महाराष्ट्र

1 minute reading time (117 words)

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही
पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकरांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा मुंबई : राज्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही.खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी सध्या संपावर गेला आहे. या संपा संदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या संपाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना म्हटले होते. त्यानंतर पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खा.सुळे टीका केली. राज्यातील शेतकरी संपावर असताना राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. http://www.mumbainagri.com/ncp-mp-supriya-sule-sharad-pawar-pash-patel-prakash-ambedkar-farmers-issue-9139/
[Zee 24 Taas]देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या ...
नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची साय...