Subsequently, guardian minister Girish Bapat, member of Parliament (MP) Supriya Sule, district collector Naval Kishor Ram, PMRDA commissioner Kiran Gitte, zilla parishad chief executive officer (CEO) Suraj Mandhare and other civic officials visited the affected area to find out the problems pointed out by the locals. On May 20, 2018, we carried a report, titled, ‘This is a road to death for locals of Mahalunge’, stating the government’s apathy and the voices raised by the residents. On June 7, 2018, we carried another report, titled, ‘We’ll give up our Aadhaar cards if basic amenities are not given’, reporting that the locals gave a deadline of three months to resolve their issues after which they would return their Aadhaar cards to the authorities. During the recent visit to the area, the minister as well as civic officials assured them to resolve the problems of road connectivity and garbage. For starters, the PMRDA officials even handed over five ghanta gaadis (garbage collecting trucks) to the Mahalunge gram panchayat. Talking to Mirror,Bapat said, “The village has been included in the Town Planning (TP) scheme. Before going ahead with the development of the area, basic amenities such as better road, water supply and regular garbage collection will be provided on priority basis. We have also assured the residents that the village will be connected to the remaining city and that all the woes will be addressed. The roads will be made pothole-free.” The minister continued, “There needs to be coordination between different authorities, who are responsible for road, water and sanitation. The locals, too, need to cooperate with the newly-built housing societies.” To this, Gitte added, “Initially, we will be solving issues related to the garbage in the area. We have also made arrangements of ghanta gaadis for this. We are also negotiating with the villagers to solve problems related to road and land acquisition.” Meanwhile, residents say they are happy that their letter bore fruit but expect positive results at the earliest. Aditya Kumar Gupta, a resident of Saarrthi Souvenir, said, “The visit of the minister and senior civic officials has certainly brought some hope for us, but we want firm decisions and not just false assurances. We have been getting such assurances for four years now. We are fed up.” Over 5,000 residents near Vibgyor High School in Mahalunge-Balewadi are facing serious problems due to absence of road, proper sanitation, water supply and street lights. They have even started circulating resolutions, stating that members of housing societies will not pay any tax to the government, including property tax and income tax, if they were not given any facilities. The societies that are mostly affected are Teerth Towers, Saarrthi Souvenir, Jardin, Anandvan, Yashwin, Sanjeevani, Neelmani Pinnacle, Sangam Phase I and Phase II, My Nest, Ilina, among others. https://punemirror.indiatimes.com/pune/civic/guardian-minister-looks-into-mahalunge-troubles/articleshow/64550222.cms
ST Correspondent : 01.36 PM Supriya_SulePune: NCP MP Supriya Sule criticised the BJP government for lacking a scientific approach and said leaders associated with the party make foolish statements as a result of this. Sule was interacting with the media during her visit to Pune Municipal Corporation (PMC) on Monday.Sambhaji Bhide, founder of Shiv Pratishthan Hindustan (SPH), who was accused for his alleged role in the Bhima-Koregaon riots, made a statement in Nashik that those who eat mangoes from his farm are blessed with a kid. Reacting to it, Sule said, “BJP’s union ministers do not believe in Darwin’s theory. People around the Prime Minister do not believe in science. So they make statements like Sita is the first test tube baby. Now, look at this statement, if a woman eats mangoes from Bhide’s farm, she will get pregnant. BJP leaders make foolish statements one after the other.”She added, “NCP will conduct a ‘Halla Bol’ agitation in different parts of the State. There is a strong anti-government sentiment against the current government.”On Monday, Sule met Pune Municipal Commissioner Saurabh Rao to discuss the lack of facilities at eleven villages recently merged with the PMC. She alleged, “After eight months of the merger, the PMC has not done anything for these 11 villages. There is no basic infrastructure like water, roads, sanitation, health, etc.”She also demanded that well-known Maharashtrian poet GD Madgulkar’s memorial be built along Mutha River near Wakad, besides the Madhavrao Shinde Garden. NCP leader of Opposition in PMC Chetan Tupe was present for the meeting. Rao gave an assurance that all works would be completed soon.http://www.sakaltimes.com/pune/%E2%80%98bjp-leaders-make-foolish-statements-party-doesn%E2%80%99t-believe-science%E2%80%99-19608
