[ABP MAJHA]मविआतील अंतर्गत वादावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?जाागा वाटप कधी जाहीर होणार?

मविआतील अंतर्गत वादावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?जाागा वाटप कधी जाहीर होणार?

मी दुसऱ्या घरात वाकून पाहत नाही आणि अतिआत्मविश्वास हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे, अशा शब्दात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांनी महागाईवरूनही महायुतीला टोला लगावला आहे. तसेच इतर राजकीय विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया सिली आहे. 

Read More
  66 Hits

[Saam TV]डर्टी डझन भ्रष्टाचारी..., सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया स...

Read More
  118 Hits

[Maharashtra Times]माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा 'संदेश';

माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा 'संदेश';

'लाडकी बहीण' थेट फडणवीसांवर बोलली, एका वाक्यात कोंडी मुंबई: राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे. माझ्या मनात कायम जनहिताचा, लोककल्याणाचा विचार सुरु असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला भावनिक साद घातली. अर्थसंकल्पावर विरोधकांना केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्या...

Read More
  117 Hits

[ABP MAJHA]गट विलीन होणार या बातम्या तथ्य नाही, आम्ही मविआ म्हणून लढणार

गट विलीन होणार या बातम्या तथ्य नाही, आम्ही मविआ म्हणून लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ...

Read More
  188 Hits

सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मध्ये मराठा आरक्षणावरुन कोणता मुद्दा मांडला?

लोकसभेत राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना अर्थसंकल्पावरील भाषण आणि माननीय राष्ट्रपती महोदयांचे अभिभाषण यांमध्ये काहीही नवीन नसून दोन्ही भाषणे ही एकच आहेत की काय असा भास होत होता. कारण दोन्ही भाषणांमध्ये दहा वर्षांचा हिशेब ठेवण्यात आला. मागील आणि ...

Read More
  171 Hits

[Maharashtra Times ]सत्तेत येताच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीमांना १०० टक्के न्याय देऊ- सुप्रिया सुळे

सत्तेत येताच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीमांना १०० टक्के न्याय देऊ- सुप्रिया सुळे

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, आम्ही सत्तेत आल्यावर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाला १०० टक्के न्याय देऊ असा शब्दही सुप्रिया सुळेंनी दिला.इतकंच नव्...

Read More
  160 Hits

[TV9 Marathi]फडणवीसही म्हणाले होते, बिन लग्नाचा राहिल पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही

फडणवीसही म्हणाले होते, बिन लग्नाचा राहिल पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही

 बॅचलर राहील परंतु राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले होते. मात्र नंतर त्यापासून त्यांनीही फारकत घेतली. एखादा माणूस विरोधात असताना भाजपकडून त्याच्यावरती टोकाची टीका केली जाते. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा वापर करून माणसं, पक्ष फोडून भाजपची सत्ता कशी आणली जाईल? यासाठी प्रयत्न करतात...

Read More
  200 Hits

[azadmarathi]खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

सुप्रिया सुळेंनी का केली मागणी? Supriya Sule Demands For Sunil Tatkare Suspension: पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी...

Read More
  297 Hits

‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’

‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’

सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ Supriya Sule: पुणे: 'पवार साहेबांनी जो राजीनामा दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता. पण या सगळ्यांचा जो आग्रह होता, भाजप.. भाजप.. तेव्हा पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला.' असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील ...

Read More
  185 Hits

[loksatta]ज्येष्ठ मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

ज्येष्ठ मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

फडणवीसांचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या… ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अहमदनगरमध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल करून ४८ तास उलटले तरीही आरोपींविरोधात काहीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक...

