सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मध्ये मराठा आरक्षणावरुन कोणता मुद्दा मांडला?
लोकसभेत राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना अर्थसंकल्पावरील भाषण आणि माननीय राष्ट्रपती महोदयांचे अभिभाषण यांमध्ये काहीही नवीन नसून दोन्ही भाषणे ही एकच आहेत की काय असा भास होत होता. कारण दोन्ही भाषणांमध्ये दहा वर्षांचा हिशेब ठेवण्यात आला. मागील आणि पुढील वर्षाबाबतचे भाष्य तर यामध्ये नव्हते. केवळ आभासी प्रतिमांची मांडणी आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही अशी स्थिती आहे.प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातो आणि इव्हेंट संपला की लोक विसरुन जातात अशी स्थिती आहे. अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केली आहे.