1 minute reading time (284 words)

[Deshdoot]राज्यात वाढती गुन्हेगारीसह राजकारणाची पातळी घसरली

राज्यात वाढती गुन्हेगारीसह राजकारणाची पातळी घसरली

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील नियोजित आंदोलनासाठी निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Sai Baba Darshan) घेऊन राज्याच्या कल्याणासाठी साकडे घातले. मात्र दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ढासळलेल्या राजकीय संस्कृतीवरून सत्ताधार्‍यांवर कडाडून टीका (Criticism) केली.

राज्यात सध्या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून ही बाब अत्यंत चिंतेची आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीचा दाखला देत, गृह विभागाच्या (Home Department) अपयशावर त्यांनी थेट निशाणा साधला. केवळ पुणेच (Pune) नव्हे तर संपूर्ण राज्यातील कायदा-सुव्यवस्था रामभरोसे झाली असल्याचे चित्र त्यांनी मांडले.

राजकारणात पैशाचा आणि सत्तेचा ज्या पद्धतीने गैरवापर केला जात आहे, त्यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींबाबत समाजात जो उपहास आणि नकारात्मक चर्चा होत आहे, ती दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी राजकीय संस्कृतीच्या घसरणीकडे लक्ष वेधले. शिवछत्रपती आणि यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात आपण कोणत्या पातळीवर पोहोचलो आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधार्‍यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नेत्यांच्या भाषेवर टीका (Criticism) करताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (Former Union Minister Arun Jaitley) यांच्या विधानाचा संदर्भ देत, माध्यमांनी प्रसिद्धी देणे थांबवले, तर अनेक नेत्यांचे बोलणे आपोआप बंद होईल, असा मार्मिक टोला लगावला. या दौर्‍यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी एकजूट असल्याचे अधोरेखित केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी आपला नियमित संवाद असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

...

Shirdi : राज्यात वाढती गुन्हेगारीसह राजकारणाची पातळी घसरली - Deshdoot

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील नियोजित आंदोलनासाठी निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी
[ETV Bharat]सुप्रिया सुळे साईचरणी नतमस्तक, राष्ट्र...
[Maharashtra Times]नसरापूरमधील नराधमाला कोर्टाकडून...