[Sakal]शिवशाही बस नको, हिरकणी किंवा लाल परी सोडा
सुप्रिया सुळे, बारामती पुणे विनावाहक गाडीबाबत मागणी
बारामती : राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसेस बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. नादुरुस्त व सदोष बसेस तसेच रस्त्यात केव्हाही कोठेही बंद पडणारी गाडी अशीच शिवशाहीची ख्याती झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील समाजमाध्यमावर व्यक्त होत बारामती पुणे मार्गावर शिवशाही ऐवजी हिरकणी व लाल परी बसेस सोडण्याचे आवाहन केलेले आहे. प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना बारामती पुणे बारामती मार्गावरील शिवशाही गाडया बंद करुन त्या ऐवजी हिरकणी व लाल परी गाडया सुरु करण्याची मागणी केली आहे..
सुप्रिया सुळे म्हणतात, एसटीच्या माध्यमातून बारामती-पुणे या मार्गावर विना वाहक-विना थांबा बससेवा दिली जाते. परंतु गेली काही महिन्यांपासून या मार्गावर हिरकणी अथवा लाल परी या गाड्या सोडल्या जात नाहीत.
याऐवजी फक्त शिवशाही गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांचे तिकीट दर जास्त आहेत. शिवाय त्यातील बऱ्याच गाड्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे त्या अनेकदा रस्त्यातच बंद देखील पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
नाडे गावात अंधश्रद्धेचा पर्दाफाश; पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी, जादूटोणा व नरबळीचा प्रयत्नामुळे भीतीचे वातावरण .एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की कृपया नागरीकांच्या सेवेसाठी या मार्गावर हिरकणी व लाल परी या गाड्या विना वाहक-विना थांबा या सेवेअंतर्गत पुन्हा सुरू कराव्या तसेच नादुरुस्त शिवशाही बसेस या मार्गावर सोडल्या जाऊ नये