गावांच्या विकासासाठी आयुक्तांची भेट – पंकजा मुंडे यांच्यावरही टीकास्त्र प्रभात वृत्तसेवा -June 11, 2018 | 8:38 pmपुणे – “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून, भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयी द्वेष दिसून येतो असे मत सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी नगरसेवक उपस्थित होते.बारामती मतदार संघात येणाऱ्या पुणे महापालिका हद्दीतील गावांतील प्रश्नांसंदर्भात सुळे यांनी आयुक्त सौरभ राव यांची सोमवारी भेट घेतली त्यांनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.प्रत्येक महिलेला आई असण्याचा अभिमान असतो; मला देखील तो आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेले विधान हे निषेधार्थ असून त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयक द्वेष दिसून येतो, अशी टीका सुळे यांनी केली. राष्ट्रवादीचे हे आंदोलन “हल्लाबोल’ नसून “डल्ला मारो’ आहे असे विधान महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी आहे. भाजपला “हल्लाबोल’आंदोलनाचा त्रास होत असल्यानेच अशाप्रकारचे विधान त्यांच्याकडून केले जात आहेआयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेबद्दल सुळे म्हणाल्या, “समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. गावे समाविष्ट होऊन आठ महिने झाले, तरी महापालिका काहीच करत नाही असेच चित्र आहे. या गावांच्या विकासाबाबत आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. कवी ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल, असे त्यांचे स्मारक येथे व्हायला हवे. परंतु तसे होत नाही हे खेदजनक आहे, अशी टीका सुळे यांनी केली. आयुक्तांना याविषयीही सांगितल्याचे त्या म्हणाल्या.म्हणून शरद पवारांना लक्ष केले जातेबोलण्याचा आणि टीका करण्याचा आधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, व्यक्तिगत टीका करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून काही लोक शरद पवार यांना लक्ष करतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.पंतप्रधानांना पत्र लिहणारकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. या परीक्षेमुळे गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम अधिकारी देशाला लाभतात. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करत आहे. या परीक्षेचे महत्त्व कमी करू नये, यासाठी लवकरच आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/
पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: June 11, 2018 | Updated: June 11, 2018पुणे: गेले ४ वर्षे शरद पवार सत्तेत नाहीत. मात्र तरीही टीका करायला तेच लागतात, कारण त्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार यांच्या टिकाकारांचा समाचार घेतला. पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. बैठकीनतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकार वर सडकून टीका केली. डार्विनचा सिद्धांत चुकीचा असे या़चे शिक्षणमंत्री म्हणत असतील तर काय बोलायचे असा प्रश्न करून सुळे म्हणाल्या, या सरकारचा व विशेषतः पंतप्रधानांच्या भवताली असणाऱ्यांचा विज्ञानावर विश्वासच नाही असे वाटते. त्यामुळे त्यांना कधी सीता टेस्ट ट्यूब बेबी वाटते तर कधी भारतात पुर्वी सगळे होतेच असे सांगितले जाते. काहीही आधार नसलेले बोलले जात आहे. महिलांविषयी बेताल वक्तव्ये केली जात आहेत. हे बरोबर नाही. त्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन राज्याच्या सर्व भागात होत आहे. पुण्याचे रविवारी झाले आता कोकणात होणार आहे. नंतर नाशिकला घेतले जाईल. जनताच या सरकायच्या विरोधात चालली आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते, मात्र त्याला तेही कधी उत्तर देत नाहीत व मीही देणार नाही. जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण अशा सुसंस्कृत नेत्यांचे संस्कार पवार साहेब व नंतर आमच्यावर झाले आहेत, त्यामुळे टीकेची पर्वा करत नाही, सत्तेत येवून चार वर्ष झाली तरीही टीका करण्यासाठी अजून पवारच लागतात यावरून त्यांचे महत्त्व समजते असे सुळे म्हणाल्या. समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. 8 महिन्यांनतरही पालिका काही करत नाही असेच चित्र आहे. आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती सुळे यांनी दिली. महाकवी गदिमा यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल असे त्यांचे स्मारक इथे व्हायला हवे. त्यावर काही होत नाही हे खेदजनक आहे असे सुळे यांनी सांगितले. आयुक्तांना त्याविषयीही सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी सुळे यांच्यासमवेत होते. http://www.lokmat.com/pune/though-pawar-not-power-he-needs-criticized/