Read More
  207 Hits

[sarkarnama]‘सोलापूरकरांनो, पाणीपट्टी भरू नका…

‘सोलापूरकरांनो, पाणीपट्टी भरू नका…

कमिशनरच्या दारात पहिला हंडा घेऊन मी उभी राहते' Solapur : सोलापूरसारख्या शहरात पाच दिवसांतून एकदा पाणी येतं. स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर कागदावर पुढे होतं आणि त्याला बक्षीस मिळतं तर सात दिवसांतून एकदा पाणी कसं येतं. सोलापुरात जोपर्यंत ट्रिपल इंजिन सरकार आम्हाला पाणी देत नाही, आम्ही पाणीपट्टी भरणार नाही. पाणीपट्टी आजपासून भरू नका, त्यासाठी हंडा घेऊन कम...

Read More
  239 Hits

[9TV SATARA]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे - सुप्रिया सुळे

अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे - सुप्रिया सुळे

देशात महागाई वाढली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, तरुणांना रोजगार नाही. या सर्व बाबींवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. काल महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होत होते. त्यावेळी खासदार कनीमोळी यांच्याविरोधात भाजपाच्या एका खासदाराने अपशब्द वापरले. ही बाब निषेधार्थ असून एका बाजूला महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होत आहे, तर दुस...

Read More
  296 Hits

[Maharashtra Lokmanch]बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयां...

Read More
  253 Hits

[Zee 24 Taas]देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या सुप्रिया सुळे; महाराष्ट्राची उंचावली मान

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या सुप्रिया सुळे; महाराष्ट्राची उंचावली मान

 संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध ...

Read More
  288 Hits

कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलन उमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८ उद्घाटकीयभाषण

कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलन

कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलनउमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८उद्घाटकीयभाषण - महात्मा जोतीबा फुले आणि राजर्षि शाहू महाराज,गाडगे महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यापुरोगामी विचारांनी ज्या भूमीची मशागत झाली. ज्या भूमीत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्या भूमीत आज आंबेडकरी विचारांना वाहिलेले साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला कोरेगाव-भीमा येथील लढ्याच्या द्विशतकपूर्तीचे निमित्त आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे. स्मृतीशेष खा. हरिहरराव सानुले नगरीत सत्यशोधक विचारांचे पाईक असणारे भाऊसाहेब माने यांचे नाव असणा-या विचारमंचावरुन मला या संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते.संमेलनाध्यक्षमा. आनंद गायकवाड,मा. ना. राजकुमार बडोले , मा. महेंद्र भवरे, मा. डॉ. विजय माने, मा. हेमंतकुमार कांबळेतसेच माझे सहकारी संदीप बजोरिया, अॅड.आशिष देशमुख माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर आणि राज्याच्या विविध भागांतून आलेले प्रतिनिधी. मागील दोन महिन्यांपूर्वी मी यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेसाठी आले होते. येथील शेतकरी,कष्टकरी,स्त्रियां, मुली, दलित आणि आदिवासी समाजातील सर्व मंडळींना यावेळी भेटले. त्यांचे प्रश्न,त्यांची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारपुढे त्याची गा-हाणी मांडून ती दूर करण्याच प्रयत्न मी करत आहे. पुढील काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मी जाणारचं आहे. त्यामुळे तुमच्या या निमंत्रणाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते . - कोरेगाव-भीमा सारख्या घटनांनी महाराष्ट्राच्या समाजमनावर जखम केली असताना समतेच्या विचारांचा पुरस्कार करणारे हे साहित्य संमेलन उमरखेड येथे होत आहे. प्रतिगामी शक्तीं एकीकडे प्रबळ होत आहेत की काय अशी भीती व्यक्त होतेय. दलित-सवर्णअसे वाद जाणीवपूर्वक पेटवून देण्याचे प्रयत्नकाहीमनुवादी मंडळी करत आहेत.अश्यावेळीसाहित्यिकांची भूमिका आणि त्यांच्या मानवतावादी लेखनाची यथार्थता अधिक ठळकपणे अधोरेखित होत असतानाच हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सनातनी विचारांना मोठी चपराक देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.प्रथमतः मी या संयोजन समितीच्या आयोजकांचे अभिनंदन करते, कारण या संयोजन समितीने या संमेलनात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी सर्वच स्तरातील मंडळी जाणीवपूर्वक सहभागी झाली आहेत. हीआशादायक वसमाधानाची गोष्ट आहे. उपेक्षितसमाजाची अधोगती कशामुळे झाली याची समाजशास्त्रीय आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या पुढाकारातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि नव्या विचारांचा प्रकाश नेण्याचे काम सत्यशोधक समाजाने केले. राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकरांनी तो विचार मोठ्या कल्पकतेने पुढे नेला. समाजात नव्या विचारांची पेरणी केली. त्याचे मोठ्या डौलात आलेले पीक म्हणजे आजचे साहित्य संमेलन असे म्हणता येईल. - या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होत आहेत, परंतु कार्यक्रम पत्रिकेतील एका परिसंवादाबाबत मला उत्सुकता वाटते. फुले-आंबेडकरांचा शेतीविषयक दृष्टीकोन असा या परिसंवादाचा विषय आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की, या दोन महान व्यक्तींचं या क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला कदाचित फारसं माहित नसावं. महात्मा फुले यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे ते जनक आहेत. शेतकऱ्याचा आसूड या आपल्या क्रांतीकारक ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या परिणामकारकरित्या जनतेसमोर मांडले. समाजाच्या उत्थानासाठी शूद्र-अतिशूद्र, शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी जगला पाहिजे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी घटना लिहिली हे आपणा सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्जा, खनिज आणि जलनियोजन या मंत्रीपदी असताना वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत.दामोदर, हिराकुंड, सोन प्रकल्पांना चालना देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केले.तसेचदेशातील कृषीक्षेत्राबाबत त्यांनी अनेक मोलाची टिपणे करुन ठेवली आहेत. त्यांनी त्याबाबत केलेल्या मौलिक सूचनांच्या आधारेच देशातील शेतकरी सक्षम होऊ शकला.त्याचबरोबर केंद्रामध्ये वीजपुरवठा विभाग स्थापन करून वीज, कोळसा, पेट्रोल, अल्कोहोल आणि पाणी या मुख्य स्त्रोतांचासर्व्हे करून निर्मिती क्षमता वाढविण्यावार त्यांनी भर दिलेला आढळून येतो. याची कृतज्ञतापुर्वक नोंद केली पाहिजे. - पुढील दोन दिवसांत या संमेलनात विविध विषयांवर उहापोह होणार आहे. विशेषतः आंबेडकरी विचारांच्या साहित्यविषयक चर्चांचा उपस्थितांना लाभ घेता येणार आहे. विचारांचे हे सोने लुटून प्रत्येकजण घरी जाईल, तेंव्हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रींसाठी लढण्याचे मोठे बळ अथवा उर्जा त्यांना मिळालेली असेल. या संमेलनाचे उद्घाटन करताना या व्यासपीठावरुन मी हीच उर्जा घेऊन पुढे जाणार आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना नेस्तानाबूत करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा जागर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहेच. त्यासाठीच यासारख्या साहित्य संमेलनांची गरज आहे.या प्रसंगी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सटाणा येथील एक भाषण आठवत आहे. मनमाडहून चांदवड ला जाताना सटाणा येथे एका सभेला संबोधीत करताना ते असे म्हणाले होते की, देशात जर मनुच्या कायदयानुसार राज्य करणारे लोक पुन्हा...

Read More
  233 Hits

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारीराहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 25 May 2018 11:30 PMबारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलंhttp://abpmajha.abplive.in/maharashtra/supriya-sule-cycling-with-netherlands-political-leader-carolla-scouten-latest-update-544991

Read More
  263 Hits

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही

पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकरांवर सुप्रिया सुळेंचा निशाणामुंबई : राज्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही.खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी सध्या संपावर गेला आहे. या संपा संदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या संपाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना म्हटले होते. त्यानंतर पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खा.सुळे टीका केली. राज्यातील शेतकरी संपावर असताना राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.http://www.mumbainagri.com/ncp-mp-supriya-sule-sharad-pawar-pash-patel-prakash-ambedkar-farmers-issue-9139/

Read More
  251 Hits

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More
  268 Hits