Published On: Jun 12 2018 10:08AM | Last Updated: Jun 12 2018 पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावरंग' रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अभिनेत्री गिरीजा प्रभू, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शहराध्यक्ष बाबा पाटील, प्रवक्ते योगेश सुपेकर उपस्थित होते. रांगोळीकार सोमनाथ भोंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलादालनात २१ पोट्रेट रांगोळ्या साकारल्या आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साहित्य, कला व सांस्कृतिक विभागातर्फे या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. http://www.pudhari.news/news/Pune/Rangoli-exhibition-on-the-anniversary-of-NCs-party/
सकाळ वृत्तसेवा : 02.30 AMपुणे : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी केली. तसेच, सरदार मुजुमदार वाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्वासन राव यांनी या वेळी दिले.पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा नदीकाठी (वाकडेवाडी परिसर) येथील माधवराव शिंदे उद्यानालगत गदिमांचे स्मारक उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत याठिकाणी केवळ सीमाभिंत उभारली गेली आहे. स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. या पार्श्वभूमीवर गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. खडकवासल्यातील रखडलेल्या कामांसह विविध प्रश्नांसदर्भात सुळे यांनी राव यांची भेट घेतली.महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, श्रीधर माडगूळकर, सुमित्र माडगूळकर, आलोक आंबेकर या वेळी उपस्थित होते. तेव्हा, गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा मांडून ते का रखडले, याची विचारणा करण्यात आली. त्यातील अडचणी दूर करून तेथे प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली. गदिमांच्या स्मारकासाठी निधी देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून सुळे या करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्याच्या भिंतीला तडा गेल्याने वाड्याला धोका निर्माण झाला असल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही सुळे यांनी चर्चा केली.महापालिकेत नव्याने आलेल्या गावांमधील रहिवाशांना अजूनही सेवा-सुविधा मिळत नाहीत. प्रामुख्याने रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य आदी सुविधा पुरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून पावले उचलावीत.सुप्रिया सुळे, खासदारhttp://www.esakal.com/pune/complete-memorial-g-d-madgulkar-immediately-123105
संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 11, 2018 माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सोशल मीडियावरही टीका होऊ लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आहे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे, महिलांचा हा अपमान आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच त्यांनी केला आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशात आणि राज्यात जे सरकार आहे त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना विज्ञानावरच विश्वास नाही. देशाचे शिक्षण मंत्रीच म्हटले होते की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. ही बाब खरोखर दुर्दैवी आहे या वक्तव्यांचा मी एक महिला म्हणून निषेध करते असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रात आज महिलांचा अशा वक्तव्यांमधून अपमान केला जातोय. महिलांना समान अधिकार देण्याचे धोरण सर्वात आधी महाराष्ट्रात आले अशा महाराष्ट्रात महिलांचा या प्रकारे अपमान होणे अत्यंत खेदजनक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाजी भिडे यांनी नेमके काय म्हटले आहे?माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजप च्या मंत्री पंकजा मुंडे या काल पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्ला बोल आंदोलन नसून डल्ला मारो असे विधान केले आहे.या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी असून या पुढील काळात देखील राज्यातील अनेक भागात हल्ला बोल आंदोलन काढण्यात येणार आहे.असे सांगत भाजप ला या हल्ला बोल चा त्रास होत असल्याने अशा प्रकारचे विधान केले गेले आहे.अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे च्या विधानाचा खरपूस समाचार घेतला https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhides-statement-is-insulting-women-says-supriya-sule-1695041/
- सुप्रिया सुळे, खासदार : शनिवार, 9 जून 2018अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि देशातील मोठ्या नेतृत्त्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. लोक मोठ्या उत्कंठेने त्यांच्या भाषणाची वाट पाहत होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजीपार्क अक्षरशः दुमदुमून गेले. आपल्या नेहमीच्या शैलीत साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. साहेब म्हणाले, "दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे." देशाला एक नवा विश्वास देताना साहेब पुढे म्हणाले, "सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे." पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे. साहेबांनी शिवाजीपार्कवरील त्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठीत राजकारणाचा वसा घेऊन शरद पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेली विविध क्षेत्रातील कामे जनतेच्या लक्षात आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. आपल्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात देशातील कृषीव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याव्दारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पोषक निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही तर अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख राष्ट्र बनला. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रीया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्त्व असणाऱ्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचा जनतेला दीर्घकालीन फायदाच झाला आहे. म्हणूनच विकास कार्याबाबत शरद पवार हे अधिक विश्वासार्ह नाव आहे, याची जनतेला खात्री आहे. प्रत्यक्ष अनुभवातून देशभरात याची प्रचितीही आलेली आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पवधीतच जनतेची पसंती मिळाली. खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते. खरेतर १९-२० वर्षे हा काळ एखाद्या संघटनेसाठी फार मोठा काळ नाही. आता तर कुठे खरी सुरुवात झाली असून पक्षाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा संदेश देणारी वेळ आहे. आजघडीला समाजाच्या प्रत्येक स्तरात पक्षाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्त्व आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, गेल्या चार वर्षांत त्याचे मजबूत जाळ्यात रुपांतर केले आहे. हे जाळे पवार साहेबांसारख्या कणखर आणि कर्तबगार नेतृत्त्वाखाली पुर्वीपेक्षाही अधिक सक्रीयतेने कार्यरत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आपल्या दीड दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजीक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, उर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपुर्व अशी आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने शेतीसाठी पतपुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरविले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पुरविला. बचत गटाची व्यापक चळवळ चालवून महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासून इंग्रजीसारखा...
Maharashtra Times | Updated: Jun 10, 2018, 05:35AM ISTम. टा. प्रतिनिधी, पुणे'प्राईमटाईम फाउंडेशन'च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'संसदरत्न' पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील 'आयआयटी'च्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते सुळे यांना गौरविण्यात आले.यावेळी आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, 'प्राईमटाईम फाउंडेशन'चे संस्थापक के. श्रीनिवासन आदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना तो प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता.संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर 'संसदरत्न' पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कार स्वीकारताना सुळे म्हणाल्या, 'माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. हा पुरस्कार मला जनतेलाच समर्पित करताना आनंद होत आहे.'https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/mp-supriya-sule-got-sansad-ratna-award/articleshow/64523594.cms
Protesters claim 11,500 teachers’ posts lying vacant across state; earlier pleas have fallen on deaf ears
पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकरांवर सुप्रिया सुळेंचा निशाणामुंबई : राज्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही.खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी सध्या संपावर गेला आहे. या संपा संदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या संपाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना म्हटले होते. त्यानंतर पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खा.सुळे टीका केली. राज्यातील शेतकरी संपावर असताना राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.http://www.mumbainagri.com/ncp-mp-supriya-sule-sharad-pawar-pash-patel-prakash-ambedkar-farmers-issue-9139/
एमपीसी न्यूज - रविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे रविना टंडन या वास्तवतेपासून कोसो दूर आहेत.गरीब शेतकरी किती कष्ट करतात याची जाणीव एके महिलेला नाही याचे आश्चर्य वाटते. शेतकरी आंदोलन करतात म्हणून त्यांना जेलमध्ये घालावे, ही किती योग्य आहे. सरकारचे लांगुलचालन तरी किती करावे, याचा अतिरेक रविना टंडन यांच्या व्यक्तव्यातून दिसून येतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री रविना टंडन हिच्या वक्तव्याचा समाचार घेतला.दोन दिवसांपुर्वी अभिनेत्री रविना टंडन हिने आंदोलन करणा-या शेतक-यांविषयी “अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.” या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर रविनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. याच आधारे सुप्रिया सुळे यांनी रविनाला चांगलाच फैलावर घेत असे लोक वास्तव्यापासून कोसो दूर असतात, गरीब शेतकरी किती कष्ट करतात. याची जाणीवहा त्यांना नसते असे म्हटले आहे.दरम्यान, चोहोबाजुने टिका होत असताना रवीनाने आपल्या ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव करत आपल्या ट्वीटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं आपण म्हंटल्याचं रवीनाने स्पष्ट केलं आहे.http://www.mpcnews.in/top-news/item/20401-pune